नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

दिग्दर्शक गजानन सरपोतदार

चित्रपट निर्माते नानासाहेब सरपोतदार हे गजाननरावांचे वडील आणि आदित्य सरपोतदार हे नातू होत. गजाजन सरपोतदारांनी फिरते उपाहारगृह ही संकल्पना पुण्यामध्ये पहिल्यांदाच राबवली. गजानन सरपोतदार हे राजकारणीही होते. गं.नी. जोगळेकर यांच्याविरुद्ध ते निवडणुकीला उभे होते, पण थोड्या मतांनी हरले. गजानन सरपोतदार यांनी तुझ्यावाचुन करमेना, दुनिया करी सलाम, सासू वरचढ जावई, अशा चित्रपटांची निर्मिती केली. गजानन सरपोतदार यांच्या […]

अभिनेत्री जयमाला शिलेदार

संगीताची तालीम जयमाला शिलेदार यांनी गोविंदराव टेंबे यांच्याकडून घेतली. टेंबे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘वेषांतर’ या नाटकामधून शिलेदार यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं आणि त्यानंतर आपल्या अभिनय आणि गायनानं रंगभूमी गाजवून सोडली. त्यांचा जन्म २१ ऑगस्ट १९२६ रोजी झाला. प्रमिला जाधव हे त्यांचं माहेरचं नाव. संगीत रंगभूमीचे अनभिषिक्त नटसम्राट बालगंधर्व यांच्याबरोबर भूमिका केल्याने गंधर्वसुरांची शिलेदारी जतन करणारी गायिका अशीच जयमाला […]

गीतकार पी. एल. संतोषी

पी.एल. संतोषी फक्त गीतकार नव्हते तर ते दिग्दर्शकही होते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. उत्कृष्ट लेखकही होते. म्युझिकल कॉमेडी हा प्रकार त्यांनी लोकप्रिय केला केला. तसेच ‘अनोखे बोल’ हा गीतप्रकार ‘टिका लई कली दई’ (चित्रपट – शिनशिनाके बुबला बु) यासारख्या गाण्यातून रूढ केला. ‘कोई किसीका दिवाना ना बने’ (सरगम), ‘महफिल में जल उठी शमा’ (निराला), ‘तुम क्या जानो […]

गीतकार गुलशन बावरा

गुलशन बावरा यांचे मूळ नाव गुलशन कुमार मेहता. त्यांचा जन्म १२ एप्रिल १९३७ रोजी झाला. त्यांचे वडील बांधकाम संबंधित व्यवसाय करीत होते. गुलशनदांचे आयुष्यच मुळी लहानपणापासून संकटांनी घेरलेले होते. भारत-पाकिस्तान फाळणीच्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोरच आई वडिलांची हत्या झाली. त्यानंतर भेदरलेल्या गुलशन बावरा यांनी त्यांच्या लहान भावासकट एका छावणीत आश्रय घेतला आणि त्यानंतर माघारी परतणाऱ्या जमावाबरोबर ते भारतात आले. तेथून […]

गायक सुरेश वाडकर

सुरेश वाडकर यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली, तसेच ‘पतियाळा’ घराण्याची तालीम घेतली. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९५४ रोजी झाला. त्यांनी पाश्र्वनाथ डिग्रजकर यांच्याकडून ही प्राथमिक गायनाचे शिक्षण व सदाशिव पवार यांच्याकडून तबल्याचे प्राथमिक शिक्षण घेतले. १९७६ साली सूर-सिंगार नावाच्या संगीत स्पर्धेत सुरेश वाडकरांनी भाग घेतला. त्या मधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला […]

गायिका अंजनीबाई मालपेकर

अंजनीबाई मालपेकर भेंडीबाजार घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका होत्या. त्यांचा जन्म २२ एप्रिल १८८३ रोजी झाला. अंजनीबाई मालपेकर यांनी नजीरखाँ व खादिमा, हुसेनखाँ या तीन भावांच्या कडून संगीताचे शिक्षण घेतले. राग `यमन’ हा भेंडीबाजार घराण्याच्या उस्ताद नजीरखाँनी अंजनीबाईंना शिकवलेला पहिला राग. त्याची तालीम साडेतीन वर्ष चालली होती. अंजनीबाईंचा `मध्यम’ स्वर एखाद्या ज्योतीसारखा कसा प्रज्वलित व्हायचा याचं वर्णन खुद्द कुमार गंधर्वांनी […]

दिग्दर्शक नितीन देसाई

लोकसत्ता मधील नितीन देसाई यांच्या वरील लेख. ‘‘गुलजारजींबरोबर मी ‘लेकीन’ आणि ‘माचिस’ हे चित्रपट केले. अभिजात अनुभव होता तो. ‘माचिस’च्या वेळी लोकेशन शोधत मनालीला पोचलो. भल्या पहाटे माझ्या खोलीचा दरवाजा वाजला. गुलजारजी आत आले. खिडक्यांकडे गेले व फर्रकन पडदा सरकवला. मोठय़ा विशाल खिडक्यांतून अद्भुत दृश्य दिसत होते. खालच्या दऱ्याखोऱ्या बर्फानं भरल्या होत्या, चिनार वृक्षांच्या टोकांवर बर्फ […]

निर्माता नितिन चंद्रकांत देसाई

नितिन चंद्रकांत देसाई यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले आहे.त्यांचा जन्म ६ ऑगस्ट १९६५ रोजी झाला. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला विद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले.१९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. प्रतिभा, प्रयत्न आणि प्रज्ञा या त्रयीच्या जोरावर आपले अढळ स्थान निर्माण करणारे नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई! एका चाळकरी मध्यमवर्गीय मुलानं […]

मराठी कलावंत वसंत पवार

आज वसंत पवार हे नाव घेतलं की मराठी चित्रपट रसिकाच्या ओठावर नाव येतं ते ‘सांगत्ये ऐका!’ हेच, या चित्रपटातील वसंत पवार यांची सगळीच्या सगळी गाणी गाजली. चित्रपटही तुफान चालला आणि मराठी सिनेमाच्या इतिहासात अनेक नवे विक्रमही प्रस्थापित झाले. ‘बुगडी माझी सांडली ग..’ हे गीत तर आशा भोसले यांच्या संगीत प्रवासातील एक मैलाचा दगड बनून गेलं आहे. […]

स्मिता तळवलकर

स्मिता तळवलकर या माहेरच्या स्मिता गोविलकर. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९५५ रोजी झाला. स्मिता तळवलकर यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या हुजुरपागा शाळेत झाले. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र हे विषय घेऊन बी. ए. झाल्यावर स्मिता तळवलकर यांनी मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमही केले होते. त्यांनी १९७२ साली मुंबई दूरदर्शनवरून वृत्तनिवेदिका म्हणून कारकीर्द सुरू केली होती. तब्बल सतरा वर्षे त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणून काम केले […]

1 292 293 294 295 296 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..