नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

अभिनेत्री, पॉप गायिका मडोना

मडोना यांचे पूर्ण नाव मडोना लुईस व्हेरोनिका चिकोअ्ने. मडोना मोठेपणी ती प्रचंड प्रसिद्ध गायिका, नृत्यांगना, अभिनेत्री, मॉडेल, उद्योजिका, लेखिका, फॅशन डिझायनर वगैरे होईल असं कुणाला वाटलं नसेल. […]

भावकवी कृ.ब. निकुंब

एक भावकवी आणि ‘मृगावर्त’ या नाविन्यपूर्ण खंडकाव्याचे निर्माते म्हणून कविवर्य कृ. ब. निकुंब मराठी साहित्यसृष्टीला परिचित आहेत. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. ‘घाल घाल पिंगा वार्याा माझ्या परसात…’ असे हळूवारपणे लिहिणारे निकुंब जितके कवी म्हणून थोर होते तितकेच एक शिक्षक म्हणूनही फार मोठे होते. कृ. ब. निकुंब कॉलेजमध्ये ‘साहित्यातील परंपरा आणि संप्रदाय’ हा विषय समरसून शिकवायचे. […]

काजोल

सध्याच्या् काळात आघाडीच्या आणि नामांकित अभिनेत्रींमध्ये समावेश होत असलेल्या काजोलचे कुटुंब चित्रपट उदयोगात अनेक वर्षांपासून आहे. तिचा जन्म ५ ऑगस्ट १९७४ रोजी मुंबईत झाला. आई तनूजा मराठी कुटुंबातली, वडील चित्रपट निर्माते शोमू मुखर्जी बंगाली. मावशी नुतन सर्वाधिक पाच वेळा फिल्म फेअर पुरस्कातर पटकावलेली नामांकित अभिनेत्री. पणजी रतन बाई आणि आजी शोभना समर्थ यांच्या वारशाखाली तयार झालेली काजोल. इतकेच […]

हिंदी पार्श्वगायिका हेमलता

हेमलता हे नाव ऐकले की ७० व ८० च्या दशकातील गाणी आठवतात. त्यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५२ रोजी झाला. ७० च्या दशकात रवींद्र जैन सारखे स्वतंत्र वृत्तीचे संगीतकार आणि राजश्री पिक्चर्स सारखे नवीन कलाकारांना घेऊन काम करणारी संस्था यामुळे अनेक लोकांना कामाची संधी मिळाली आणि नवीन चेहरे आणि आवाज ऐकू आले. त्यातल्याच एक हेमलता. त्याचे लग्नाआधीचे नाव विवाह लता भट होते. […]

स्वरसम्राज्ञी तथा अभिनेत्री कीर्ती शिलेदार

कीर्ती शिलेदार ह्या जयराम व जयमाला शिलेदार यांच्या कन्या. त्यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५२ रोजी झाला. आपल्या आई, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताची आराधना केलेल्या कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. त्यांचे शास्त्रीय संगीताचे उच्च शिक्षण नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे झाले. कीर्ती शिलेदार यांची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर ४००० हून अधिक प्रयोग झाले आहे. […]

प्रसिद्ध गीतकार इन्दीवर

गीतकार इन्दीवर यांचे खरे नाव श्यामल बाबू राय, इन्दीवर यांना लहान पणा पासून लेखक, संगीत आणि गायन लेखन याची आवड होती. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२४ रोजी झाला. बाबू भाई मिस्त्री यांच्या चित्रपट ‘पारसमणि’ मधील इन्दीवर यांची गाणी गाजली. निर्माता-दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या चित्रपटात मा.इन्दीवर गाणी लिहिली. ‘उपकार’ मधील “क़स्मे वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या…” […]

बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेत्री राखी

राखी म्हणताच रसिकांच्या एका पिढीला घाऱ्या डोळ्यांची, फारशी टामटूम न करता विविध प्रकारच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री आठवते. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९४७ रोजी झाला. राजश्री प्रॉडक्शनच्या सत्येन बोस दिग्दर्शित ‘जीवनमृत्यू’ हा राखी यांचा पहिला चित्रपट. त्यांच्या या पहिल्याच चित्रपटाने, मॅटिनी शोला नवीन चित्रपट प्रदर्शित करण्यास काहीच हरकत नाही, हा नवा ट्रेण्ड आणला. दक्षिण मुंबईतील ‘अलंकार’मध्ये हा चित्रपट मॅटिनीला १०२ […]

मराठी लेखक, नाटककार, पत्रकार जयवंत दळवी

काही वर्षे ‘प्रभात’ व ‘लोकमान्य’ वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते ‘युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस’ (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाले. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी कधीच ‘मी लेखक आहे’ अशी ऐट घरात ठेवली नाही. ते स्वत: पत्नी-मुलांमध्ये आपल्या साहित्याविषयी बोलत नसत, परंतु कोणी त्याबद्दल […]

बॉलिवुड मधील लोकप्रिय हास्य कलाकार जॉनी लिव्हर

जॉनी लिव्हर यांचे खरे नाव जॉनराव प्रकाशराव जनुमाला. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९५७ रोजी झाला. जॉनी लिव्हर यांचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशचे. त्यांचे वडील प्रकाशराव जानुमाला आणि आई करुणाम्मा यांच्या सोबत मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कॅम्प-धारावीमध्ये एका चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात राहायचे. ते नकला करायचे. रेकॉर्ड डान्स करायचे. पैसे मिळायचे, ते घरी आईला द्यायचे. ते मित्र-मैत्रिणींना, शिक्षकांना नाचून वगैरे दाखवून […]

अभिनेत्री वैजयंती माला बाली

एक अभिनेत्री, शास्त्रीय नृत्यांगना, कर्नाटकी गायिका, नृत्य प्रशिक्षक व राजकारणी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या वैजयंती माला यांनी वयाच्या १३ व्या वर्षी तामिळ सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १९३६ रोजी झाला. एम डी रमन व वसु़ंधरादेवी हे त्यांचे आईवडिल. पापाकुट्टी (अर्थ लहान मुलगी) या नावाने ती ओळखली जात असे. वैजयंती माला यांची आई तमिळ चित्रपटांतील एकेकाळची […]

1 290 291 292 293 294 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..