चंद्रकांत मांडरे यांचे मूळ नाव गोपाळ मांडरे. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १९१३ रोजी झाला. वडिलांचं इंग्लिश टोप्या व अत्तर विकण्याचं दुकान होतं. या व्यवसायाव्यतिरिक्त चंद्रकांत यांचे वडील नाटक-चित्रपटांचे शौकीन होते. बाबूराव पेंटर यांच्या “गजगौरी’ मूकपटात त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. १९३१ मध्ये सांगलीत “बलवंत चित्रपट कंपनी’ सुरू झाली होती. तिथे पडदे रंगविण्याचं काम चंद्रकांत यांना मिळालं. पगार होता दरमहा […]
ग्रँडमास्टर किताब मिळवणारे पहिले भारतीय बुद्धिबळपट्टु प्रवीण ठिपसे यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५९रोजी झाला. त्यांनी हा किताब १९८४ साली मिळवला. प्रवीण ठिपसे यांचे वडील डॉ. महादेव ठिपसे हे महात्मा गांधींचे अंगरक्षक होते. स्वातंत्र्यलढय़ासाठी १० वर्षे दिल्यानंतर ते डॉक्टर झाले आणि त्यांनी मुंबईत प्रॅक्टिस सुरू केली. प्रवीण यांच्या आईनी आपल्या सर्व मुलांना बुद्धिबळाचं वेड लावलं. तेही इतकं की, येणाऱ्या जाणाऱ्या […]
लहानपणी गुलशकुमार वडिलांच्या दुकानावर ज्यूस विक्रीत त्यांना मदत करत होते. त्यांचा जन्म ५ मे १९५१ रोजी झाला. येथूनच त्यांना उद्योगाचे धडे मिळाले आणि त्यातील रस वाढत गेला. ते २३ वर्षांचे असताना त्यांनी कुटुंबियांच्या मदतीने एक दुकान खरेदी केले आणि रेकॉर्डर्स आणि ऑडिओ कॅसेट विक्री सुरु केली. त्यानंतर पुढे त्यांनी नोएडा येथे स्वतःची कंपनी सुरु केली आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये स्वतःची […]
सुनिल शेट्टीचे पूर्ण नाव सुनिल लामा शेट्टी असे आहे. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १९६१ रोजी झाला. परंतु, हिंदी चित्रपटसृष्टीने त्याला अण्णा हे टोपण नाव दिले आहे. सुनिल शेट्टी यांनी १९९२ मध्ये करिअरची सुरवात केली. त्याच्या अदाकारीला प्रेक्षकांची चांगलीच वाहवाह मिळाली आहे. काही चित्रपटांमधील त्याची अदाकारी कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारी आहे. सुनिल शेट्टीची ओळख अॅक्शन हिरो अशी होती. मोहरा, धडकन, […]
पं रामाश्रेय झा यांनी लिहिलेल्या पाच खंड असलेल्या लेखांचा संग्रह अभिनव गीतांजली संगीत हे भारतीय संगीतातील एक महत्वाचे मानले जाते. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. यात रागांचे सखोल विश्लेषण केले आहे. जितेंद्र अभिषेकी यांनी पं रामाश्रेय झा यांच्या अनेक रचना गाऊन रसिकांसमोर आणल्या होत्या. १९६८ मध्ये, ते अलाहाबाद विद्यापीठात शिक्षक म्हणून नियुक्त झाले होते आणि १९८० पर्यंत […]
पी. जयराज यांनी हिंदी, मराठी, गुजराथी चित्रपटात कामे केली बोलपटाच्या काळात त्यांनी उर्दू आणि इंग्रजी भाषेमधील चित्रपटात कामे केली. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०९ रोजी झाला. पी. जयराज यांनी १७० हून अधिक चित्रपट मध्ये कामे केली. व्ही.शांताराम, पृथ्वीराज कपूर, मोतीलाल यांच्या बरोबर पी. जयराज यांनी कामे केली. त्यांनी मोहर, माला, प्रतिमा,राजघर,सागर अशा चित्रपटांचे दिग्दर्शन पण केले. १९८० साली त्यांना […]
भालचंद्र पेंढारकर यांचे संगीतातील गुरू रामकृष्णबुवा वझे. त्यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९२१ रोजी हैद्राबाद (दक्षिण) येथे झाला. भालचंद्र पेंढारकर यांनी नाट्यसृष्टीत पदार्पण १९४२ साली सत्तेचे गुलाम या नाटकात भूमिका करून केले. नाट्यदिग्दर्शक, नाट्यनिर्माते, ध्वनी-प्रकाश व्यवस्था, अभिनेते, गायक, संगीतकार अशा कितीतरी भूमिका मा. भालचंद्र पेंढारकर यांनी गाजवल्या होत्या. भालचंद्र पेंढारकर यांनी ‘ललितकलादर्श’ नाटय़संस्थेतर्फे अनेक नाटके रंगभूमीवर सादर केली. विद्याधर गोखले […]
केशवराव भोसले यांनी वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षी त्यांनी स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीत प्रवेश घेतला होती. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १८९० रोजी झाला. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी सिद्धारूढ स्वामींच्या आशीर्वादाने हुबळीमध्ये ललितकलादर्श नाटक मंडळी स्थापन केली. ह्या नाटक मंडळींचे पहिले नाटक संगीत सौभद्र १९०८ मध्ये गणेशपीठ, हुबळी येथे सदर केले गेले. त्यानंतर हे नाटक महाराष्ट्रातही सादर केले गेले. […]
नायगाव चाळीतच दादा कोंडके यांचे बालपण गेले. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी झाला. तरुणपणी पैशांची गरज भागवण्यासाठी अपना बाजार मध्ये त्यांना नोकरी करावी लागली. त्या काळात काही कारणांमुळे त्याचे स्वकीय व कुटूबीय त्यांच्या पासून दूर झाले, व दादा एकटे पडले. तेव्हा समाजात दु:खी असलेल्या लोकांना हसवण्याचा पण दादांनी केला. आणि हाच उद्देश धरून त्यांनी त्यांच्या भागतील बँड […]
समीरा गुजर ही ठाणेकर. समीरा गुजर हिचे शालेय शिक्षण ठाण्यातील महाराष्ट्र विद्यालय, ब्राह्मण विद्यालयात झाले. समीरा गुजर अभिनयाबरोबरच निवेदिका आणि सूत्रसंचालक म्हणून सर्व रसिकांना ठाऊक आहे. ‘टुरटूर’ आणि ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ ही दोन नाटकांमधून व्यावसायिक रंगभूमीवर समीराने काम केले आहे. ‘आभाळमाया’ या मालिकेतून ती झळकली होती. तिने सह्य़ाद्री वाहिनीवरील ‘यंग तरंग’ या कार्यक्रमाचे निवेदन-सूत्रसंचालन केले […]