नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

गुलजार

हिंदी चित्रपटसृष्टीवर गेली अनेक वर्षे कवी, गीतकार, लेखक, दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमध्ये आपला अमीट छटा उमटवणाऱ्या गुलजार यांचा जन्म १८ ऑगस्ट १९४३ रोजी झाला. गुलजार यांचे खरे नाव संपूर्णासिंह कालरा! चित्रपटसृष्टीत नाव चमकण्यापूर्वी संपूर्णानंद सिंह कालरा हे मोटार मेकॅनिक होते. गुलजार यांनी आयुष्यभर शायरीवर प्रेम केले, जीवतोड केले, शायरीसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले, रात्ररात्र जागून काढल्या. खाजगी आयुष्यात वादळं […]

ज्येष्ठ नाटककार प्र.ल.मयेकर

दीपस्तंभ, रातराणी, पांडगो इलो रे, आसू आणि हसू, रमले मी अशी विविध विषयांवरील उत्कृष्ट नाटके देणारे प्रख्यात ज्येष्ठ नाटककार प्र.ल.मयेकर यांनी ‘बेस्ट’मध्ये नोकरीला असतानाच लेखनाला सुरुवात केली होती. त्यांचा जन्म ४ एप्रिल १९४६ रोजी झाला. ऐंशीच्या दशकात मराठी व्यावसायिक रंगभूमीवर नाटककार म्हणून त्यांनी कारकिर्द सुरु केली. त्यापूर्वी हौशी रंगभूमीवर एकांकिकाकार आणि नाटककार म्हणून त्यांनी चांगलेच नाव कमावले होते. जगन […]

बॉलिवुड गायिका सुनिधी चौहान

दिल्लीत जन्मलेली सुनिधी प्रतिभावंत असल्याचे तिच्या वडिलांनी तिच्या बालपणीच ओळखले होते. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९८३ रोजी झाला. वयाच्या केवळ सुनिधी चौहानचे बालपणीचे नाव निधी चौहान असे होते. चौथ्या वर्षापासून तिने मंदिरात गायन सुरु केले होते. शालेय जीवनात सुनिधी दिल्लीत अनेक ठिकाणी स्टेज परफॉर्मन्स देत होती. याच काळात टीव्ही अँकर तबस्सुम यांची नजर सुनिधीवर पडली. त्यांनी आपल्या एका शोमध्ये […]

जागतिक हत्ती दिवस

शतकानुशतके हत्ती व माणूस यांच्यात एक सकारात्मक नाते आहे. माणसाने हत्तीसारख्या अवाढव्य प्राण्याचा उपयोग अवजड वजने उचलणे,वाहून नेणे, सैन्यदळ, शोभायात्रा, वाहन म्हणून वर्षानुवर्षे केला आहे. मिथ्यक, जातककथा, पंचतंत्रादी माध्यमांतून हत्ती हा पुरातन काळापासून नागरजीवनाचा अविभाज्य हिस्सा असल्याचे लक्षात येते. भासाने लिहिलेल्या स्वप्नवासवदत्तमध्ये राजा उदयनाकडे हत्तीला वीणावादन करून आकृष्ट करण्याची विद्या अवगत होती असा उल्लेख आहे. ‘मातंगलीला’, […]

मैत्री दिवस

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा ‘फ्रेंडशिप डे’ अर्थात ‘मैत्री दिवस’ म्हणून साजरा केला जातो. मैत्री म्हणजे काय असतं? एकमेकांचा विश्वास असतो? अतूट बंधन असत? की हसता खेळता सहवास असतो? मैत्री म्हणजे मैत्री असते, व्याख्या नाही तिच्यासाठी; बंधन नसत, त्या असतात रेशीमगाठी. मैत्री म्हणजे काय? कुणासाठी कट्टय़ावरची मज्जामस्ती तर कुणासाठी प्रेम, कुणासाठी आधार देणारी यारी तर कुणासाठी केवळ […]

मीनाकुमारी

मीनाकुमारी एक शायरां (उर्दू कवयित्री) सुध्दा होत्या हे खूप जणांना माहित नसेल. त्यांचे काव्यातलं नाव (तखल्लुस) होतं नाझ. उर्दू शायरीसाठी वरदान ठरणारी दुःखाची देणगी त्यांना व्यक्तिगत जीवनातही भरपूर लाभली होती, असं म्हणतात. हे दोन शेर मा.मीनाकुमारी यांचे आगाज तो होता है, अंजाम नहीं होता जब मेरी कहानीमें, वो नाम नहीं होता….. हंस हंस के जवॉं दिलके […]

अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर

महेश मांजरेकर यांनी लेखन व भुमिका केलेला ’मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ हा मराठी चित्रपट तुफान गाजला. त्यानंतर त्यांनी ”शिक्षणाच्या आईचा घो”, ”लालबाग परळ”, ”फक्त लढ म्हणा”, ”काकस्पर्श” आणि ”कोकणस्थ” या चित्रपटांचे दिग्दर्शन करून मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्याची महत्वाची कामगिरी केली. […]

चित्रपट अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर

‘माझा पती करोडपती’, ‘कुंकू’, ‘अशी ही बनवाबनवी’ अश्या ब-याच चित्रपटात तसेच अत्यंत गाजलेल्या ‘तू तू मै मै’ टि.व्ही. मालिकेत सुप्रिया होती. ‘नवरा माझा नवसाचा’ ह्या चित्रपटानेही प्रेक्षकांची वहावा मिळवली. […]

1 289 290 291 292 293 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..