चित्रपट अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर

चित्रपट, दूरचित्रवाणी, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांचे माहेरचे नाव सुप्रिया सबनीस. सुप्रिया पिळगांवकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९६७ रोजी झाला.

सुप्रियाचा रंगभूमीवरचा प्रवेश मधुकर तोरडमलांच्या ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’ ह्या व्यावसायिक नाटकाने झाला. त्याच दरम्यान सुप्रिया दूरदर्शनवर ‘किलबिल’ ह्या मुलांसाठीच्या कार्यक्रमात म्हातारीची भूमिका करत होती. योगायोगाने सचिनच्या आईच्या नजरेत ही ‘तरुण’ म्हातारी भरली आणि त्यांनीच सचीनकडे त्याच्या नवीन चित्रपटाच्या नायिकेसाठी सुप्रियाची शिफारस केली. सुरुवातीच्या नकारानंतर आई वडिलांनी सुप्रियाला चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली आणि सुप्रियाने ‘नवरी मिळे नव-याला’ द्वारा मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. चित्रपटादरम्यान दोघांमधे नाजूक बंध गुंफले गेले आणि प्रत्यक्षातली नवरी नव-याला मिळाली.

१९८५ साली सचिन-सुप्रियाच्या सहजीवनाला सुरवात झाली. पहिल्या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनयाचे ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळूनही सुप्रिया फारशी चित्रपटात दिसली नाही.

‘माझा पती करोडपती’, ‘कुंकू’, ‘अशी ही बनवाबनवी’ अश्या ब-याच चित्रपटात तसेच अत्यंत गाजलेल्या ‘तू तू मै मै’ टि.व्ही. मालिकेत सुप्रिया होती. ‘नवरा माझा नवसाचा’ ह्या चित्रपटानेही प्रेक्षकांची वहावा मिळवली.

सचिन-सुप्रिया ह्यांचे काम करतांना चित्रपटाच्या सेटवर संबंध अत्यंत व्यवसायिक आहे. बायको म्हणून सचिन सुप्रियाला गृहित धरत नाही. तसेच तिच्या सूचनांना प्राधान्य देतात. त्याउलट सुप्रियाला सचिन दिग्दर्शकाच्या भूमिकेत असतात तेव्हा निश्चिंत वाटते. काही वर्षापूर्वी सुप्रियाने संजय छेलचा ‘खुबसुरत’ केला. त्याचबरोबर अमिताभ बच्चन बरोबर ‘ऐतबार’ मधे त्यांच्या पत्नीची भूमिका केली. ‘ऐतबार’ चित्रपट कसा मिळाला हे सांगतांना सुप्रिया सांगते की, तिचा ‘तुझे मेरी कसम’ हा चित्रपट पहाण्यासाठी अमिताभ बच्चन आले होते. त्यांनीच सुप्रियाचे नाव ‘ऐतबार’साठी सुचविले. चित्रपटांच्या बरोबरीने ‘तू तू मै मै’, ‘क्षितीज ये नही’, ‘शादी नंबर वन’, ‘कभी बिबी कभी जासूस’ ह्या टि.व्ही. मालिकाही केल्या. मराठी चित्रपटसृष्टीत गाजविणा-या अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर या सध्या हिंदीतील ‘दिल्ली वाली ठाकूर गर्ल्स’, ‘एक नणंद की खुशियो की चाबी.. मेरी भाभी’, ‘ससुराल गेंदा फूल’ ‘कुछ रंग प्यार के एसे भी यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी आईची भूमिका साकारली आहे. सुप्रियाची स्टार प्लस वाहिनी वरील “तू तू – मैं मैं” या कार्यक्रमामधे सुनेच्या भूमिकेसाठी चाहत्यांची विशेष दाद मिळाली.

सुप्रियाने सचिनच्या साथीत नच बलिये पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले.सचिन पिळगावकर आणि ह्यांची जोडी ‘रील लाईफ’ मधून ‘रियल लाईफ’मध्ये एकमेकांची साथीदार झाली.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेटसंजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 1749 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सोलापूर घोंगड्या

सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या ...

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

Loading…