पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांनी ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. अरुण साधू हे नावाप्रमाणेच साधे होते. लेखक असल्याचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. ते केवळ पुस्तकांतच रमले नाहीत. अनेक पुरोगामी चळवळीत त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग होता. […]
महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी कोल्हटकर म्हणजे बाळ कोल्हटकर हे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू होते. नाटककारांच्या बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नटही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. हेच एका नाटककाराचे आणि नटाचे मोठेपण आहे. […]
नागपूरकडल्या परिसरातील एका सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या प्रेमानंद गज्वी यांना एकांकिका आणि नाट्यलेखनाने आकृष्ट केले. पुढे १९८०-१९८५च्या सुमारास ते मुंबईला आले आणि त्यांची प्रतिभा अधिकच पल्लवीत झाली. ‘देवनवरी'(१९८१), ‘तनमाजोरी'(१९८४), ‘वांझ माती'(१९८४), ‘जय जय रघुवीर समर्थ'(१९८८), गांधी-आंबेडकर(१९८८), ‘किरवंत'(१९९१), ‘पांढरा बुधवार'(१९९५) अशी एकाहून एक सरस नाटके त्यांनी लिहिली *आणि विद्यमान मराठी नाटककारांच्या मांदियाळीत त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले. […]
परमेश्वर कोणाला भरभरून प्रतिभा देईल सांगता येत नाही.काही जणांना आपल्याकडे प्रतिभेच लेणं आहे याची जाण असते तर काहीना आपल्याकडे प्रतिभा आहे याची जाणीवच नसते. सुदैवाने शांताबाईकडे ह्याची जाणीव फार लवकर झाली. कॉलेज मध्ये असतानाच शांताबाई कवितेकडे वळल्या. […]
मुले हेच घराचे बहुमोल अलंकार ,मुले हीच राष्ट्राची खरी संपत्ती ,मुले म्हणजे देवाघरची फुले अशा अनेक घोषणा आपण आज पर्यंत एकात आलो आहोत. पण बालसाहित्य निर्माण करून मुलांच्या सर्वांगीण विकास होऊन वाचनाची गोडी निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून बालकुमार साहित्य चळवळ निर्माण करणारे थोर बालसाहित्यिक म्हणजे अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ ! […]
मराठी साहित्यात कथा या प्रकारात अनेकांनी आपल्या लीलया लेखणीने खुमासदार शैलीतील कथा दीर्घ व लघु स्वरूपात साकारल्या. या पैकी मराठी लघुकथेचे स्वतंत्रयुग निर्माण करणारे सुप्रसिद्ध साहित्यिक म्हणजे ना. सी. फडके […]
लहानपणी फक्त एवढेच कळायचे की ते खूप विद्वान आहेत. दिवस-रात्र वाचन, लेखन करतात. History of Dharma Shastra हा जगप्रसिद्ध ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. केवळ शिक्षण-संशोधन नव्हे तर सतत पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे अशी थोर, महान, विद्वान व्यक्ती आणि आमचे ‘सख्खे शेजारी’ वाडीतील आम्ही सर्व जण त्यांना ‘काणे अण्णा’ च म्हणत असू. राहण्याचे ठिकाण म्हणजे, अर्थातच, – सुप्रसिद्ध, आंग्रेवाडी, दुसरा मजला, वि. पी. रोड, गिरगाव, मुंबई. […]
खरे तर आमच्या मो. ह. विद्यालयाची तुम्ही शान होता. अहो सगळेच शिक्षकाची नोकरी करतात आणि नोकरी करता करता फालतू राजकारणात गुंतून रहातात तसे तुम्ही केले नाहीत हे महत्वाचे तुम्ही शिक्षक होतात ‘ शिक्षक राजकारणी ‘ नव्हता हे महत्वाचे. कारण शिक्षक म्हटले की त्या छोट्या का होईना विश्वात राजकारण नावाची कीड घुसतेच , आता सगळीकडे घुसते , काळच बदलला आहे . […]
हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगात एस डी बर्मन, नौशाद, ओ पी नय्यर, शंकर जयकिशन, रोशन, रवी, सी रामचंद्र,खय्याम आदि अनेक मातब्बर संगीतकार आपल्या एका पेक्षा एक सुंदर आणि श्रवणीय रचनांनी रसिकांना तृप्त करीत होते. अशा स्पर्धेच्या काळात हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात आपल्या अनोख्या संगीताचा ठसा उमटवणे सोपे नव्हते. अशा स्पर्धेच्या युगात मदन मोहन यांनी आपली संगीतकाराची कारकीर्द सुरु केली आणि अल्पावधीतच त्यांनी आपल्या अनोख्या अशा संगीत रचनांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. एक प्रथितयश संगीतकार म्हणून अल्पावधीत त्याचं नाव मोठ्या आदराने घेतलं जाऊ लागलं….. […]