नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

‘इंडियन’ राष्ट्रीयत्वाचे कारस्थान…

आज नवीन पिढी मराठी वापर कमी करीत आहे, त्यांचा मराठी शब्दसंग्रह कमी होत आहे…मराठी भाषेत चांगले साहित्य फार कमी प्रमाणात निर्माण होत आहे.. आणि मला हा सर्व एखादया कारस्थानाचा भाग वाटतो आहे.. मी कितीही बुद्धिवादी असलो तरी मी मराठी भाषा, मराठी संस्कृती, आणि मराठी समाज यांच्या ऱ्हासाचा विचार सुद्धा करू शकत नाही… तो भाग माझ्या भावनेचा आहे आणि तिथे माझा बुद्धिवाद तोकडा पडतो हे मला मान्य आहे. […]

गणपती बसवला म्हणून बौद्ध धर्मातून बहिष्कृत!

गणपती बसवला म्हणून बौद्ध धर्मातून बहिष्कृत..! घटनेतील धर्म स्वातंत्र्य धोक्यात येतंय का..? कोणत्याही धर्मातील लोक देवाला का मानतात हो? कारण त्यांची देवावर श्रद्धा असते. प्रत्येक धर्माची आपल्या देवावर श्रद्धा बाळगण्याची वेगवेगळी पद्धती असते. त्याचप्रमाणे हिंदू धर्मामध्ये लोक आपल्या देवाची मूर्तीपूजा करून देवाप्रती असलेली आपली श्रद्धा दर्शवतात. त्यात वाईट असे काही नाही. […]

आडनांवं आणि जात – ही जोडी फोडणं अावश्यक

आपल्या समाजाच्या सर्वच थरात जात इतकी मुरली आहे, की बस्स.! कोणतीही व्यक्ती भेटली आणि तिने आपला परिचय दिला की आपल्या मनात नकळत तिच्याविषयी वेगवेगळी क्यॅल्क्युलेशन्स चालू होतात. क्षणमात्रात नकळत घडणाऱ्या या प्रक्रियेत जात हा महत्वाचा मुद्दा असतो हे कोणीही प्रामाणिक माणूस नाकारणार नाही.. उदा. कोणत्याही कार्यालयात, विशेषत: सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त जाणं झाल्यास, ज्या अधिकाऱ्याकडे आपलं […]

“माणूस” म्हणून….!

मी “बाबासाहेबांवर” काही लिहिले.. लाेकांनी मला फोन करून विचारले “तुम्ही बौध्द किंवा दलित आहात का…?” मी आपल्या ” शिवछत्रपतींवर”काही लिहिले.. लाेकांनी मला फोन करून विचारले “तुम्ही मराठा आहात का…?” […]

कोणते देव ? कोणते संत ? ‘बाबा’गिरी कायद्याने बंद करा!

‘बाबा’ राम रहिमला वीस वर्षांची सजा ठोठावली हे ठीक झाले, पण आतापर्यंत ज्या राजकीय पक्षांनी अशा बाबांचा पाठिंबा घेऊन मते मिळविली त्यांच्या नैतिकतेचे काय? पैसा व संपत्ती हेच धर्म आणि अध्यात्माचे अधिष्ठान होत आहे. संत कोण व देव कोण याच्या व्याख्या ठरवा नाहीतर सर्वच धर्मांतील बाबागिरीवर कायद्याने बंदी घाला…! […]

स्त्री- मुक्ती…

आता तिच्या आणि माझ्या प्रेमाच भविष्य कोणाच्या हातात आहे ? डबक्याच्या, डबक्यातील पाण्याच्या , सूर्याच्या की पावसाच्या ? ती ज्या डबक्यात आहे ते डबकं म्हणजे प्रेम आहे त्या डबक्यातील पाणी म्हणजे जीवन आहे आणि सूर्य म्हणजे जीवनातील समस्या आहेत आणि पाऊस म्हणजे जगण्यातील मोह आहे. या डबक्याच्या बाहेर मी जेथे आहे ती एक पोकळी आहे अर्थशून्य जगण्या मारण्या पलीकडील ! जगाच्या दृष्टीने मी जिवंत आहे पण मी कधीच मेलोय! ज्या दिवशी ती त्या डबक्यातून बाहेर येईल माझ्यासाठी स्वतःच्या सामर्थ्यावर तो दिवस तिच्याच काय संपूर्ण स्त्री जातीच्या मुक्तीचा दिवस असेल….स्त्री मुक्तीचा दिवस असेल … […]

शब्द, अक्षर, भाषा : पुन्हां चारोळी, मुक्तक

कांहीं काळापूर्वी मी ‘कृपया चारोळी म्हणूं नका’ अशा शीर्षकाचा लेख ‘मराठीसृष्टी’ वेबसाइटवर अपलोड केला होता. त्यात मी असें प्रतिपादन केलें होतें की जसें हास्यरसप्रधान गझलला ‘हझल’ असें (वेगळें) अभिधान मिळालेलें आहे . ( हल्लीच गझल-सागर प्रतिष्ठाननें  हझल-संग्रह प्रकाशित केला आहे) . आपण हास्यप्रधान लघुकाव्याला ‘चारोळी म्हणायला हरकत नाहीं ;  पण गंभीर, विचारप्रवर्तक, चिंतनपर अशा लघुकाव्याला चारोळी’ […]

‘खुलासा’ गोंधळ आणि गैरसमज वाढवणार्‍या गोष्टींचा

पुर्वीची काठी घेऊन साप मारण्याची “पोज” आणि आजची “स्टीक” घेऊन सेल्फी काढण्याची पोज, दोघही सारख्याच वाटतात… फक्त सापाची जागा आपल्या मुखचंद्राने घेतलीये… पुर्णविरामांनी संपणारी आमची वाक्य् आता प्रश्नार्थक चिन्हांनी संपायला लागलीयेत, आयुष्यात पुढे सरकताना विराम कमी होत् असावेत् अन् प्रश्न वाढत् असावेत्… […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग – ११ / ११

निष्कर्ष आणि समारोप : मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, व त्यामुळे अनेकविध पद्यांमध्ये विविध संदर्भांनी मृत्यूचा उल्लेख येतो. या विषयावरील काव्यात काय आवश्यक आहे, तर, भावनेची आर्तता, कांहीं दार्शनिक (philosophical ) मननचिंतन, समाजभान-संबंधित विवेचन, किंवा असाच कांहींतरी ‘संजीदा’ ( गंभीर, serious ) विचार. त्यासाठी, नवनवीन प्रतिमा व उपमा-रूपक यांसारखे अलंकार अत्यावश्यक  (a must) वाटत नाहींत […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग – १० / ११

जीवन , प्रेम , आनंद , वगैरे  ;  आणि मरणोच्चार  : मरणाचा विचार-उच्चार can be with reference to a number of things, मग तें जीवन असो, प्रेम असो, राष्ट्रभक्ती असो,  वा अन्य कांहीं असो. आपण कांहीं उदाहरणें बघूं या. Life hurts a lot More than Death. – Death is not the greatest loss in life ! […]

1 93 94 95 96 97 134
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..