नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

आयुष्याची प्रश्नपत्रिका…

आपल्या प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे शेवटच्या क्षणापर्यन्त सोडवायची एक प्रश्नपत्रिका असते.या प्रश्नपत्रिकेसाठी अमुक एक विशिष्ठ असा विषय नसतो वा कसल्याही स्वरूपाचा अभ्यासक्रम आखलेला नसतो.प्रत्येकाची प्रश्नपत्रिका जरी वेगवेगळी असली तरी काही असे प्रश्न असतात कि ते एकमेकांच्या मदतीने सोडवावे लागतात..आणि तशी आपल्याला मोकळीकही दिलेली असते..काही काळाची मर्यादा घालून.आपण तेवढ्या निर्धारित वेळेत सोबत्यांच्या साथीने त्या प्रश्नांना सामोरे जायचे असते.काही […]

छत्रपती संभाजी महाराजांचा अमानुष वध आणि नववर्ष शोभा यात्रा ?

आम्हाला सांगण्यात आले कि राम वनवासातून आयोध्येत याच दिवशी परत आले म्हणून आपण गुढ्या तोरणे उभारतो. पण निषिद्ध असलेल्या बांबूवर ,कडू लिंबाचा पाला लावून ,पालथा तांब्या हे सर्व अशुभ एकत्रित करून “गुढी उभारली जाते हा काय आनंदोत्सव आहे ? खुद्द आयोध्येत अथवा उत्तरेकडील कुठल्याही राज्यात अशी गुढी उभारली जात नाही . […]

ब्लादिमीर लेनिन आणि नाशिक ते मंत्रालय !

आज आपण कामगारविषयक जो कायदा वाचत आहोत त्या कायद्याचा प्रणेता लेनिन होता हे सध्या किती कर्मचा-यांना माहित आहे? सेवानिवृत्ती नंतर मिळणारे फायदे , ज्यात प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी याचा समावेश होतो आणि त्यावर करही लागत नाही हे पण कामगार संघटना आणि त्यांच्या मागण्यांवर तत्कालीन सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने झालेले आहे. या कामगार संघटना जगभर लेनिन आणि त्याच्या कॉम्रेड्सच्या प्रेरणेतून उभ्या राहिल्या आहेत. […]

रैना

बिती ना बिताई या गाण्याचं नि माझं नातं […]

महिला दिन – वाचा आणि विचार करा

‘महिला दिन’ प्रत्यक्ष साजरा करा अथवा करूं नका, पण समाजातील पुरुष व स्त्री या दोन्ही घटकांनी ‘fair treatment’ चा मंत्र सदैव ध्यानात ठेवणें मात्र गरजेचें आहे. तोच समाजसुधारणेचा गाभा आहे. […]

महाराष्ट्र, मराठी माणूस आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी

मराठी माणसाला भांडल्याशिवाय काहीच मिळालेलं नाही हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिन्दवी स्वराज्यापासून ते मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रापर्यंत मराठी जनांनी सर्व भांडूनच मिळवलंय. फक्त दुर्दैव येवढच, की आता मराठी भाषेसाठी स्वत:ला मराठी म्हणवणाऱ्या लोकांशीच भांडायची वेळ आली आहे. […]

वैज्ञानिक दृष्टीकोन

‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ हा हल्ली वाक्प्रचार म्हणून वापरला जातो असं माझं मत आहे. आपल्याला न पटलेल्या गोष्टींवर हा वाक्प्रचार एखाद्याच्या तोंडावर फेकून मारला, की मग पुढची चर्चाच खुंटते. […]

ज्ञानेश्वरांचें साहित्यिक रूप : एक विविधांगी चिंतन : भाग – १

ज्ञानेश्वर मोठे संत होते, तसेच ते मोठे दार्शनिक (तत्वज्ञानी) सुद्धा होते. आणि ( त्यांच्या रचना वाचून असें जाणवतें की) ते विविधरंगी साहित्यिकही होते. ज्ञानेश्वरांचा विचार करायचा तर त्यांचें तत्वज्ञान, अध्यात्म वगैरे पुढें येणें अपरिहार्य आहे . मात्र , या क्षेत्रातील प्रस्तुत माझें ज्ञान ‘शून्य के बराबर’ आहे. त्यामुळे अध्यात्म-तत्वज्ञान वगैरे विषयांवर सखोल चर्चा करायची धृष्टता मी करूं शकत नाहीं, कारण ( हिंदीत म्हणतात, त्याप्रमाणें ), ती ‘अनधिकार चेष्टा’ (प्रयत्न) होईल. आपली चर्चा मुख्यत: साहित्यिक अंगानें जाणार आहे . तिच्यात, अध्यात्म-तत्वज्ञान यांचें जें कांहीं विवरण येईल, त्यासाठी मी (अर्थातच) ज्ञानवंतांचा आधार घेललेला आहे. त्यात, जें कांहीं ज्ञान असेल, त्याचें ‘क्रेडिट्’ त्या-त्या ( नेम्ड् ऑर् अन्-नेम्ड् ) ज्ञानवंतांचें ; आणि रेफरन्स् च्या, अर्थाच्या, व इंटरप्रिटेएशनच्या ज्या कांहीं चुका असतील , त्यांची जबाबदारी माझी, हें सांगायला नकोच. […]

शिवजयंती : माझ्या लहानपणीची आणि आताची आणि आपण सारे..

महाराजांची जयंती कधी साजरी करावी हा वादाचा मुद्दा होताच कामा नये. मला तर वाटतं महाराजांची जयंती रोज साजरी करावी. ती मनातल्या मनात साजरी करावी. अशी रोज साजरी केलेली शिवजयंती उत्सवी नसावी, तर वागणुकीतून असावी. महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शावर आपण आधुनिक काळात वागतोय की नाही, याचं भान ठेवून आपलं दररोजचं वागणं असलं, की मग ही शिवजयंती रोजच्या रोज साजरी होईल..महाराजांच्या नांवाला आणि इभ्रतीला धक्का लागेल असं आपलं वागणं असता कामा नये याची दक्षता प्रत्येकाने घेतली, क मग वेगळी शिवजयंती साजरी करण्याची गरजच भासणार नाही.. […]

1 92 93 94 95 96 140
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..