नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

मै सूर्य हूॅं..

आपण सारे सूर्य आहोत हा विश्वास नेहेमी मनाशी बाळगून चालत राहा, अस्त झाल्यासारखा वाटणं, चंद्र-पृथ्वींने सूर्य गिळल्यासारखा वाटणं हा दृष्टीभ्रम असतो, सूर्याला अस्त नाहीं, त्याला ग्रहण नाही. आणि अर्थातच आत्मा अमर असतो असं मानणाऱ्या आपल्यासारख्या सूर्याच्या अंशांनाही अस्त नाही, ग्रहण नाही..बस चालत राहा, चालत राहा..!! […]

आजचा राम

विजयादशमी. आपल्या साडेतिन मुहुर्तापैकी एक महत्वाचा मुहुर्त. श्रीरामाने रावणाचा वध केलेला दिवस. रामाने-रावणाचा केलेला वध म्हणजे चांगल्याने वाईटावर मिळवलेला विजय. या दिवशी अनेक ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या धामधुमीत साजरा होतो. पण होतं काय, की आपण सर्वच या एका दिवसापुरते राम बनून छाती काढून चालत असतो; बाकीच्या दिवशी मात्र आपण साक्षात रावणही लाजेल अशी कृत्य उजळमाथ्याने करत असतो. उजळमाथ्याने याचा अर्थ अगदी उघडपणे, निर्लज्जपणे. कारण आपल्याला रामाचा चेहेरा धारण करायला आवडतं परंतू काम मात्र रावणाचं करायला आवडतं. […]

बेशिस्त मुंबईकरांची एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर आत्महत्या ?

काल परळला २२ मुंबैकरांनी परळ-एलफिन्स्टनच्या रेल्वेपुलावर आत्महत्या केली. म्हणजे असा निश्कर्ष सरकारी वकिलपत्र घेतलेल्या लोकांच्या पोस्टवरून काढावा लागतो. एका विदुषीने, तिने कशी स्वत:ची सुटका करून घेतली आणि मेलेल्या इतरांनी कसा अफवांवर विश्वास ठेवून आत्महत्या केली त्याचं छान वर्णन केलंय, ते इतकं प्रभावी आहे की, मला या लेखाला ‘बेशिस्त २२ मुंबईकरांची आत्महत्या’ असं शिर्षक देण्याशिवाय मला गत्यंतरच […]

बुलेट ट्रेन : महाराष्ट्राला फायदा काय ?

दि.१४ सप्टेंबर २०१७ रोजी गुजरातमध्ये साबरमतीजवळ मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मध्ये महाराष्ट्राचा नक्की काय फायदा होणार आहे…? महाराष्ट्रातील उद्योजक आणि शासनाने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधून हा ट्रॅक सुरु होईल. महाराष्ट्रात ४ तर गुजरात मध्ये ८ स्टेशन्स घेत बुलेट ट्रेन […]

परळला गेलेले दसर्‍याचे नरबळी

पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणाऱ्या एल्फिन्स्टनला जोडणाऱ्या पुलावर आज अपघात झाला. असा काही अपघात झाला, की ‘दुर्दैवी’ म्हणतो, फेसबुकवरच श्रद्धांजली वैगेरे वाहतो आणि पुढच्या मिनिटाला सर्व विसरून आपल्या कामाला लागतो. असं काही घडलं, की आपल्याला पुन्हा काही वेळासाठी जाग येते, ती थेट पुढच्या अपघाताच्या वेळेसच. पुढचा अपघात आताच सांगून ठेवतो, मध्य रेल्वेवरचा ‘करी रोड’ स्थानकाची जागा. […]

श्राद्धामागील ‘श्रद्धा’

या लेखातून संतांनी श्राद्ध करावं की नाही यावर प्रकर्षाने कटाक्ष टाकला आहे. ब-याच वेळेस श्राद्ध करावं की नाही हा लोकांसमोर प्रश्न असतो त्याचं उत्तर देणारा हा लेख. […]

नक्की काय करावं?

कुणी नोंद घेतलीय की नाही हे कळायला काही मार्ग नाही, पण गेले काही दिवस एक जाहिरात इलेक्ट्राॅनिक मिडीयावर झळकतेय. ही जाहिरात आहे ‘सहारा श्री’ श्री. सुब्रतो राॅय सहारा यांची. तेच सुब्रतो राॅय सहारा, ज्यांच्यावर गुंतवणूकदारांचे हजारो करोड रुपये लुटल्याचा आरोप सिग्ध झालाय. त्यांचा गुन्हा सिद्ध होऊन त्यांना कारावासही भोगायला लागलाय. त्यातही त्यांचा आडमुठेपणा सुरुच होता. विविध कारणं दाखवून त्यांनी गुंतवणूकधारकांच्या पैशांतून खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तांचा लिलाव टाळण्याचे त्यांचे उद्योग सरु आहेतच. याला माज म्हणतात आणि हा माज सुप्रिम कोर्टाने बरोबर ओळखून त्यांना काट्यावर पकडलंय आणि कोर्ट त्यांना वेळोवेळी फटकारतंयही. […]

नवरात्र – उत्सव सृजनाचा

आपले सर्वच महत्याचे सण ज्येष्ठ ते भाद्रपद या महिन्यांत येतात. हे चार महिने पावसाचे. आपला देश पुर्वापार कृषी प्रधान. आजही आपल्या देशातील बहुतांश शेती पावसावरच अवलंबून आहे. पावसाच्या या चार महिन्यांतच आपले सण का असावेत याचं उत्तर शेती आणि पाऊस यांच्या संबंधातच आहे. […]

देशभक्तीचा दीक्षामंत्र ‘वन्दे मातरम्’चे असाधारणत्व

‘वन्दे मातरम्’ ज्या ‘आनंदमठ’ कांदबरीचा भाग आहे, ती एका ऐतिहासिक सत्य घटनेवर आधारित कादंबरी आहे. ती ऐतिहासिक घटना ‘संन्याशांचा उठाव’ म्हणून भारतीय इतिहासात प्रसिद्ध आहे. हा उठाव वर्ष १७६२ ते १७७४ या काळात बंगालमध्ये झाला होता. […]

मुंबईकरांच्या एकात्मतेला सलाम !

मुंबईकरांनी आत्तापर्यंत बऱ्याच चांगल्या/वाईट गोष्टी अनुभवल्या आहेत, त्याची झळ सोसली आहे. त्याच्या कारणांनी एकमेकांशी वैर साधलेले बघितले आहे, अबोला बघितला आहे, दंगली अनुभवल्या आहेत. पण कालच्या पावसाने मुंबईकरांचे आणि चाकरमान्यांचे जे हाल झाले आणि त्यातून त्यांना झालेला मनस्ताप, गैरसोयींना सामोरे जातांना बघितले आणि क्षणभर वाटले हाच तो मुंबईकर का? […]

1 90 91 92 93 94 132
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..