पद्य आणि मृत्युविचार : भाग – ११ / ११

निष्कर्ष आणि समारोप :

मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, व त्यामुळे अनेकविध पद्यांमध्ये विविध संदर्भांनी मृत्यूचा उल्लेख येतो. या विषयावरील काव्यात काय आवश्यक आहे, तर, भावनेची आर्तता, कांहीं दार्शनिक (philosophical ) मननचिंतन, समाजभान-संबंधित विवेचन, किंवा असाच कांहींतरी ‘संजीदा’ ( गंभीर, serious ) विचार. त्यासाठी, नवनवीन प्रतिमा व उपमा-रूपक यांसारखे अलंकार अत्यावश्यक  (a must) वाटत नाहींत ;  अर्थात् , असले,  व त्यांमुळे जर सौंदर्य वाढलें, तर कांहींच  हरकत नाहीं . मुख्य म्हणजे, काव्य मनाला भिडलें, त्यानें विचारप्रवृत्त केलें की, तें वाचकांच्या हृदयापर्यंत पोंचतें, आणि तेथें जीवित रहातें.

म्हणूनच ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके म्हणतात –

असेन मी नसेन मी तरी असेल गीत हें.

  • ( एक भावगीत)

 

उर्दूचा एक शायरही हेंच वेगळ्या शब्दांत सांगतो –

हम तो मरकर भी किताबों में रहेंगे ज़िंदा

ग़म उन्हीं का है, जो मर जाएँ तो गुज़र जाते हैं ।

 

अखेरीस  :

तुमच्यामाझ्यासाठी,  Zen-Priest Tai Sheridan  याचें चिंतन मार्गदर्शक ठरावें –

Until you relax

in the core of yourself,

it is impossible to

make peace with death.

 

या ओळींची तुलना याच काव्यातील एका अन्य कडव्याशी करावी, जें आधी ( भाग -२ मध्ये ) दिलेलें आहे.

In the still waters, golden light

may you imbibe the gentle truth

Relax, you are going to die.

मरण, जें टळणें अशक्य आहे, त्याचा मनोमन स्वीकार करणें , एवढेंच आपल्या हातात असतें ; आणि तसें केल्यानें आपलें जीवन सु-सह्य तर होईलच ; पण तें सु-फल होईल, सु-शांत होईल. मृत्यूविषयींच्या काव्यातून आपण एवढें शिकूं शकलो तरी पुरें.

 

(संपूर्ण)

— सुभाष स. नाईक
Subhash S. Naik

 सुभाष नाईक
About सुभाष नाईक 211 लेख
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची तीन पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. ‘The Earth In Custody’ हे पुस्तक ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी कवितांचें पुस्तक आहे. इतर दोन पुस्तकें ही, ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. महाराष्ट्र टाइम्स, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर आणि इतर अनेक वृत्तपत्रांत/नियतकालिकांत, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…