नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

कूछ तो लोग कहेंगे

 माणूस हा सामाजिक प्राणी आहे. आपली जडण घडण देखील या समाजात झाली आहे… आपण सर्व या समाजाचे भाग आहोत आणि या समाजात राहणाऱ्या लोकांची आपण जरा जास्तच पर्वा करतो. आम्हाला नेहमी अशी भीती असते ही लोकं काय म्हणतील पण आपण विसरलो की आपल्या त्रास आणि संघर्ष या मध्ये हे  लोकं कधीच आपल्या सोबत नसतात. […]

‘पायऱ्या’ चढता चढता !

सत्य घटना आहे ही  . साधारण वीस ,बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट . भराभर पायऱ्या चढणारी मी एकदम सावध झाले . हळूच डावीकडे, उजवीकडे, पाठी मला कोणी बघत तर  नाही ना  ?  कोणी ओळखीचे दिसले नाही, असे पाहून मी पटकन आत शिरले . […]

अनावश्यक भागांच्या मालिका..

आजकाल संस्काराची लक्ष्मणरषा सगळेच पाळत नाहीत. संस्कार करणारी माणसे जरी कमी झाली तरी चित्रपट, वाहिन्यांची ही जबाबदारी ठरतें की त्यांनी त्या माध्यमातून संस्कार करावेत. पूर्वीच्या चित्रपटांनी आम्हाला हसविले, आम्हाला रडविले त्यातून सामाजिक आशय दिला, करमणूक, वैचारिक प्रबोधन केलं ते आज कुठे गेल? विषय आणि आशय नसलेल्या माध्यमातून विषयांची सध्या चलती आहे. कुटुंबासमवेत आज काही पाहताच येत नाही. कुटुंबाकडे, प्रत्येकाच्या समस्ये कडे ही आज पाहता येत नाहीं.जो तो आपल्यात मग्न आहे. […]

क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर समजून घेताना : भाग २

खरा इतिहास आणि क्रांतिकारकांचं हौतात्म्य , इतिहासकारांनी जसंच्या तसं मांडायला हवं होतं .पण खऱ्या इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात आलं की पुढच्या पिढीला स्वातंत्र्यलढ्याचा दैदिप्यमान इतिहास कळू नये अशीच व्यवस्था केली गेली आहे . खऱ्या खोट्याची भेसळ करून उत्तुंग व्यक्तिरेखांना हिणकस ठरवलं जात आहे . परकीय आक्रमकांना नायक ठरवण्याची घाई झाली आहे . […]

क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर समजून घेताना : भाग १

विनायकानं स्वतःच्या मनाला बजावलं आणि पाठून ढकललं गेल्यानं जाणारा तोल सावरला आणि प्राणांतिक यातना हसत सहन करत कसाबसा बोटीतून होडक्यात आणि होडक्यातून हिंदुस्थानच्या दक्षिण भूमीवर उतरला .
कसंबसं स्वतःला सावरत ,खाली वाकून हिंदुस्थानच्या भूमीवरची माती भाळावर लावली . […]

समाधान

संत तुकारामांच्या अभंगओवीत मानवी जीवनाच संपुर्ण सार पूर्णार्थाने व्यक्त झालेलं आहे. ज्याला जीवनाचा खरा अर्थ समजला आहे आणि म्हणूनच कर्ताकरविता तो एकची भगवंत आहे आणि त्या भगवंतावर श्रद्धा ठेवून तो माणूस सुखी समाधानी जीवन जगतो आहे हेच एकमेव सत्य आहे . याचाच अर्थ आपण स्वतः जीवनात सुखी समाधानी असणं महत्वाचं आहे. […]

काश्मीर एक जाणीव – भाग पाच

तत्कालीन राज्यकर्ते, त्यांचे राजकारण, त्यांची स्वार्थी आणि संकुचित दृष्टी, त्यांच्या विकल्या गेलेल्या निष्ठा, जमिनीवर आणि स्त्रियांवर केलेले अत्याचार, नृशंस हत्याकांडे, देशभक्तांच्या हत्या, सांस्कृतिक वैभवावरचे भीषण आघात, प्राचीन मंदिरांचा विध्वंस, हिंदूंवर विशेषत: पंडितांवर केलेले क्रूर अत्याचार, बलात्कार अशा कित्येक कहाण्या वाचायला मिळाल्या होत्या. […]

काश्मीर एक जाणीव – भाग चार

अवंतीपूर ! एके काळची काश्मिरची राजधानी . श्रीनगर ही काश्मिरची राजधानी होण्याअगोदरची नितांतसुंदर राजधानी ! समृध्दी , सौंदर्य , सौहार्द , सात्विकता यांचे मूर्तिमंत प्रतीक ! कलात्मकता , काव्यात्मकता , कौशल्य , कणखरपणा यांचा अद्वितीय संगम ! राजाधिराज अवंतीवर्मन यांनी आठव्या शतकात वसवलेली अद्वितीय , अप्रतिम राजधानी ! चिनार , देवदार सारख्या दीर्घायुषी वृक्षांची जाणीवपूर्वक केलेली […]

काश्मीर एक जाणीव – भाग तीन

कांद्याच्या गरमागरम भज्यांबरोबर , तुम्ही कधी वाफाळता चहा घेतला आहे ? हा काय प्रश्न झाला का ? असं कुणालाही वाटेल . आणि खरंच आहे ते . पण मंडळी , आता त्यात सुधारणा करतो . सभोवताली मायनस तापमान असताना , तलावाच्या पाण्यात हात घातल्यावर थंडपणामुळे बधिरता आलेली असताना , दातावर दात आपटत असताना , कुठल्याही वस्तूला हात […]

काश्मीर एक जाणीव – भाग दोन

काश्मीरला येण्यापूर्वी मी अनेक वेळेला काश्मिरच्या इतिहासाची , अन्यायाची , संघर्षाची , दुर्दैवी काश्मिरी पंडित आणि त्याहून दुर्दैवी असणाऱ्या काश्मिरी भगिनींवर झालेल्या क्रौर्याच्या हकिगतींची , संतापजनक वर्णनं वाचली होती . […]

1 7 8 9 10 11 134
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..