नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

सर्वसामान्यत्वाचे “दिगू “करण !

मी शक्यतो राजकारण किंवा राजकारणी व्यक्तीसंदर्भात लिहीत नाही. कोणी मला पाठविले/ टॅग केले तर प्रतिसादही देत नाही. माझी (बरीवाईट) मते माझ्यापाशी. जसे आपण निवडणुकीत ज्याला द्यायचे त्यालाच मत देतो, पण दारी आलेल्या प्रत्येक पक्षाचे/उमेदवाराचे मान डोलावून स्वागत करतो, तसे माझे हे वागणे ! पण गेले काही महीने देश/राज्य पातळीवर जे काही चाललं आहे/ दिसतं आहे, वाचनात येत आहे, ऐकू येत आहे ते अस्वस्थ करणारं आहे. […]

भावनाशून्य माणूस

बसमधून प्रवास करताना रहदारीमुळे बस काही काळ रस्त्यावर थांबली असता मी सहज खिडकीतून बाहेर रस्त्याच्या कडेला पाहीलं तर एक दारू प्यायलेला बिगारी काम करणारा कामाठी आपल्या बायकोला बेदम मारहान करत होता. आणि ती निमुटपणे त्याचा प्रतिकार न करता त्याचा मार खात होती. […]

शेतकरी आंदोलनाचे आंतरराष्ट्रीयकरण

दिल्लीच्या सरहद्दीवर सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला दिवसेंदिवस वेगवेगळे वळण मिळत आहे. इतके दिवस शांततापूर्ण रीतीने सुरू असलेल्या या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी हिंसेचे गालबोट लागले. आता हे आंदोलन गुंडाळले जाणार! असे वाटत असतानाच शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या अश्रूंनी आंदोलनाला नवीन ऊर्जा मिळून दिली आणि आंदोलन पुन्हा जोमाने सुरू झाले. आता तर या आंदोलनाचे ट्विटरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे. […]

जाडेपणा – एक समस्या…

आपल्या देशात सौंदर्याच्या ज्या परिभाषा आहेत त्याच मुळात चुकीच्या आहेत. त्या परिभाषेतूनच परीचा जन्म झालेला असावा. सुंदर स्त्री म्हणजे सडपातळ ! आणि जाडी स्त्री म्हणजे कुरूप आणि म्हणता येणार पण दुर्लक्षित करावी अशी. सध्या हा विषय ऐरणीवर आलाय त्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. […]

जीवनाची गुणवत्ता !

१९५० पासून जीवनाची गुणवत्ता आणि त्याची मोजदाद याबाबत मानसशास्त्रात विचारमंथन सुरु आहे. प्रत्यक्षात २००३ मध्ये जॉन फ्लॅनागन (John Flanagan) या अमेरिकन मानस शास्त्रज्ञाने एक प्रश्नावली सुचवली- […]

संत

संतांचे माहात्म्य साध्या फूटपट्ट्यांनी मोजता येत नाही. त्यांच्या सान्निध्यात केलेल्या ध्यानाने सर्व शंका दूर होतात आणि “आतील “दिवे प्रज्वलित होतात. संतांचे जीवन प्रेरणादायी असते, त्यांच्या पावलावर पाऊल टाकल्याने मुक्ती मिळते. त्यांच्यातील अध्यात्मिक स्पंदनांनी आपला भवताल स्वच्छ होतो. संत असे सारभूत असतात. […]

निरंजन – भाग ४२ – अहंकाराला चुकीची कबुली नसते

एका राज्यामध्ये एक सुप्रसिद्ध नामवंत मूर्तिकार राहत होता. त्याचे नाव होते. इंद्रजीत… मूर्ती घडविण्याचे अप्रतिम कौशल्य त्याच्याजवळ होते. तो अगदी हुबेहूब आणि जिवंत मुर्त्या घडवित असे. त्याच्या कलाकौशल्याला परदेशातही मागणी होती. राज्यात कित्येकदा त्याला त्याच्या या कलेबद्दल पुरस्कार मिळाला होता. […]

आभाळाएवढा !

त्यानं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि तो एकदम मोठा होऊन गेला . मोठा म्हणजे अगदी खूपच मोठा . आभाळा एवढ्या उंचीचा आणि समुद्रएवढ्या खोलीचा . अर्थात उंची होतीच पहिल्यापासून पण कुणाला दिसली नव्हती . अर्थात चिरपरिचित असल्यानं ती कुणाला जाणवली नव्हती . […]

विज्ञान मराठी : विज्ञानविषयक मजकूर

विज्ञानविषयक मजकूर छापतांना पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत बर्‍याच अडचणी येतात. सर्वमान्य पारिभाषिक शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होतो. अुदा. ‘बॉयलिंग पॉअिंट’ या अिंग्रजी शब्दास ‘अुत्कलनबिंदू’ हा सर्वमान्य शब्द आहे. फार तर ‘अुत्कलनांक’ किंवा ‘अुकळांक’ हे शब्द वापरले तरी चालण्यासारखं आहे. पण ‘बुदबुदांक’ हा शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होणार नाही. कोणताही द्रव अुकळत असतांना बुदबुद असा आवाज येतो हे खरं आहे. […]

निरंजन – भाग ४१ – इच्छा मार्ग दर्शवते

इच्छा असेल तर मार्ग दिसेल. जेव्हा मनातून एखादी इच्छा प्रकट होते, मग ती काही मिळवण्यासाठी असो किंवा काही घडवण्यासाठी असतो, त्या इच्छेला मार्ग आपोआपच खुला होत जातो. इच्छा चांगली असेल, तर आपले आणि आपल्यासोबत इतरांचेही चांगलेच घडते. पण इच्छा वाईट असेल तर मात्र दुसर्‍यांसोबत आपलेही वाईट घडते. अशीच एक इच्छेला मार्ग दर्शवणारी ही कथा… […]

1 52 53 54 55 56 133
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..