नवीन लेखन...

जाडेपणा – एक समस्या…

पूर्वी कधीतरी आपण जिच्यावर प्रेम करत होतो म्हणजे ती परी असताना ! परी म्हणजे सडपातळ गोरी सुंदर तरुणी. अर्थात तिने आपल्या प्रेमाचा स्विकार केलेला नसतो पण ती आपलं पहिलं प्रेम वगैरे असते. कधी –  कधी आपण तिच्या आठवणीत काही वर्षे काढतो पण नंतर तशीच कोणीतरी परी आपल्याला मिळावी म्हणून आपल्या पोटाचा घेर शक्यतो आपण वाढून देत नाही आणि अचानक काही वर्षांनी ती आपल्या स्वप्नातील परी आपल्या समोर येते पण आता ती बऱ्यापैकी स्थूल झालेली असते म्हणजे सहज ओळखू न यावी इतकी ! त्या क्षणी पुरुषांना जो आनंद म्हणजे असुरी आनंद होतो तो शब्दात व्यक्त होऊच शकत नाही. तो तिने तेव्हा याच्या प्रेमाचा स्विकार केला नाही म्हणून देवाचे आभार मानू लागतो. आता ती त्याच्या स्वप्नातील परी नसते फक्त असते ती एक जाड बाई ! जिला आठवून आता तो मनातल्या मनात हसत असतो तिच्या जाडेपणावर , म्हणजे स्वप्नातील परीची जागा जाडी ने घेतलेली असते. या बाबतीत काही पुरुष स्वतःला नशीबवान तर काही दुर्दैवी समजतात. दुर्दैवी पुरुषात बहुसंख्य विवाहित पुरुषच असतात. मग  ते पूर्वीची त्यांची स्वप्नातील परी आठवून आज परीची जाडी झालेले बायको पाहून आसवे गाळतात आणि चित्रपटातील पऱ्या पाहात आपल्या भूतकाळातील तिला आठवत राहतात ती त्याच्या शेजारी बसलेली असतानाही.

              आपल्या देशात सौंदर्याच्या ज्या परिभाषा आहेत त्याच मुळात चुकीच्या आहेत. त्या परिभाषेतूनच परीचा जन्म झालेला असावा. सुंदर स्त्री म्हणजे सडपातळ ! आणि जाडी स्त्री म्हणजे कुरूप आणि म्हणता येणार पण दुर्लक्षित करावी अशी. सध्या हा विषय ऐरणीवर आलाय त्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. सध्या मराठी टी. व्ही. चॅनेलवर सुरू असणाऱ्या काही मालिकेतील नायिका जाड्या दाखविल्या आहेत म्हणजे त्यांच्या भोवतीच मालिकेचे कथानक गुंफलेले आहे थोडक्यात सांगायचे तर स्त्रियांच्या जाड असण्याचं न्युनगंड बाळगण्याची गरज नाही हे पटवून देण्याचा अट्टहास केला जातोय असं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही. निरोगी जाड शरीराचे समर्थन करता येईल पण रोगी जाड शरीराचं समर्थन नाही करता येणार. जाड असणं हा काही गुन्हा नाही किंवा त्याला शारीरिक व्यंगही नाही म्हणता येणार. फक्त सौंदर्याचा विचार केला तर जाड स्त्रियाही खूप सुंदर दिसतात. त्यांचे सौंदर्य पुरुषांना आकर्षित करते पण त्यांचे सौंदर्य त्यांच्या जाडेपणाखाली गाडले जाते. भारतीय लोकांना जाडेपणात सौंदर्य शोधण्याची सवयच नाही. जगात असं ही एक ठिकाण आहे की तिथे ज्या पुरुषाचे पोठ सर्वात जास्त वाढलेलं असेल त्याचा विवाह त्या ठिकाणातील सर्वात सुंदर तरुणीशी केला जातो . पण आपल्याकडे पुरुष, पूर्वी परी असणारी आपली बायको जाड झाली की त्यांच्या मानेचा व्यायाम सुरू करतात. ती जाड झाली म्हणून तीच नवऱ्यावरच प्रेम कमी झालेलं असतं का ? तिच्या मनात आणि मनातील भाव भवनात काही बदल झालेला असतो का ? तर नाही ! स्त्रियांचा जाडेपणा हा आता पुरुषांना स्विकारावा लागणार आहे कारण भविष्यातील आरामदायी जीवनशैली, आहार आणि नव्याने निर्माण होणारे आजार आणि स्त्रियांच्या शरीराची रचना आणि संरचना पाहता त्या जाड असण्याचे प्रमाण वाढणार यात शंका नाही ! व्यायामाने जाडेपणा दूर ठेवता येईल पण व्यायामात सातत्य ठेवणे स्त्रियांसाठी फारच जिकरीचे असते. हे सत्य नाकारता येत नाही. आज रोज व्यायाम करूनही काही पुरुषांना वाढते पोट आवरता येत नाही. अनेक जाड्या स्त्रिया आज आपल्यात असलेल्या कला गुणांमुळे एका उंचीवर आहेत पण तरीही दुर्दैवाने त्यांच्या जाड असण्याची थोडी तरी खंत त्यांना असणारच ! जाडेपणा ही समस्या नाही पण त्यामुळे होणारे आजार ही मात्र समस्या आहे तारुण्यात ती समस्या जाणवत नाही पण म्हातारपणी नक्कीच जाणवते.

                  हल्लीच एका मराठी अभिनेत्रीने एका कॅलेंडरसाठी न्यूड फोटो शूट केला होता आणि त्यातील एक फोटो नववर्षाच्या सुरुवातीलाच सोशल मिडियावर प्रकाशित केला होता. तो पाहून कित्येकांच्या भुवया उंचावल्या कारण ती अभिनेत्री अंगाने जाड होती. तो फोटो खऱ्या अर्थाने नग्न फोटो नव्हताच ! तो अर्ध नग्न फोटो होता आणि पाहताना गोड वाटत होता. कोणत्याही कोपऱ्यातून तो अश्लील वाटत नव्हता. तरी त्या फोटोवर केलेल्या पुरुषांच्या टिका खूपच अश्लील होत्या कारण काय तर ती अभिनेत्री जाड होती आणि त्याहून महत्वाचे म्हणजे मराठी होती. तिने एका हिंदी चित्रपटात मोलकरणीची भूमिका केली होती म्हणून तिला सारखी मोलकरणीच्या भूमिकेसाठी विचारणा होत होती. ती दिसायला सुंदर असतानाही हे असं का होत ? होत ! कारण एकच ! ती जाड होती आणि महत्वाचे म्हणजे मराठी होती. हिंदी चित्रपटात मराठी मोलकरणी का लागतात आणि चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या जाड मोलकरणी प्रत्यक्षात कोठे असतात…उलट त्या आपल्या मालकिणीपेक्षा जास्त फिट असतात. मी जाड असले तरी मी स्वतःला सिद्ध करू शकते हे त्या अभिनेत्रीने सिद्ध केलं ते ही मर्यादेत राहून…स्त्रियांच्या बाबतीत जाडेपणा हा काही प्रमाणात निसर्गाने लादलेला असतो. हे सत्य आता समाजाने स्विकारण्याची गरज आहे आणि जाडेपणातही खूप सौंदर्य असतं ते सौंदर्य शोधायला हवं ! जाडेपणा हा कोणासाठी शाप ठरता कामा नये पण तरीही कोणी त्याला मित्र मानू नये…पाहुणा समजावे…

लेखक – निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..