नवीन लेखन...

विविध प्रकारची परिक्षणे आणि परिचय

‘दामू, साने गुरुजींचा धडपडणारा मुलगा’ – पुस्तक परिचय

हे पुस्तक आशाताई कुलकर्णी यांनी २०१८  मध्येच मला सप्रेम भेट म्हणून दिले होते. त्यावेळी मी ते पुस्तक वाचून काढले होते, पण पंधरा दिवसांपूर्वी ते पुस्तक मी वाचू लागले आणि त्यातला सखोल आणि सुयोग्य अर्थ, खरेपणा मला जाणवू  लागला. हा धडपडणारा विद्यार्थी म्हणजे, तरुण वयातच भारावून जाऊन, देश आणि लोक सेवाकार्यात झोकून देणारा ‘दामोदर बळवंत कुलकर्णी”,  म्हणजेच साने गुरुजींचा दामू !  ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’  हा त्यांचा सामाजिक कार्याचा गाभाच आणि मूलतत्वच  होते. […]

‘कोशिश’ – शब्देविणू संवादू !

“कोशिश” हा हिंदी नव्हें तर भारतीय चित्रसृष्टीतील मैलाचा दगड आहे. हा एकच चित्रपट करून गुलजार ,संजीवकुमार ,जया भादुरी आणि असरानी थांबले असते तरी चिरकाल आपल्या स्मरणात राहिले असते .नाही म्हणायला आपले प्रेक्षक म्हणून अपरिमित नुकसान झाले असते हा भाग अलाहिदा . कारण कोशिश नंतरही त्यांनी आपल्याला एकाहून एक नजराणे बहाल करून श्रीमंत करून टाकलेले आहे. […]

‘अंगूर’ – स्मितहास्याची प्रसन्न माळ !

विनोदाची खूप रूपे आहेत. मराठीजनांना “पुलंच्या “रूपाने निखळ विनोद काय असतो याचा प्रदीर्घ अनुभव आहे. ऍक्शन विनोद बऱ्याच जणांना आवडतो. द्वयर्थी विनोदानेही एकेकाळी धुमाकूळ घातला होता. प्रत्येक कलावंताची स्वतंत्र शैली असते. विनोदाचा शिडकावा दैनंदिन जीवनात कोणाला नको असतो? पण काहीतरी अंगविक्षेप करून /चाळे करून तात्कालिक हसू फ़ुटेलही पण गुलजारसारखी व्यक्ती तेथेही आपल्या अभिजाततेचा हात सोडत नाही. “अंगूर ” हा परिस्थितीजन्य विनोदाचा एक उत्तम नमुना आहे. […]

‘नमकीन’- एक हरवलेली अभिजात कविता !

ग्रामीण संस्कृतीवर भाष्य करणारा हा चित्रपट – काहिसा दुर्लक्षित ! यात राजकारण नाही ,अतिरेकी नाहीत फक्त एक छोटासा जीव असलेले कथाबीज आहे. अशा विषयावर इतकी सुंदर चित्रकृती निर्माण करणे फक्त गुलजारसारख्या प्रतिभावंताला जमू शकते. […]

स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी

अपवाद सोडले तर जगात सगळ्यांना ईझीमनी हवा असतो . कष्ट न करता , किंवा अगदी कमीतकमी कष्टात जास्त पैसे मिळवणं हे अनेकांच्या आयुष्याचं ध्येय असतं . त्यासाठी जगन्मान्य असा मार्ग म्हणजे शेअर बाजार. […]

स्ट्रेंजर इन द सिटी

मणीपाल , उडुपी येथील बीचेस , मंगलोर येथील काही लोकेशन्स याचा अप्रतिम वापर करून त्यांनी कथानकाला एक वेगळं अवकाश प्राप्त करून दिलं आहे . […]

‘विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा !

निवृत्त न्यायाधीश मा. प्रदीप जोशी यांनी भारतातील या असंभव, अशक्यप्राय संकल्पनेवर लिहिलेलं,  भारतीय विचार साधनेतर्फे ३० जून २०२१ ला प्रकाशित झालेलं हे पुस्तक काल श्री किशोर शशीतल आणि डॉ मुकेश कसबेकर यांनी माझ्या हाती ठेवले. […]

गुलज़ार समजून घेताना…

जानेवारी २०२१ मध्ये माझे हे पुस्तक प्रकाशित झाले. गुलज़ारच्या १६ चित्रपटांवर मी २०१८ साली चेहेरे-पुस्तिकेवर लिहिलेल्या पोस्ट्स चा हा संग्रह आहे. […]

‘बाजार’ – एक गडद नज्म !

वधूची विक्री, एका गल्फमधील श्रीमंत भारतीयाला ! विक्री हा एकच समान धागा ! “कमला” दिल्लीत तर “बाजार ” हैद्राबादमध्ये ! स्मिता, नसीर, फारुख शेख, सुप्रिया पाठक, सुलभा देशपांडे- दृष्ट लागावी अशी स्टारकास्ट ! चित्रपटातील आणखी एक पात्र म्हणजे पार्श्वभूमीवरील हैद्राबाद ! ( यापूर्वी ” धरम “, ” मोहल्ला अस्सी ” , ” मुक्ती भवन” अशा अनेक चित्रपटांना वाराणशी ने सबळ पार्श्वभूमी पुरविली आहे. अगदी अलीकडचा नीना गुप्तावाला ” द लास्ट कलर “) […]

स्वप्नविक्या- ‘थोडासा रुमानी हो जाय !’

हा चित्रपट चालला नाही, याचं फारसं आश्चर्य वाटलं नाही. नाना, विक्रम – मला वाटतं हे दोघं त्यानंतर ” नटसम्राट” चित्रपटात एकत्र आलेत. – मीही तो आजवर चित्रपटगृहात पाहिलेला नाही. खूप वर्षांपूर्वी अचानक एका रात्री डी डी चॅनेल वर लागला असताना माझ्या नशिबी चांगला योग आला. अर्थात त्याची निर्मिती दूरदर्शनची आहे आणि बहुधा सरकारी अनास्थेने त्याचे मार्केटिंग चांगल्या प्रकारे न झाल्याने तो वाटेतच संपला आणि प्रेक्षक एका अप्रतिम चित्रानुभवाला मुकले. […]

1 6 7 8 9 10 34
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..