नवीन लेखन...

शिखरावरी बांधली मंदिरे

विचारांच्या उठती लहरी, वलये त्यांची होत असती  । सुविचारांची वलये सारी, नभाकडे जात दिसती  ।।   पवित्र निर्मळ विचारांच्या, तरल अशा लहरी असती  । अशुद्ध साऱ्या विचारांची, जड लहरी तळात राहती  ।।   फार पूरातन काळी देखील, उकल दिसते या गोष्टीची  । पवित्रतेच्या सर्व स्थळांनी, शोधली जागा शिखरावरची  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० […]

क्लिष्ट ईश्वरी मार्ग

संसारातील ऐहिक सुखे, धडपडीने मिळवीत असे प्रयत्नातील आनंद खरा, भोगण्यांत तो दिसत नसे   उबग येई ह्याच सुखाची, जीवन खर्चीले ज्या करितां त्या सुखांत समाधान नव्हते, जाणवले तेच मिळतां   प्रभू मिलनाचा आनंद तो, चिरंतर ते समाधान देयी ईश्वरी मार्ग खडतर असूनी, क्लिष्टता येते मनाचे ठायीं   तसेच चाला उबग सोसूनी, कठीण अशा त्या मार्गावरती यश […]

प्राण्याचे मोल समजा

खरेदी केला सुंदर पक्षी,   दाम देवूनी योग्य असे ते । नक्षीदार  पिंजरा घेवूनी,   शोभिवान केले घरातें ।। प्रात:काळी उठोनी बघतां, चकित होवूनी गेलो मनीं । पक्षानें मान टाकली,  पडला होता तळात मरूनी ।। क्षणभर मनी खंत वाटली,   राग आला स्वकृत्याचा । अकारण हौस म्हणूनी,   खरेदी केला पक्षी याचा ।। किती बरे निच मन हे    निराशा तयाला […]

बाह्य अडथळे

एकाच दिशेने जातां, प्रभू मिळेल सत्वरी, रेंगाळत बसाल तर, गमवाल तो श्री हरी ।।१।। तुम्ही चालत असतां, अडथळे येती फार, चालण्यातील तुमचे, लक्ष ते विचलणार ।।२।। ऐष आरामी चमक, शरिराला सुखावते, प्रेम, लोभ, मोह, माया, मनाला ती आनंदते ।।३।। शरिराचा दाह करी, राग द्वेष अहंकार मन करण्या क्षीण, षड् रिपू हे विकार ।।४।। सुख असो वा […]

शहिदांच्या घरची दिवाळी

बाबा बघा ना..दिवाळी आलीय (शहिदांच्या घरची दिवाळी) बाबा…. देशासाठी सिमेवर लढताना शहीद झाले तुम्ही, तुमच्या या विरमरणाने मात्र पोरके झालो आम्ही. तुमच्या शिवाय ऐन सणासुदित घरावर अवकळा पसरलीय.! बाबा…बघा ना दिवाळी आलीय.!! सांगितले होते तुम्ही या दिवाळीला सुट्टी घेइंन, माझ्या साठी फटाके अन् चिंगीला कपडे आणीन. वाट बघतोय तुमची आम्ही खोटिच आशा लागलीय.! बाबा..बघा ना दिवाळी आलीय.!! […]

हे देवा म्हाराजा…..

बारा गावच्या, बारा वहिवाटीच्या, कुलदैवत आणि गावच्या ठिकाणदार म्हाराजा….. ……व्हय म्हाराजा sss… ह्या तुका बारा पाचाचा गाऱ्हाणा घालतय म्हाराजा ता तू पावन करुन घी रे म्हाराजा.. ……व्हय म्हाराजा sss… सध्या जो काय ह्यो ओळखीच्या मंडळीनी आपलो ग्रुप केलो आसा म्हाराजा…. ……व्हय म्हाराजा sss… जसे ग्रुप सुरू झाल्यापासना आजतागायत सर्व एकमेकांका जोडून ऱ्हवले हत म्हाराजा… ……व्हय म्हाराजा […]

1 336 337 338 339 340 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..