नवीन लेखन...

जीवन गुलाबा परि

जीवन असावे गुलाबा सारखे, सहवासे ज्याच्या मिळताती सुखे ।।१।। सुगंध तयाचा दरवळत राही, मनास आमच्या समाधान होई ।।२।। नाजूक पाकळ्या कोमल वाटती, सर्वस्व अर्पूनी गुलकंद देती ।।३।। विसरूं नका ते काटे गुलाबाचे, बसती लपूनी खालती फुलांचे ।।४।। सुखाचे भोवती सावट दु:खाचे, जीवन वाटते झाड गुलाबाचे ।।५।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

वेळेची किमया

वेळ येता उकल होते, साऱ्या प्रश्नांची  । जाणून घ्या तुम्ही, रीत निसर्गाची…१, जेंव्हां यश ना मिळते, एखाद्या प्रश्नी  ।। वेळ नसे योग्य आली, हेच घ्यावे जाणूनी…२, प्रयत्न सारे चालूं ठेवतां, यश ना मिळे  । कांहीं काळासाठी थांबवा, प्रयत्न सगळे…३, काळ लोटतां प्रयत्न होती, पुनरपि सारे  । उकल होऊन गुंत्यांची, आख्खे निघती दोरे…४, कुणी म्हणती ग्रह अनूकुल, […]

ढोंगी साधू महाराज

सोडत नसतो केव्हाही,  निसर्ग आपुल्या मर्यादा, चमत्कार करीत नसतो, नियमित चालतो सदा   १ साधूबाबा महाराज    कित्येक आहेत ह्या जगती नांव घेवूनी प्रभूचे     चमत्कार दाखविती   २ अज्ञानाने भरलो आम्ही विश्वास वाटतो त्यांचा चमत्कार दाखविण्यामध्ये    हात नसतो प्रभूचा    ३ तो महान असूनी     क्षुल्लक त्यासी ह्या गोष्टी प्रेमभावना घेण्या   कशास पडेल कष्टी   ४ नष्ट केला ईश्वर धर्म, ह्या साऱ्या […]

उमलणारी फुले

चोर पावली येता तुम्हीं,  साव असूनी खऱ्या फुलराण्या स्वर्गामधल्या,  नाजुक नाजुक पऱ्या निद्रिस्त जेंव्हा विश्व सारे,  संचारी भुमंडळीं स्वागता रवि उदयाचे,  उमलताती सकाळीं चाहुल न ये कुणासी,  तुमच्या अगमनाची प्रफुल्लतेनें मन देते,  पोंच सौंदर्याची आकर्शक ते रंग निराळे,  खेची फुलपाखरें मध शोषण्या जमती तेथे,  अनेक भोवरे सुगंध दरवळून वातावरणीं,  प्रसन्न चित्त करी जागे करीती जगास,  चैतन्यमय […]

ज्ञानाग्नि पेटवा

हातातील काडी    घासतां  पेटीवरी अग्नि त्याच्यातील   ज्वाला त्या धरी लपलेला अग्नि     घर्षणाने पेटतो अज्ञान झटकता    ज्ञानी उजाळतो चितांत असतो     प्रभू सदैव शांत ओळखण्या त्यासी   लागताती संत संत हाच गुरु        मार्गदर्शक असे चित्तातील प्रभूला     जागवित असे उजळण्या मन   घर्षण लागे संताचे पेटवा ज्ञानाग्नि     सार्थक होई जीवनाचे डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

भक्तांसाठी कष्ट भोगतो श्रीहरी

युगानू युगें उभा राही,   एका विटेवरी कष्ट भोगतो भक्तांसाठी   पांडुरंग श्रीहरी   ।।धृ।। आई वडिलांची सेवा पुंडलीक भक्तीचा ठेवा भक्तित होई तल्लीन जगास गेला विसरुन उभा करुनी तुजला,    गेला निघूनी चंद्रभागेतीरी   ।।१।। कष्ट भोगतो भक्तांसाठी    पांडुरंग श्रीहरी विषाचा  पेला मीरेनें प्राशन केला भजनांत गेली दंग होऊनी पचविले विष तूं घेऊनी दुधामधले विष शोषूनी,   दाह त्याचा सहन करी   […]

बंधनातील चिमणी

चिव चिव करीत,  एक चिमणी आली  । दर्पणाच्या चौकटीवरती,  येवून ती बसली  ।। बघूनी दूजी चिमणी दर्पणी,  चकीत झाली होती  । वाटूं लागले या चिमणीला,  आंत अडकली ती  ।। उत्सुकता नि तगमग दिसे,  चेहऱ्यावरी  । चारी दिशेने बघत होती,  आंतल्या चिमणी परी  ।। औत्सुक्याचे भाव सारे दिसती,  आतील चिमणीतही  । कशी करूं तिची बंधन मुक्ती,  काळजी […]

भावनांची घरें

घरें निरनिराळी बांधली, घ्याहो निरखूनी   ।।धृ।। वास्तुकला सुंदर   रंग त्याचे बहारदार आकर्षक वाटणार  परी निवड करा जपुनी, घ्याहो निरखूनी   ।।१।। ही घरे भावनांची    त्यांत छटा विचारांची भर पडतां श्रद्धेची    जीवन जाईल तसेंच होऊनी, घ्याहो  निरखूनी   ।।२।। राग लोभ अहंकार   मद मत्सर हे विकार ह्यांची ती घरे असणार   शोधा विचार करुनी, घ्याहो निरखूनी    ।।३।। दया क्षमा शांति   […]

‘शक्ती’ हेच ईश्वरी रुप

तप्त सळई स्पर्ष करीतां ,   चटका देई शरीराला  । सुप्त अशी औष्णिक शक्ति,   आस्तित्व दाखवी त्या वेळेला  ।। वीजा चमकूनी गर्जती मेघ,   लख्ख उजेड सारते काळोख  । प्रकाश नि ध्वनीच्या लहरी,   आस्तित्वाची दाखवी झलक  ।। साधी असे तार तांब्याची,   झटका देई विद्युत असतां  । विद्युत शक्तीचा परिणाम,  जाणवी देहा प्रवेश करतां  ।। झाडावरले पडता फळ,  भूमी […]

आशिर्वाद

घक्के देऊन आली   धरणीकंप करुन भावना मनीं चमकली    बनेल ही महान   ।। बालपणाची मुर्ति   गोंडस तुझें भाव तेज चेहऱ्यावरती   घेती मनाचे ठाव   ।। शाळेतील जीवन   दाखवी मार्ग विजयाचे सर्वामध्यें चमकून   प्रमाण मिळे यशाचे   ।। एकाग्रचित्त करुनी   मिळवलेस तूं यश प्रतिष्ठा टिकवूनी   असेच जा सावकाश   ।। विजे सारखी चमकूनी    झेप घे नभांत प्रकाशमान होऊनी   यशस्वी हो जीवनांत   […]

1 334 335 336 337 338 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..