मेणबत्ती
जळत होती मेणबत्ती, मंद मंद प्रकाश देवूनी । अंधकार भयाण असतां, भोवताली उजेड पाडूनी…१, बुडत्यासाठी काडीचा आधार, अंधारी भासली तशी प्रकाशीं । असूनी ज्योत मिणमिणती, त्या क्षणी वाटला सूर्य आकाशी….२, वाटत नाहीं मूल्य कुणाला, भरपूर पडल्या प्रकाशाचे । मेणबत्तीची ज्योत शिकवी, साधे तत्त्व जीवनाचे….३ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
