नवीन लेखन...

सार्थकी जीवन

सारे जीवन जाते आपले अन्न शोधण्याकडे काय उरते आमच्या हाती विचार करा थोडे….१ जीवनाची मर्यादा ठरली आयुष्य रेखेमुळे आज वा उद्या संपवू यात्रा हेच आम्हांस कळे….२ धडपड करी आम्ही सारी देह सुखा करिता विचार ही मनांत नसतो इतरांच्या करिता….३ वेळ काढावा जीवनातुनी इतरांसाठी थोडा सार्थकी लावा आयुष्य तुम्ही जीवन शिकवी धडा….४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

होळीत जाळा दुष्ट भाव

एकत्र येऊं सारेजण विसरुन जाऊ भेदभाव जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव   //धृ// ऐष आरामांत राहून देह झाला मलीन शरीर सुखासाठी करती नाना खटपटी आज आहे सण होळीचा नष्ट करा ऐहिक भाव जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव  //१// मन असे चंचल भारी सर्व दिशेने घेई भरारी राग लोभ अहंकार मनाचे तर हे विकार […]

उर्जा अर्पण

करा सर्वस्व प्रभूसी अर्पण त्यांतच मिळेल समाधान जीवन अग्नी पेटत राही उर्जा निघे त्याचे ठायीं उर्जेचे होते रुपांतरण साधत असे कार्य त्यातून भावनेचा आविष्कार देई जीवना आकार व्यक्त करण्या भावना उर्जा लागे त्यांना एकाग्र करा मना सोडूनी सारी भावना एकाग्र चित्त हेच ध्यान प्रभू मिळण्याचे साधन सारी उर्जा ध्यानांत जाई तीच प्रभूसी अर्पण होई — डॉ. […]

फूलपाखरे नि फुले

रंगबिरंगी सुंदर ठिपके,  पंखावरी आकर्षक छटा त्या,  मनास मोहीत करी…१, नृत्य पहा कसे चालते,  तालबद्ध होवूनी फूलपाखरे बागडती,  फुलाफुला वरूनी…२, नृत्याचे आंगण त्यांचे,  ते ही सुंदर नि मोहक मखमालीच्या पाय घड्या,  दरवाळताती सुवासिक…३, दोघांमधली चढाओढ,  नर्तक आणि नृत्यांगणा कोण असे अधिक मोहक, प्रश्न सोडविल कोण ?….४   — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com  

श्री सरस्वतीची तसवीर

जीवनांतले चित्र पालटूनी,  रंग ते बदलले जनी जनार्दन ठरविले,  सारे काय मिळविले  ।१। सुंदर तसबीर एक आणली,  देवी श्री लक्ष्मीची श्रद्धेचे भाव गुंतविले,  पूजा करूनी तिची  ।२। शिक्षण घेवूनी ज्ञान मिळविले,  कष्टानें सारे शरीर होते चैतन्यमय,  आणि धडपडणारे  ।३। रंग बधितले जीवनांतील,  विविध छटांचे सजविण्यास लागते त्या छटांना,  बळ संपत्तीचे  ।४। ज्ञान आणि प्रयत्न जेव्हां,  एक […]

मुक्ता ताटी

नको चिंता नको क्रोध मोह माया नको लोभ सारे काही दुर सारा ताटी काढा ज्ञानेश्वरा अपराध हा जनाचा साही आता मुखी ऋचा विश्व कोपे पेटे वन्ही बंधू राया व्हावे पाणी उणे-दुणे खुपे बोल संत बोधा आहे मोल पुर्ण ब्रम्ह आहे घर नको कुढू जगा तार ब्रम्हा सम विश्व सारे जनलोक थोर की रे आवरावे क्रोधाग्नीस जाणारच […]

जुनं घर…..

अबोलतेच्या आठवणींनी, भरलं होतं जुनं घर….. गाई गुऱ्हांच्या आस्तित्वात, फुललं होतं द्वार….. चतुर बंधूंच्या नात्याला, कष्टाची होती धार….. माणुसकीच्या- जुन्या काळात, इथं सुख होती दूर…… काळ्या मातीतल्या धान्यांन, भरलं होतं जुनं घर…… कष्ट होतं भरपूर, पण- “गरीबी होती फार”….. दोन बंधूच्या वाटणीनं, बदललं पारं द्वार आजोबा व वडिलांच्या माझ्या-कष्टाची, आठवण येतं आहे फार….. नाही राहिलं माझं, […]

नको वाटतं – असं जगणं

नको वाटतं जगात, असं साधेपणाने जगणं….. फक्त – गरिग म्हणून, जुन्या कपड्यात फिरणं….. नको वाटतं समाजात, एकत्र मिळून राहणं….. नोकरी नाही म्हणून, सतत तचं बोलुन घेणं….. आयुष्य भर दुसऱ्याच्याच, इशाऱ्यावर – – नाचणं….. नको वाटतं ‘नको वाटतं’, असं  फटकळ जगणं….. — गजानन साताप्पा मोहिते 

खरे सुख अंतरी

सुख हे मृगजळ,  फसविते सर्वांला खेळ चालतो त्याचे,  चकविणे मनाला …१, बाह्य वस्तूंचे सुख,  क्षणिक ते असते, मोहून जाता सर्व,  लक्ष्य तेच वेधते…२, खरे सुख अंतरी,  परि शोधी बाहेरी, चुकीचा हा हिशोब,  निराशा मग करी…३, अंतरातील सुख, नितांत ते असते एकाच अनुभवाने,  जग विसरविते…४ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com        

दुष्टपणा

दगड टाकतां पाण्यावरी,  तरंगे त्याची दिसून आली दगड होई स्थीर तळाशी,  बराच वेळ लाट राहीली…१,   जेव्हा कुणीतरी क्रोध करी,  वातावरण दूषित होते क्रोध जातो त्वरीत निघूनी,  दूषितपणा कांहीं काळ राहते…२,   निर्मळपणा दिसून येई,  स्थिर होवून जातां जल पुनरपि पडता खडा क्रोधाचा,  सारे होवून जाते गढूळ…३,   स्थिर होण्यास वेळ लागतो,  गढूळ होई क्षणांत मन […]

1 238 239 240 241 242 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..