शोधूं कोठें त्यास ?

शोधत होतो रुप प्रभूचे,   एक चित्त लावूनी  ।
अवंती भवंती नजर फिरवी,   श्वास रोखूनी  ।।१।।

शांत झाले चंचल चित्त,   शांत झाला श्वास  ।
ह्रदयनाडी मंद होऊनी,   चाले सावकाश  ।। २।।

पचन शक्ती  हलकी झाली,   जठराग्नीची  ।
शिथील झाली गात्रे सारी,   देह चैतन्याची  ।।३।।

देहक्रियांतील प्राणबिंदू ,  असे ईश्वर  ।
समरस होतां त्याच शक्तिशीं,   होई स्थिर  ।। ४।।

शोधामध्यें चिंतन करतां,   ध्यान परी लागते  ।
समाधी स्थितीत येतां प्राण,   अनंतात मिसळते  ।।५।।

नाही दिसले रुप ईश्वरीं,   आगळे एकटे  ।
विश्वमंडळ तोच असतां,   शोधू तयास कोठे ?  ।।६।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

About डॉ. भगवान नागापूरकर 1382 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

महाभारतकालीन कुंतलनगर काटोल

महाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन ...

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

Loading…