तन मनातील तफावत

देह मनाच्या वया मधील,  तफावत ती दिसून येते
चंचल असूनी मन सदैव,  शरिर परि बदलत राहते…१,

चैतन्ययुक्त ते मन सदा,  स्थिर न राहते केव्हांही
जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही…२,

परिस्थितीच्या चौकटीमध्यें,   विचारांचा दबाव राहतो
शरिराच्या सुदृढपणाचा,  मनावरती परिणाम होतो…३,

दिसून येते केव्हां केव्हां,  मन अतिशय उत्साही
परि शरिराचा दुबळेपणा,  मनास त्याक्षणी साथ न देई….४

विचित्र होते वातावरण ते,  जेव्हां मनास साथ ना मिळे
विचारांच्या चुका होऊनी,  दु:खी होते जीवन सगळे…५

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1542 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…