नवीन लेखन...

आठवावे गजानना

आठवावे तव नाम हे गुरुराया शीणवटा  मनाचा घालवाया …।। धृ ।। रहाटगाडगे हे रोजचे चाले रेटूनी रेटूनी मन हे थकले एकचित्त होऊनी आता बसलो स्मरण करी तुमचे गजानना   ।।१।। उपदेशपर तुम्ही जे सांगितले मनात हो साठवुनी  ठेवियले विपरीत वर्तमानात आजच्या वागण्या बल द्यावे गजानना …..।।२ ।। किंमत हरवुनी बसली माणसे हरवून बसले  बोलते शब्दही बदलणे बरे […]

त्यांची शाळा

आंस लागली मजला बघून याव्या त्या शाळा देहू, आळंदी, परिसर जाऊनी तो धुंडाळला कोठे शिकले तुकोबा ज्ञानोबांना ज्ञान मिळे साधन दिसले नाहीं परि तेज भासे आगळे विचार झेंप बघतां आचंबा आम्हां वाटतो कोठून शिकले सारे मनी हा प्रश्न पडतो त्यांची शाळा अतर्मनीं गंगोत्री ज्ञानाची ती वाहात होती बाहेरी पावन करी धरती डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

गीता – जीवनाची एक उकल

रणभूमीवर समर प्रसंगी      मृत्यु असता सामोरी जीवनांची तत्वे सांगती       गीते द्वारे श्रीहरी //धृ// अर्जुन असूनी महारथी         द्विधा झाली मनःस्थिती सगे सोयरे तेथे बघूनी          खालती बसला निराशूनी कसे मारुं मी माझेच सारे        भगवंताला प्रश्न विचारी //१// जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी कुणीही नाही कुणाचे येथे        नाते गोते क्षणिक भासते सत्ता येथे चालते प्रभुची          खेळणी सारी ठरते […]

ज्ञानेश्वराची चेतना

जीवंतपणी घेई समाधी,  ज्ञानेश्वर राजा  । दु:खी होऊनी हळहळली,  विश्वामधली प्रजा  ।। सम्राट होता बालक असूनी,  राज्य मनावरी  । हृदय जिंकले सर्व जणांचे,  लिहून ज्ञानेश्वरी  ।। आसनीं बसत ध्यान लावता,  समाधिस्त झाले  । बाह्य जगाचे तोडून बंधन,  प्राण आंत रोकले  ।। निश्चिष्ठ झाला देह जरी ,  बाह्यांगी दर्शनी  । जागृत आसती प्राण तयांचे,   आजच्याही क्षणी  ।। […]

मान्य मला ती सजा, प्रभु तु देशी

मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।। लुटालूट करुनी देह वाढविला राम नाम जपूनी पावन तो झाला  ।।२।। प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण ग्रंथ रचिला  ।।३।। वाहून गेला पाप भाग तप प्रवाहाच्या वेगांत धुवूनी गेला डाग जलाशयाच्या ओघांत  ।।४।। वाईट घटना घडते त्यास भोग […]

बाबाची आई

एक होती म्हातारी,  ती  सर्वांना धारेवर धरी उपास तापास नी सोवळ ओवळ त्रस्त केल तीन घर सगळ तिच्यापुढे चालेना कुणाच काही कारण  ती बाबांची होती आई. — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

प्राण ज्योत

दिवा होता छोटासा, एक मजकडे इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे तळांत होती योजना, तेल सांठवण्याची शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे केंद्रित होते देह उर्जा, नाभीच्या भोवतीं व्यय टाळून प्रवाही […]

एक सुंदरी

बस मधून चाललो होतो मी,  शेजारी होती जागा रिकामी येवून बसली जवळ एक सुंदर, चंचल तरूण बालीका तिला बघून मनाची खुलली कलीका तरीही मी एका क्षणांत माझी जागा बदलली बरका कारण ती हासत मुरकत म्हणाली “  थोडसं, सरकता का तिकडे काका ? ” — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

विधी लिखीत

विधी लिखीत असे अटळ   त्याच प्रमाणे होई निश्चित कोण बदले मग काळाला    प्रभूचा सहभाग असे ज्यांत  ।।१।। राम राज्याभिषेक समयीं   असता सर्वजण आनंदी राज्य सोडूनी वनी जाईल   जाणले नव्हते कुणी कधीं   ।।२।। नष्ट करुनी सर्प कुळाला   तक्षकावरही घात पडे परिक्षिताचे प्रयत्न सारे   फिके पडती नियती पुढे   ।।३।। आकाशवाणीचे शब्द ऐकतां   हादरुनी गेला कंस मनीं काळाने त्या […]

जगावे अगदी बिनधास्त

जगावे अगदी बिनधास्त, निर्भय आणि निडर, कशाला पर्वा कुणाची, जगणे असावे कलंदर , असे जगावे जबरदस्त, पत्थरांशी टक्करावे, निधड्या छातीने अगदी, संकटांना दूर सारावे, मार्गी जेवढ्या अडचणी, तेवढी घ्यावी आव्हाने , तू मोठा का मी म्हणत, सरळ त्याच्याशी झुंजावे, सामना करणे अटळ मग, कशासाठी ते भ्यायचे, सिंहाचे काळीज करून, का नाही लढायाचे,—? आत्मविश्वासाने जग जिंका, भल्याभल्यांनी […]

1 … 240 241 242 243 244 … 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..