एक शोषण

शोषून शोषून जमविता, झुरुन झुरुन मरुन जाता पैशांनी भरलेल्या पिशव्या फाटून जातील हाती राहिल ते पिशव्यांचे वस्त्र तुमची आसवे पुसण्यासाठी डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.com                                            

अस्तित्व !

|| हरी ॐ || जगात अस्तित्व टिकविण्याच्या स्पर्धा लागल्या आहेत, आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याचं अस्तित्व संपवू पाहात आहेत ! देवाचं अस्तित्व झुगारून, सैतानाचं स्वीकारताहेत, बुद्धीभेदाच्या अस्तित्वाला खरं मानून, देवाच्या अस्तित्वाला नावं ठेवत आहेत ! धर्माच्या नावाने अस्तित्व जपण्याचा काहींचा व्यर्थ प्रयत्न चालू आहे, तरुणाईला प्रलोभने दाखवून दिशाहीनतेकडे फरफटत नेले जातं आहे ! अस्तित्वाचे भूत मानगुटीवर […]

निखळ प्रेम !

राधेचं श्रीकृष्णावरील निखळ प्रेम आजच्या तरुण प्रेमिकांत दिसत नाही ! असा प्रश्न सामान्य जनांच्या मनात आला तर काही चुकले नाही ! प्रेमी युगल एकमेकांवर अंधळ प्रेम करतात, तर काही जण प्रेमात पडून अंधळे होतात ! कोणाचं प्रेम खरं कोणाचं खोटं, ते आपापल्यापरीने पुढे रेटतात ! एकतर्फी प्रेमात अपयश आल्यावर अॅसिड हल्ले, बलात्कार होतात, बाह्य आकर्षणाला भुलून […]

जीवन मरणाची शर्यत

शोभिवंत घर केले, आधुनिक बनलो मी, विविध वस्तू संग्रहिले, शोभा देण्या आले कामी ।।१।। शिरे व्याघ्र, हरणाची, लटकाविली भिंतीवरी, झाडे रंगीत पानांची, कुंडीत शोभती बरी ।।२।। काचेचा मोठा टँक घेऊनी, पाण्याने भरला, रंगीत मासे आंत सोडूनी, दिव्यांनी प्रकाशिला ।।३।। रंगी बेरंगी आकर्षक मासे, चपळाईने पाण्यांत पोहती, नयनाला ते मनोहर भासे, चित्त साऱ्यांचे वेधती ।।४।। खेळून भूक […]

निसर्ग स्वभावाचे दर्शन

बहूमोल निसर्ग ठेव, निरनिराळे स्वभाव उमटविती भाव    मनावर आमच्या     ||१|| चांदण्याची शितलता,मनाची प्रफूल्लता देहाची आल्हादकता    लाभली चंद्राचे ठायी ||२|| नाजूक सहवास, मधूर मिळे वास, कोमलतेचा भास    जाणविला फूलांनी    ||३|| रंगाची विविधता, छटाची आकर्षकता, मनाची वेधता    इंद्रधनुष्य देई    || ४|| पळण्याची चपलता, फिरण्याची चंचलता, वेगाची तीव्रता,    भासे हरिणाच्या पायी    ||५|| प्रवाहाची संथता, पाण्याची खळखळता, स्वभावाची निर्मलता,    समजली […]

कलेचे खरे मुल्य

पर्वत शिखरीं जाऊन खोदून आणली माती, हातकौशल्यने केला एक गणपती ।।१।। मूर्ती बनली सुरेख आनंद देई मनां, दाम मिळेल ठीक हीच आली भावना ।।२।। घेऊन गेलो बाजारीं उल्हासाच्या भरांत, कुणी न त्यासी पसंत करी निराश झालो मनांत ।।३।। बहूत दिवस प्रयत्न केला कुणी न घेई विकत, कंटाळून नेऊन दिला गणपती शाळेत ।।४।। भरले होते भव्य प्रदर्शन […]

योग्य वेळी

दिन दुबळे रोगी जर्जर,  कितीक पसरले या संसारी काटे काढूनी जीवनावरचे,  सुगंध घ्या तुम्ही कुणीतरी….१ शून्यामधले कितीकजण ते,  शून्यची सारे अवतीभवती परिस्थितीच्या वणव्यामध्ये,  धगधगणारे जीवन कंठती….२ आज हवे ते त्यांना कुणीतरी,  फुंकार घालील दु:खावरती सहानुभूतीचा शब्द एक तो,  निर्माण करील सहनशक्ति….३ क्षीण होता तव दृष्टी,  दिसेल कां तयाची धडपड श्रवणदोष तो येण्यापूर्वी,  ऐकून घे तू दु:खी […]

दिव्यत्वाची झेप

पंख फुटता उडूनी गेला,   सात समुद्रा पलीकडे आकाशातील तारका होत्या,  लक्ष्य तयाच्या नजरेपुढे निसर्गाने साथ देवूनी,  दणकट दिले पंख तयाला झेप घेत जा दाही दिशांनी,  मनी ठसविले त्या पक्षाला आत्मविश्वास तो जागृत होता,  चिंता नव्हती स्थळ काळाची कुठेही जाईन झेपावत तो,  ओढ तयाला दिव्यत्वाची निसर्ग रंगवी चित्र मनोहर, रंग एक तो कुंचल्यामधल्या देईन अंगच्या छटा निराळ्या, […]

पावन हो तू आई

पावन हो तू आई तव चरण शरण येई ।।धृ।। संसाराचा खेळ मांडला खेळविसी तूं मजला थकूनी मी जाई ।।१।। पावन हो तू आई तव चरण शरण येई रात्रंदिनीं ध्यास लागला जीव माझा तगमगला झोप तर येतच नाही ।।२।। पावन हो तू आई तव चरण शरण येई आळवितो मी तुजला विसरुनी देहभानाला नयनी तव रुप पाही ।।३।। […]

1 236 237 238 239 240 279