देहाला कां शिणवितां ?

शरीरातील अवयव सारे, यंत्रवत् असती  ।
आपल्यापरी कार्य करुनी, कार्यारत राहती  ।।१।।

यंत्रामधल्या मुख्य गाभ्याला, आत्मा म्हणती कुणी  ।
अविरत मिळे चैत्यन्य शरीराला, त्याचे कडूनी  ।।२।।

शुद्ध अशुद्ध संस्कार सारे, अवयवी घडती  ।
त्याच रुपें आत्म्याकरवी, परिणाम  होती  ।।३।।

खाणें शुद्ध पिणे शुद्ध विचार निर्मळ, पवित्र ते  ।
संगम होता योग्य साऱ्यांचा, शुद्धीकरण घडते  ।।४।।

उपास तापास करुनी कांहीं, शिणविती देहाला  ।
हट्टयोग साधूनी कित्येक, दमविती शरीराला  ।।५।।

देह असे साधन केवळ, प्रभूकडे जाण्याचे  ।
साध्य होईल त्याच आधारें, इप्सित जीवनाचे  ।।६।।

खाद्यपाणी हे तर इंधन, असे शरीर यंत्राचे  ।
अभावी त्याचे कसे चालेल, जीवन मग तुमचे  ।।७।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 



Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1470 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…