नवीन लेखन...

ग्रीष्माची काहिली सोसता

ग्रीष्माची काहिली सोसता, धरणीला संजीवन -डोहाळे, संततधार वरुन बरसतां, तनी–मनी तिच्या पावसाळे,–!!! निराळीच प्रीतीची तऱ्हा, प्रेम असते आगळे, थेट भिडे ती गगनां, सृष्टीचे शृंगारलेणे,–!!! प्रणयाची रीत पहा, गगन धरतीवरी झुके, आपुले देणे देई धरा, प्रेम बोलके असून मुके,–!!! गगन गाजवी पुरुषार्थ, काम क्रोध मोहा,— वसुंधरा स्त्रीच शेवट, निमूट करते संसारा, ऋतू पालट होता होता, पृथा गर्भार […]

आनंदात गाऊं

प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ //धृ//   बागेमधल्या फुलानीं सुगंध आणिला वनीं फुलपाखरासमान  गंधशोषित जाऊ //१// प्रेमिकांचे गीत गाऊं     आनंदात न्हाऊ   कोकिळ गाते आम्रवनीं कुहू ss  कुहू ss स्वर काढूनी नक्कल करण्या तिची  उंच लकेरी घेऊं //२// प्रेमिकांचे गीत गाऊं   आनंदात न्हाऊ   श्रावणाच्या पडती सरी अंग भिजते थोडे परि सप्तरंगाचे इंद्रधनुष्य  आकाशांत पाहूं //३// […]

जीवन आनंद

ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे,  ध्येय कोणते खरे उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे   १ संतसाधू आणि ज्ञानीजन,  बहूत ते झाले समाधानी परि एक मताचे,  उत्तर नाही दिले   २ खेळखेळणे उड्या मारणे,  अन् खाणे पिणे बालपणीच्या आनंदाला,  नव्हते काही उणे   ३ विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो यौवनाच्या उंबरठ्यावरी,  बहरून गेलो   ४ संसार करिता […]

दृष्टी बदल

नवा चित्रपट बघण्या गेलो,   कुटुंबासह चित्र मंदिरी चित्रगृह ते भरले असतां,   प्रवेश मिळाला कसातरी….१, चित्रपट तो बघत असतां,  आश्चर्य वाटले जल्लोशाचे टाळ्या, शिट्या देवून प्रेक्षक,  कौतूक करी नटनट्यांचे….२ वास्तवतेला सोडूनी,   रटाळपणे वाहत होते, वैताग येवूनी त्या चित्राचा,   सोडून आलो मधेच मी ते….३, घरी येवूनी शांत जाहलो,  आठवू लागलो बालपण अशीच होती छायाचित्रे,  ज्यांत आमचे रमले मन….४ […]

का मागे, मागे वळून पाहशी

विसर सर्व गतकाळां, उगा मना रेगांळशी, पुढे जाऊन, समोर पहा ,;— का मागे, मागे वळून पाहशी,—!!! मागे राहिला बालपणा, त्यात कशाला हुंदडशी चार सुखाचे थेंब दिसतां सारे आभाळ पुन्हा पेलशी,–!!! कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, सारख्या सारख्या विसरशी, पाहून आपल्या भूतकाळां, पुन्हा पुन्हा रे गहिंवरशी,–!!! घरात माणसांचा राबता, सांग आता कुठून आणशी, अशा अनमोल दौलतीला, तूच ना रे […]

पाऊस आणि ती

खूप भूक लागलेली आहे. पाऊस सुद्धा खूप पडत आहे. तिचं घर सुद्धा दूर आहे. नाईलाज म्हणून पावसात भिजत घरी जावं ! घरातून कांदे भजी चा वास यावा . त्या वासात चहा चा सुद्धा वास मिसळलेला असावा. आत मधून आपली “ती” गप्पाटप्पात रमलेले खिडकीतून दिसावी ….. आपण door bell वाजवत रहावी ……. नंतर, कड़ी वाजवत रहावी …….. […]

गतकाळ विसर

विसरून जा भूतकाळ तो,  नजर ठेवूनी भविष्यावरी, वर्तमानी राहून प्रवाही,  जीवन सारे यशस्वी करी….१,   व्यर्थ होतील प्रयत्न तुझे,  उगाळता गत आठवणी, खीळ पडेल उत्साहाते,  अपयश आले हे जाणूनी…२,   ज्ञान जगाचे मिळूनी तुला,  जन्म जहाला आजच खरा अनुभवी नव बालक तूं,  वाहून नेई जीवन धुरा…३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०      

अनुवादात्मक

सारखा संघर्ष करत करत, अंतर्मन तुटून जाई, सुखाचे भरभरून समुद्र मग भले मिळोत कितीही,— किती त्याला अर्थ नाही,–? अशा जीवनात अर्थच नाही,–? पाण्यावाचून कोरडे, पडत, पीक सारखे गळत राही, मग पडत राहिला पाऊस, किती त्याला अर्थ नाही,–? अशा जगण्याला अर्थ नाही,–? किती मोठा असे परिवार, करत असेल जर दुःखी, हे असले कसले संबंध,–? करती मने दूषित […]

दाक्षायणी

गौरी, अभाव्या अहंकारा, अग्निज्वाला.. अनेकशस्त्रहस्ता ईतकी सामर्थ्यशाली असूनही दक्षाच्या अपमानामुळे यज्ञकुंडात समिधे सारखी जळत..राहीली.. उमा-पार्वती ..तीचा उद्वेग कवितेतून मांडायचा प्रयत्न मी केलाय .. मागच्या वर्षी केलेली कविता थोडी वाढवली आहे .. चंद्रचूडासाठी पुन्हा गौरी, अपर्णा  […]

नभांगणी आज मेघ

नभांगणी आज मेघ, कुठून कुठे चालले, शेकडो योजने प्रवास त्यांचा, कोणी त्याला मापिले,–!! निळे काळे भरले ढग, एकत्र जमून पुढे चालले स्वैर विहरती त्यात विहग, लांबवरी ते उडत चालले,–!!! या मेघांची बनते माला, इकडून तिकडून सर्व बाजूला, जसा लवाजम्यात घोळका, निघाला तसा काफिला,–!!! मध्येच एखादा मेघ डोकावे, संजीवनाने ओथंबलेला, अशा काळ्याशार ढगात, जीवनदाते नीर भरले,–!!! कोणाची […]

1 188 189 190 191 192 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..