नवीन लेखन...

असा कसा, जसा तसा

असा कसा, जसा तसा, जीवनाचा हा प्रवास, किती कष्ट दुःखे, यातना, कधी आनंदाचा मधुमास,– कधी कटू कधी गोड, कधी तिखट, कधी आंबट, चवी जितक्या येती वाट्या, तितुके पडती विविध सायास,– कधी गंमत, कधी मजा, कधी जोरा, कधी सजा, कधी रंक होतो राजा,– कधी राजाचाच बने दास,–!!! केव्हा वाटे जीवनगाणे, सुरेल स्वर्गीय ते तराणे, कधी अंतर्दुःख पुराणे, […]

धरणीचा दूत म्हणुनी

धरणीचा दूत म्हणुनी, उंच आभाळी जाशी, सतत पंख फैलावुनी, प्रवास सारा करशी–!!! दूरवरी खूप उडशी, घेऊन निरोप खालचा, वर अगदी जाऊन पोचशी, जिथे ना पोचे ऐहिक दृष्टी,–; आयुष्ये ज्यांची संपली, त्यांची खुशाली आणशी,-!!! त्यांच्याविना सारी पृथा, वंचित पोरकी,बापुडवाणी, नाती-गोती इथली सारी, मात्र एकदम केविलवाणी,–!!! भन्नाट रान वाऱ्यासारखा, काळ जाई पुढे पुढे, घेऊन जाई संगतीला, आपुले सख्खे […]

प्रीतीची फुंकर

मध्ये एक मैत्रीण बऱ्याच वर्षांनी भेटल्यामुळे तिची सुखदुःखे जाणून घेतली. तिचा नवरा बराच आजारी होता. ती मानसिक दृष्टीने खचली होती. परंतु त्यावेळची तिची मानसिक अवस्था पाहून,– आज आठवून मी खालील कविता केली आहे,— मी आहे बघ जवळी, रात्र घनतम काळी, किती सोसशी वेदना, प्रीतीची फुंकर निराळी,–!!! असह्य होता तुझा, जीव किती कळकळे, काळजात थेट उठे, कळ […]

तुझा उपयोग नाही काम झाल्यावर

तुझा उपयोग नाही काम झाल्यावर तुला उमजेल का आराम झाल्यावर ? पुढे घेऊन जाते सायकल साधी कधी रस्त्यात ट्राफिक-जाम झाल्यावर तुला समजेल बघ आहे किती सुंदर ! तुझे आयुष्य इन्स्टाग्राम झाल्यावर नवे खाते, नवा डी.पी., नवा नंबर विसर ओळख जुनी; बदनाम झाल्यावर तुझा आवाज बाकी गोड आहे; पण नको बोलूस तू बेफाम झाल्यावर बदल घडला जरी […]

कोसळत्या मनाला सावरत

कोसळत्या मनाला सावरत, तो शांत धीरोदात्त वाटला, ओघळणारे अश्रू पुसताना, आवाज आला” मी आहे ना”-? उद्ध्वस्त चित्त, कापते अंतर, हलून गेलेले काळीज नि, गलबललेले अंत:करण, धीर देत माझ्या उदास मना, आवाज आला,” मी आहे ना”-? चटके घेतलेला धपापता उर, वास्तव स्वीकारत रडवेला सूर, दाबत मी, साऱ्याच यातना,– आवाज आला,” मी आहे ना”-? वेदनांचा खेळ सारा, उभ्या […]

भिजलेली रास खडीची

भिजलेली रास खडीची, गंजत पडलेले पत्रे निसरड्या पायरीवरती हुंगत बसलेले कुत्रे कचरापेट्यांना आली बुरशीची दमट नव्हाळी कावीळलेल्या भींती आता झाल्या शेवाळी बिथरला डांबरी रस्ता, बिचकली मातकट धरती विटकरी गांडुळे आली माना वेडावत वरती मग पागोळ्यांच्या गोळ्या टपर्‍यांवर तडतड करती वर चहाळ वाफा आल्या की मेणकापडे चळती उंबर्‍याजवळ दिसणारी वाळवीच तरणीताठी अन कुरबुरण्यात उलटली ह्या बिजागरींची साठी […]

जरा कमी, पण झालो होतो

जरा कमी, पण झालो होतो आपणही बेशरम एकदा शांत आहे तसे जवळजवळ चालला दूर आवाज किती वाहते आहे प्रकाशाची नदी विरघळे काळोख दोन्हीकाठचा तुझी काया सनातन रापलेली जणू बसले थरावर थर उन्हाचे तुझी जरा चौकशी करावी म्हणून आत्ताच फोन केला तुझ्या वॉलवर महिनोन्महिने का आहे रखरखाट इतका विटलो, विरलो जितका मी वापरला गेलो खूप चांगला होता […]

जीवन

ऊन सावली जीवन हे रे जसे मिळाले तसे जगावे आनंदाची फुले होऊनी दुःखाला सामोरे जावे ……… १ कुणास देणे नक्षत्रांचे हात कुणाचे रिते राहिले दैवाने हे हिशेब सगळे त्या त्या खाती लिहिलेले ……. २ पान उद्याचे उद्या उलगडू आज तयाचे कशास ओझे l काल-आज जे लिहिले-पुसले त्यात काय रे होते माझे?……. ३ ……मी मानसी

सखी मज सांग

सखी मज सांग, तो राजकुमार कोण, उंच सरळ धिप्पाड, बघ हाती धनुष्यबाण,–!!! सखी मज सांग, जमला समूह आगळा, हा त्यातला, पण वेगळा, रूप देखणे नीलवर्णा, आला मजसी विवाह करण्या,–!! राजकुमार सगळे जमले, सगळ्यात उठून दिसे हा, मज तो शांत वादळ भासे, नुसते बघून पुरुषोत्तमा,–!!! वाटे मज तो निर्भय निडर, जणू शिव शंभूचा अवतार,– उठला तो अगदी […]

तू किती पारदर्शी

तू किती पारदर्शी, दाखवशी आरपार, तुझ्यापासून कोण लपवी, आपुले रे निखळ अंतर, –!!! माणसा, तू कसा असशी बघ एकदा निरखून, काय चालले तुझ्या चित्ती, भावनांचेच चढ-उतार, –!!! वरून पाहता प्रतिमा देखणी, लक्षपूर्वक पहा वरील रूप, आत खळाळत्या खोल समुद्री, मनाची डचमळे कशी लाव, रूप, रंग, गंध ,स्पर्शी, कुठलेही नसे संवेदन, संवाद साधावा आरशाशी, राहून स्थिर अगदी […]

1 190 191 192 193 194 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..