जीवन

ऊन सावली जीवन हे रे
जसे मिळाले तसे जगावे
आनंदाची फुले होऊनी
दुःखाला सामोरे जावे ……… १

कुणास देणे नक्षत्रांचे
हात कुणाचे रिते राहिले
दैवाने हे हिशेब सगळे
त्या त्या खाती लिहिलेले ……. २

पान उद्याचे उद्या उलगडू
आज तयाचे कशास ओझे l
काल-आज जे लिहिले-पुसले
त्यात काय रे होते माझे?……. ३

……मी मानसी

मानसी कावले (मी मानसी)
About मानसी कावले (मी मानसी) 24 Articles
मी मानसी कवळे. मराठीमध्ये M.A.(1st sem.)केले आहे. प्रॉविडंट फंड कार्यालयातून निवृत्त झाले आहे. Email: manasinamdeo@gmail.com
Contact: Facebook

3 Comments on जीवन

  1. पण उद्याचे उद्या उलगडू नसून.. पान उद्याचे उद्या उलगडू असे आहे…बदल केल्यास आभार!

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…