बहर

तुला मी मला तू किती जपलं आजवर मनात तेच रुजलंय खूप खूप खोलवर ! त्याचा बहर मनांत खुलतो तुला नि मला दोघांनाच कळतो ! — ….. मी मानसी

पुनर्भेट

ही कविता जरुर वाचा आणि त्यानंतर… मी काया आणि तू आत्मा असं समजून सुद्धा वाचा… म्हणजे वेगळा अर्थ समजेल. […]

जिवलगा

जवळी येताच तू जग नवे भेटले स्वप्न जागेपणी पाहते वाटले ll सुखाच्या सरी झेलतांना खुले पुन्हा ते तुझे रूप भासातले ll का शहारा फुटेना मनाला अता पांघरुनी तुझा श्वास घेता ll रंग माझा तुला गंध माझा तुला जिवलगा s s s s जिवलगा ll भास ध्यानी मनीं स्वप्नी जागेपणी तूच तू तूच रे जिवलगा s s […]

भेटीगाठी

अशाच येती भेटीगाठी गतजन्मीची घेऊनी नाती मित्र म्हणा वा म्हणा सोबती ओळख ती ती आतापुरती llधृll कितीक असुनी अवतीभवती चारांचीच मग होते गणती अंतरातले प्रेम नांदते विश्वासाच्या बांधून भिंती ll१ll अशाच येती भेटीगाठी … झुरणे मरणे नाही वायदे इथे न कसले नियम कायदे प्रेमच भाषा प्रेमच मनीषा प्रेमच केवळ आदी अंती ll२ll अशाच येती भेटीगाठी … […]

‘तू’

क्षणी पालटली कळा तूझा हात हाती आला माझा रुतु बदलला।।१।। नवा उगवला दिस तुला बांधुनिया पाशी भिरभिरे अवकाशी।।२।। काही उरले ना काज तुझा ध्यास निशीदिनी तुच स्वप्नी जागेपणी।।३।। जीव भारलेला असा तुझ्या नावाच्या पुढती सारी संपतात नाती।।४।। भान काळाचे नुरले आता आयुष्य ते किती तुझ्या श्वासांची गणती।।५।। …….।।मी मानसी।।