नवीन लेखन...

झाड आहे झुकलेले

झाड आहे झुकलेले, कमरेत थोडे वाकलेले , असून इतके बहरलेले, लीन होऊन सदैव नमले, किती पाहिले पावसाळे, केवढे उन्हाळे सोसले, शिशीरी गारठून गेले, हेमंती पुन्हा सावरलेले, केवढी वादळे, वारे आले, पावसात झाड भिजले, तरीही निश्चल खडे राहिले, कुणी आले घांव घातले, नाग सापांचे विळखे पडले, मुंग्यांनी बुंध्याला वारूळ केले, झाड निमूट स्थिर राहिले, कोणी तोडली त्याची […]

आरसा

दाखवितोस हूबेहूब रुप    आरशामध्ये मला मीच माझे रुप बघूनी    चमत्कार वाटला सत्य स्थितीचे द्दष्य करुनी    दाखविलेस सर्वाला उणें अधिक न करितां   तसाच दिसे आम्हाला गुणदोष बघूनी देहाचे    मुल्य मापन करितो आम्हीं चांगले राहण्या शिकवी    हीच युक्ती नामी कांचेच्या आरशापरीं असे    मनाचा अरसा आत्म्याची मलीनता दाखवुनी   चांगला बनवी माणसा   — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

मीरेची तल्लीनता

नाच नाचती तालावरती मीरेची पाऊले चित्त ते हरीमय जाहले. – – – धृ   लागला प्रभुचा ध्यास हरि दिसे नयनास चलबिचल नजर होऊन अंग सारे मोहरले   – – -१ चित्त ते हरीमय जाहाले   न राही आपले भान झाली भजनी तल्लीन तनमन प्रभुचे ठायी जाता संसार ते विसरले.  –  –  – २ चित्त ते हरीमय जाहाले […]

हिरकणी

गड्यांनो, — या लवकरी,उघडा हा दरवाजा, लेकरु वाट पाहे खाली, तान्हुला बाळ माझा, संध्याकाळ होऊन गेली , उशीर किती झाला आता, बाळ माझे झोळीत खाली, फुटू लागला मलाही पान्हा, भुकेलेला बाळ माझा, रडत असेल तो केव्हाचा ,घरांत दुसरे कोणी नाही, धनीही मोहिमेवर माझा, कुणी नसते अशावेळी, लेकराला लागतां भुका, मायच भूक जाणे त्याची, जीव तडफडे कसा […]

विशाल आपुले पंख फैलावुनी

विशाल आपुले पंख फैलावुनी, उंच उंच आभाळी उडावे, मनसोक्त रमतगमत दूरवरी, विहरत –विहरत गात जावे,–||१|| नको कुठले ताणतणाव, नकोच कुठल्या चिंता, भोवती निळा आसमंत, मेघ सारे नि विद्युल्लता,–||२|| वाटले तर वृक्षांवर बसुनी, निवांत करावी फक्त टेहळणी, स्वातंत्र्य फक्त राहावे जपत, नको कोणाचीच मनधरणी,–||३|| अपमान, मानभंग, दुःखे, कोणीच नको करायाला,– नातीगोती टोचती सारी, अवघ्या मानवजातीला,–||४|| आपल्या दिलाचा […]

पतंग

एक पतंग वरी चालला, डोलत आकाशीं भाळी त्याच्या यश कोरले, झेप घेई ती कशी    //   भरारी घेई पतंग ज्याला, आधार दोरीचा जाणीव होई येतां प्रसंग,  त्याला कटण्याचा    //   धरतीवरी कोसळत असतां,  दृष्टी टाकी आकाशीं इतर पतंग बघूनी बोलला,  तोच स्वतःशीं     //   ” नभांग मोठे दाही दिशा त्या,  संचारा स्वैरपणें आठवण ठेवा त्या शक्तीची,  […]

प्रतिक्रीया

क्रियेला प्रतिक्रिया, ध्वनीला प्रतिध्वनी तत्व ते सनातन, दिसे नित्य जीवनी फेकतां जोराने,  आदळे भिंतीवरी प्रवास परतीचा,  होई तुमचे उरीं शिवी वा अपशब्द, दिले कुणासाठी येवूनी धडकतील,  तुमचेच पाठीं प्रेमाने बोलणे,  सुंगध आणिते आनंदी लहरी,  मनां सुखावते   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

श्री कृष्ण जन्मी सेवेसाठी स्पर्धा

चालली स्पर्धा साऱ्यांची,  प्रभूची सेवा करण्याची….।।धृ।। निशाराणी संचारी निद्रीत जाई पहारेकरी खट्याळ वारे धावूनी दारे दिली उघडूनी विज चमकूनी आकाशी   मदत होई वसुदेवाची….१ चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची   पावसाच्या पडती सरी पक्षी नाचती तालावरी कोकीळेचे सुरेल गान आनंदाने वातावरण नागराजा फना काढूनी   काळजी घेई नव बाळाची….२ चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची   स्पर्श […]

 गुणधर्म

करूं म्हटले करूं न शकलो   रोकू म्हटले रोकू न शकलो जे जे स्फूरले येईल ते ते    ठरले असते होईल ते ते बघूनी बाह्य जगला ठरवी   मिळवीन तेच सुख भावी त्याचेसाठी स्थिती आगळी   उमज न येई ती सगळी धडपड करीतो गडबड करीतो   त्याच चाकोरीतूनी जाऊ लागतो सुप्त गुण हे अंगी लपले   उभारून ते येतील सगळे मात करूनी विचारावरती […]

येता तुझ्या चरणांशी

येता तुझ्या चरणांशी, पंढरीनाथा,वेगळी प्रचिती, लौकिकाचे काटे बोचती, पण अद्वैताचीच अनुभूती,–!!! अलौकिकाचे आम्ही प्रवासी, स्वर्ग आमुचा पंढरी, जन्मोजन्मी आंस तुझी, अनंतकाळाचे रे वारकरी,–!!! हिमगौरी कर्वे. ©

1 189 190 191 192 193 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..