श्री कृष्ण जन्मी सेवेसाठी स्पर्धा

चालली स्पर्धा साऱ्यांची,  प्रभूची सेवा करण्याची….।।धृ।।

निशाराणी संचारी

निद्रीत जाई पहारेकरी

खट्याळ वारे धावूनी

दारे दिली उघडूनी

विज चमकूनी आकाशी   मदत होई वसुदेवाची….१

चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची

 

पावसाच्या पडती सरी

पक्षी नाचती तालावरी

कोकीळेचे सुरेल गान

आनंदाने वातावरण

नागराजा फना काढूनी   काळजी घेई नव बाळाची….२

चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची

 

स्पर्श होता पायाचे

पाणी दुभंगले यमुनेचे

वाट त्याची करूनी

काढूनी साऱ्या अडचणी

नंदाघरची कन्या माया   दाखवी रूपे चमत्काराची…३

चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1763 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....