दृष्टी बदल

नवा चित्रपट बघण्या गेलो,   कुटुंबासह चित्र मंदिरी

चित्रगृह ते भरले असतां,   प्रवेश मिळाला कसातरी….१,

चित्रपट तो बघत असतां,  आश्चर्य वाटले जल्लोशाचे

टाळ्या, शिट्या देवून प्रेक्षक,  कौतूक करी नटनट्यांचे….२

वास्तवतेला सोडूनी,   रटाळपणे वाहत होते,

वैताग येवूनी त्या चित्राचा,   सोडून आलो मधेच मी ते….३,

घरी येवूनी शांत जाहलो,  आठवू लागलो बालपण

अशीच होती छायाचित्रे,  ज्यांत आमचे रमले मन….४

जीवनामधल्या चक्रामध्ये,  बदल फारसा होत नसतो

वयातल्या पायरीप्रमाणे,  दृष्टीमध्ये फरक घढतो….५

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1528 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…