नवीन लेखन...

मराठी आणि महाराष्ट्राविषयक बातम्या आणि घडामोडी…

अंतराळात मानवी मोहिमेच्या दिशेने इस्रो अग्रेसर

इस्रो जगाच्या अवजड आणि अब्जावधी डॉलर्सच्या प्रक्षेपण बाजाराच्या नव्या जगात पाऊल ठेवण्याची तयारी करत आहे. यासाठी आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटामध्ये अग्निबाण प्रक्षेपण केंद्रात भूस्थैतिक उपग्रह प्रक्षेपण यान एमके-3 विकसित केले जात आहे. हा अग्निबाण आतापर्यंतच्या सर्वात अवजड उपग्रहांना वाहून नेण्यास सक्षम असेल असे सांगण्यात आले. […]

तेजस एक्स्प्रेस आणि भारतीयांची मानसिकता

पहिल्याच प्रवासात प्रवाशांनी ‘तेजस एक्स्प्रेस’ची अक्षरश: दैना करून टाकली. काही व्यक्तींना नशिबाने अनेक चांगल्या गोष्टी मिळतात. मात्र, त्याच व्यक्ती आपल्या करंटेपणाने आणि वाईट सवयींमुळे या सगळ्यावर पाणी फेरतात, याचे मासलेवाईक उदाहरण सध्या ‘तेजस एक्स्प्रेस’च्या निमित्ताने अनुभवायला मिळाले आहे. गोव्याहून आपला पहिलाच प्रवास करून मुंबईत परतलेल्या या गाडीची अवस्था बघून रेल्वे अधिकाऱ्यांना धक्काच बसला. पहिल्याच प्रवासात प्रवाशांनी […]

रॅन्समवेअर व्हायरस

‘रॅन्समवेअर व्हायरस’ म्हणून ओळखला गेलेला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाल्यान शुक्रवारचा दिवस हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला. ‘वन्नाक्राय’ या रॅन्समवेअर व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला. सायबर सिक्युरिटी फर्म ‘अव्हास्ट’ने सांगितले की, भारतासहशंभराहून अधिक देश या हल्ल्याचे शिकार झाले. या हल्ल्याचा सर्वात जास्त फटका इंग्लडला बसला. इंग्लडमधील हॉस्पिटल्स आणि टेलिफोन यंत्रणा यामुळे खिळखिळी झाली. अनेक […]

‘भाडेकरूंचे भले होईल’

मोडकळीस आलेल्या व धोकादायक ठरविण्यात आलेल्या भाडेकरूयुक्त तसेच मूळचे ठाणेकर राहत असलेल्या अनेक इमारती जमीनदोस्त करून आता जवळपास दीड ते दोन वर्षे होत आली. काही इमारतींबाबत तर सहा ते आठ वर्षे होत आली. नव्या गृहनिर्माण धोरणात म्हाडा इमारतीसाठी जास्तीचे चटई क्षेत्र मंजूर करण्यात आले आहे. दाटीवाटीच्या क्षेत्रासाठीही क्लस्टर योजनेखाली अतिरिक्त चटई क्षेत्र मंजूर करण्यात आले आहे. […]

निमित्त : कृष्ण निवासाचे…

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नौपाडय़ातील कृष्ण निवास ही धोकादायक इमारत कोसळली आणि ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. त्यानंतर अशा प्रकारच्या संभाव्य धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना नोटिसा दाखवून बेघर करण्यात आले. त्यापैकी बरीचशी कुटुंबे सध्या रेंटल हाऊसिंग नामक असुविधांचा सामना करीत जगत आहेत. खरे तर धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचे प्रश्न समजून घेऊन त्याबाबत उपाययोजना […]

दादरचा अभूतपूर्व छंदोत्सव

१० आणि ११ मार्चला दादरच्या दादर सार्वजनिक वाचनालयातील ” छंदोत्सव २०१७ ” या विविध छंद जोपासणाऱ्यांच्या छंदांच्या प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. होळीच्या  सणाची सुट्टी, दुसऱ्या  शनिवारची सुट्टी , उत्कंठा शिगेला पोचलेल्या उत्तरप्रदेश निकालांची  घोषणा  आणि मुलांच्या परीक्षांचे दिवस यामुळे प्रदर्शनाला कसा प्रतिसाद मिळणार याबद्दल  साशंकता होती. पण उ.प्र. च्या निकालांप्रमाणेच या प्रदर्शनाला छंदप्रेमी प्रेक्षकांनी अतिशय अनपेक्षित  आणि […]

मनतरंग (भाग १) प्रकाशन सोहळा

येत्या शनिवारी म्हणजेच दिनांक ७ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता, नूतन बांदेकर लिखित मनतरंग (भाग १) या ललित लेखसंग्रहाचे व अॅडिओ सीडीचे प्रकाशन नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका मुख्यालय, पहिला मजला, ठाणे (प) येथे होणार असून माननीय महापौर संजयजी मोरे (ठाणे महानगरपालिका) यांच्या हस्ते प्रकाशन होईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संपदा जोगळेकर-कुलकर्णी (अभिनेत्री), मिलिंद […]

मन की बात – ‘राम मंदीर’ रेल्वे स्टेशन

२२ डिसेंबरला मुंबईत पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी आणि गोरेगांव या दोन स्टेशनमधील ‘राम मंदीर’ या नविन रेल्वे स्टेशनचे उद्घाटन झाले. ‘राम मंदीर’ हे नांव या नविन स्टेशनला दिलं हे चांगलच झालं यात दुमत नाही. पण सारा परिसर पूर्वीपासून ‘औशिवरा’ या नांवाने प्रख्यात आहे. मला वटातं ‘ओशिवरा’ हे नांव ‘ओम शिव हरा’ या भगवान शंकराच्या नांवाचा अपभ्रंश असावा. […]

देशभरात अत्यावश्यक सेवांसाठी ११२ हा एकमेव नंबर

देशभरात अत्यावश्यक सेवांसाठी असलेला ११२ हा एकमेव नंबर नव्या वर्षात कार्यान्वित झालाय. पोलीस, अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दल या सगळ्या सेवांसाठी ११२ हा एकमेव इमरजन्सी नंबर असेल. पोलिसांसाठी १००, अग्निशमन दलासाठी १००, ऍम्ब्युलन्ससाठी १०२ आणि आपत्कालीन संकटासाठी १०८ हे क्रमांक होते. मात्र आता एवढे नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही. केवळ ११२ हा नंबर डायल केल्यास या सगळ्या अत्यावश्यक सेवा उपलब्ध होणार आहेत. ट्रायने […]

चौथे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन २०१६

चारकोप, मुंबई येथे रविवार दि. १८ डिसेंबर २०१६ रोजी नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने चौथे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन २०१६ प्रचंड कवींच्या सहभागाने अत्यंत जल्लोषात पार पडले. सादर महाकाव्यसम्मेलनाचे महाकाव्यसंमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कवी व गीतकार प्रा.प्रविण दवणे होते. काळी 9.30 वा. नवनिर्माण मराठी ग्रंथालय ते महाकाव्यसंमेलन स्थळापर्यंत भव्य काव्यग्रंथ दिंडीचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्या दिंडीत अंदाजे […]

1 2 3 4 5 6 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..