नवीन लेखन...

देशभरात अत्यावश्यक सेवांसाठी ११२ हा एकमेव नंबर

112 - Single Number for All Emergency Services

देशभरात अत्यावश्यक सेवांसाठी असलेला ११२ हा एकमेव नंबर नव्या वर्षात कार्यान्वित झालाय.

पोलीस, अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दल या सगळ्या सेवांसाठी ११२ हा एकमेव इमरजन्सी नंबर असेल. पोलिसांसाठी १००, अग्निशमन दलासाठी १००, ऍम्ब्युलन्ससाठी १०२ आणि आपत्कालीन संकटासाठी १०८ हे क्रमांक होते. मात्र आता एवढे नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही. केवळ ११२ हा नंबर डायल केल्यास या सगळ्या अत्यावश्यक सेवा उपलब्ध होणार आहेत.

ट्रायने हा प्रस्ताव टेलिकॉम मंत्रालयापुढे ठेवला होता. अमेरिकेतील ९११ आणि इंग्लंडमधील ९९९ या इमरजन्सी नंबरच्या धर्तीवर भारतातही ११२ हा एकच इमरजन्सी नंबर असणार आहे.

तुमचं सिमकार्ड किंवा लँडलाईन नंबर काही काळासाठी बंद असेल किंवा आऊटगोईंग बंद असेल, तरीही हे ११२ या क्रमांकावर तुम्ही कॉल करु शकाल. त्याचप्रमाणे एसएमएसद्वारेही ही सुविधा उपलब्ध असेल. लोकेशन ट्रेस करुन तुमच्या गरजेनुसार संबंधित विभागाकडून मदत केली जाईल. त्याचप्रमाणे पॅनिक बटणवर ११२ नंबर सेव्ह करता येईल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..