नवीन लेखन...

कुटुंब !

भव्य मंडप उभारण्यात आला होता. मुख्य प्रवेशद्वारावर कानापर्यंत थोबाड फाकवलेल्या, उर्मटचेहऱ्याच्या माणसाचा हात जोडलेला, पांढऱ्याशुभ्र कपड्यातला, बाराफुटी कट आऊट बोर्ड, स्वागताला उभा केला होता. डीजेच्या भिंती, आणि बाकी — वेगळं काहीच नव्हतं. नेहमीची लगीन घाई, माणसांची वर्दळ, तेच ते. […]

नारायण भंडारीचं काय झालं ? – भाग २

जरी त्या राज्यातील निवडणूक असली तरी अखेर जगातील मोठ्या लोकशाहीचा महायज्ञ होता तो. त्यामुळे त्या इतमामात तो साजरा होण्याची काळजी घ्यायलाच हवी होती. पण नारायण भंडारी बावचळला होता. अस्वस्थ झाला होता . […]

मदतनीस ! (गूढकथा)

प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचणे जितकं कठीण असत, त्यापेक्षा तेथे टिकून रहाणं ज्यास्त अवघड असत. एकदा ती जागा हातून निसटली कि, मग जे दुर्लक्षत जीण नशिबी येते.. त्या पेक्षा नर्क बरा! आणि म्हणून त्यांना पुन्हा ‘त्याची’ मदत घेणे भाग दिसत होते! […]

ससा

प्रातिभा आाणि विजयचा नुकताच  विवाह झाला होता. विजयला विवाह करण्यात तसा फारसा रस नव्हता पण  घरच्यांच्या आग्रहाखातर  नाईलाजानं  त्याला तस करावं लागलं  होत. प्रातिभाचीही विवाहाबाबत फारशी काही स्वप्ने  बहुदा नसावित. […]

निरोप्या!

उंच्यापुऱ्या भारदस्त विष्णुपंतांनी शेजारच्या तांब्याच्या पेल्यातले पाणी, तोंड वर करून नरड्यात ओतले. पांढऱ्याशुभ्र धोतराच्या सोग्याने, ओल्या मिश्या साफ केल्या. गरमागरम चहा बशीत ओतून मन लावून पिला. चहा पिताना, अभिमानाने आपल्या वाडलोपार्जीत, भव्य दगडी तटबंदी असलेल्या वाड्यावरून समाधानाने नजर फिरावी. हत्तीवर अंबारीत बसून त्यांचे पूर्वज, या समोरच्या वीतभर रुंद भरीव लोखंडी दाराच्या कमानीतून येत असत! […]

जाणिवांची अंतरे (कथा)

भाऊ आणि माझी ओळख साधारण दहा वर्षापूर्वीची. त्या वेळी मी नुकताच वकिलीचा व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीला फारशी काम मिळतच नसत. कामाचा शोध हाच खरा व्यवसाय असायचा. एक दिवस कोर्टात रिकामा बसलो असताना भाऊ माझ्या टेबल समोर येऊन उभा राहिला. त्याला कुणाची तरी जमानत करायची होती. पण त्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. मी हे काम सामाजिक दायित्व म्हणून स्वीकारावं, असा त्याचा आग्रह होता. […]

लेखणी (कथा)

आता तो मुलगा – अर्थात मी – विजय जाधव एक नवोदित लेखक म्हणून उदयाला आलोय. समाजात एक घमेंडी, अकडू, आणि पाषाण  हृदयी तरूण म्हणून वावरतोय. आज लोक माझ्याकडे काम घेऊन यायला धजावतात कारण ती करायला माझ्याकडे वेळ नाही आणि ती करणं माझ्या प्रतिष्ठेला  शोभतही नाही. […]

मृगजळ (कथा)

त्या दिवशी  प्रतिभाला एका तरूणाचा चुकून  धक्का लागला असता प्रतिभाला वाटलं त्या तरूणानं आपल्याला जाणुनबुजून धक्का दिला असावा म्हणून प्रतिभा रागावून त्याला म्हणाली, ‘काय रे ! आंधळा आहेस का ? दिसत नाही का ? की जाणुनबुजून धक्का मारतोस ?’ त्यावर तो तरूण रागावून म्हणाला, तू काय स्वतःला महाराणी समजतेस काय ? तसं असेल तर रिक्षाने किंवा टॅक्सीने जात जा ! […]

आई (कथा)

वर्गात प्रतिभा अतिशय हुशार  असण्याबरोबरच वकृत्व आणि अभिनय याचीही तिला योग्य जाण होती. शाळेत होणाऱ्या वत्कृत्व  आणि नाटयस्पर्धेत ती नेहमीच भाग घेत असे त्यात तिला बक्षीसही मिळत असे आपल्या यशाचे श्रेय प्रतिभा नेहमीच आपल्या आईला देत असे . ते देताना  ती म्हणे ” माझ्या आईने मला नेहमीच मी मुलगी असूनही एखादया मुलाप्रमाणे स्वतंत्र दिलं ! […]

1 … 81 82 83 84 85 … 115
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..