नवीन लेखन...

जमेल तेवढे तर करू!

वेगळं राहिलं म्हणजे आपण गॅस बंद न केल्यामुळे दूध उतू जाऊन भांडं जळून काळं कसं होतं, किल्ली घरात विसरल्यावर कसा कल्लोळ होतो, भाजी आणायला गेल्यावर नाइलाजाने आपल्याला न आवडणारा भोपळा किंवा दुधी कशी ‘झक मारत’ घ्यावी लागते, आपली गाडी कितीही मोठी असली तरी त्यातून दळण कसे आणावे लागते वगैरे…’ अनिल. इथे सर्वांच्या हास्याचा धबधबा! […]

संस्कारांची जपणूक

रमाबाईंना हुरहूर लागली होती.. असं काय घडलं आहे.. आज माझी दोन्ही लेकरं न सांगता, नमस्कार न करता गेले आहेत.. असंख्य विचार मनात येत होते. पण त्यांनी ठरवले होते की, आज डोळ्यातून पाण्याचा थेंब काढायचा नाही. त्या पुढील कामासाठी वळल्या इतक्यात संदीपचा फोन आला, ‘आई, आम्हां दोघांनाही कंपनीच्या कामानिमित्त बाहेर जावं लागत आहे, तेव्हा तू तुझी बॅग भरून ठेव. […]

शोधा म्हणजे सापडेल!

“आई आता बास झालं हं तुमचं, चांगुलपणा शोधणं! प्रत्येक गोष्टीत चांगुलपणा पाहावा, चांगुलपणा शोधावा हे ऐकून ऐकून आम्ही कंटाळलो. आयुष्यभर चांगुलपणा शोधून तुम्हाला मिळालं काय, ते तरी कळू दे.” वृंदा चिडून चिडून बोलत होती आणि तितक्याच थंडगारपणाने त्यांनी उत्तर दिलं, “तुझ्यासारखी सून मिळाली.” […]

तुला शिकवीन चांगलाच धडा …..

त्यांची जिद्द बघून त्याने सांगितले की, उद्या इंडिपेंडन्स डेच्या बंदोबस्तात तो व्यस्त असेल. पण एकदोन दिवसात तो जरूर त्या मुलीचा शोध घेईल आणि तिला धडा शिकवण्याच्या कामात त्याला नक्की मदत करेल. […]

कथातरंग – अनुपच्या शब्दात सल्ला

साधारण पांच एक वर्षांपूर्वी धोंडीबा कडे सहा एकर बागायती शेती होती, आणि शेताच्या एका कोपर्‍यात तीन खोल्यांचे छोटेसे पण देखणे असे कौलारू घर होते. त्यात धोंडीबा, राधा आणि त्यांची एक मुलगी राहत असे. दिवसभर कष्ट करून त्याने हे माळरान नंदानवनात फुलवले होते. कोणाकडे काही मागायची गरज पडणार नाही अशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह चालला होता. […]

फोटो झिंको

शनिवार होता, दुपारचे चार वाजले होते. मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो. त्यावेळी शनिवारी बँकेचे कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत चालत असे. सोमवारी सुट्टी होती म्हणून बाहेर गावची मंडळी त्यांच्या गाडीच्या वेळेनुसार, काम संपवून किंवा उरलेले काम आपल्या सहकाऱ्यांवर सोपवून निघून गेली होती. इतक्यात एक क्लार्क केबिनमध्ये आला, त्याने विचारले की, साहेब तुम्ही किती वाजेपर्यंत थांबणार आहात? माझी […]

कॅश व्हॅन

मी आणि माझी बायको दोघेही बँकर. म्हणजे नोकरी बँकेत होती. बायकोची केशिअर कम क्लर्क अशी हायब्रीड पोस्ट. बँक ऑफ इंडिया. 25 वर्षांपूर्वीचा अनुभव. एखाद्या ब्रँचला थोडे दिवस रुळलो की ती शाखा तिथले कर्मचारी, तिथले काम आणि तिथले ग्राहक चांगले वाटायला लागतात. अशावेळी बदली झाली की विनाकारण पोटात गोळा येतो. बापरेऽऽऽ नाविन्याची मनात थोडीशी भीतीच असते. कदाचित […]

कुराण शपथ

या गोष्टीला झाली आता बारा वर्षे. मी त्यावेळी बँकेत दादर मुंबई येथे शाखाधिकारी म्हणून कार्यरत होतो. दिवाळी जवळ आली होती. खातेरदारांची पैसे काढण्याची गर्दी रोज होत असे. […]

लाखांची गोष्ट

शहरामध्ये बँकांचे आपसातील व्यवहार जेथे चालतात, त्याला समाशोधनगृह (Clearing House) म्हणतात. बँकेचे ग्राहक विविध बँकाचे चेक, डिव्हिडंड वारंट (Dividend Warrant), ड्राफ्ट वगैरे त्यांच्या खात्यात जमा करावयास देतात. ते चेक, डिव्हिडंड वारंट वगैरे त्या त्या बँकेला देण्यात येतात. ती बँक ते चेक, डिव्हिडंड वारंट ज्यांचे आहेत, त्यांच्या खाते नावे टाकतात. आणि ती रक्कम ते देणाऱ्या बँकेच्या खात्यात जमा करतात. […]

आणखीन एक

दुपारची वेळ, डोळ्याला डोळा नुकताच लागला होता. नको त्या वेळेस घणघण्याची फोन ची सवय. सवयीप्रमाणे तो घणघणलाच. कुस बदलून घेतला. ओळखीचा नंबर नव्हता. माझ्या सारख्या छोटया पडद्यावरच्या अभिनेत्याला सुद्धा असे unknown number घेणे आवडत नसते, ego issue म्हटले तरी चालेल. पण गेले कित्येक दिवस घरात बसून कंटाळलोच होतो. विचार केला, जरा वेळ चांगला जाईल आणि फोन […]

1 11 12 13 14 15 105
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..