नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

नागबळी – Part 1

सुनीता माझी धाकटी बहीण. माझ्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी लहान. लहानपणापासून दादा दादा म्हणून सारखी माझ्यामागे असते. आता ती दहावीला आणि मी बारावीला आलो तरी तिला माझ्याशिवाय करमत नाही. भांडेल, रुसेल पण शेवटी सुनीलदादा म्हणून लाडीगोडी करायला येणारच. माझ्या वडिलांची फिरतीची नोकरी. दर दोन तीन वर्षांनी बदल्या ठरलेल्या. मग नवीन गाव, नवीन शाळा, नवीन मित्र अशी मजा […]

गुप्तहेर गोमु – भाग १ (गोमुच्या गोष्टी – भाग १३)

गुप्तहेर (डीटेक्टीव्ह) ही कल्पना तशी जुनीच. गुप्तहेर हे ही कांही आपल्याला नवीन नाहीत. मध्ययुगापासून ते तहत दोन्ही महायुध्दांपर्यंत गुप्तहेर होतेच. पुराणांमध्येही कचाने देवांतर्फे हेरगिरी केलीच होती. आधुनिक युगांत खाजगी गुप्तहेरांची मराठी लोकांना, विशेषतः मराठी वाचकांना, ओळख करून दिली ती कै. लेखक बाबूराव अर्नाळकर यांनी. […]

बालनाट्य उद्याचे (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ५)

आजची बालनाट्य मोठी माणसं लिहितात.तेच बसवतात.लहान मुलांना फक्त अभिनय करायचा असतो.तोही अभिनय कसा करावा,हे मोठेच शिकवतात.लहान मुले मोठ्यांची नक्कल करत मोठ्यांचा अभिनय करतात. सर्कशीत प्राण्यांकडून वेगवेगळी कामे करून घेतात.ते बघून प्रेक्षक कौतुकाने टाळ्या वाजवतात….आजचे बालनाट्य हे असेच सर्कशीचा प्रकार आहे.आजच्या बालनाट्यात मुलांचा सहभाग हा कळसूत्री च्या बाहुल्या प्रमाणे आहे.मुलांना बालनाट्याकडे आकर्षित करायचे असेल तर मोठ्यांनी “दरवेशी”च्या भूमिकेतून आधी बाहेर पडायला हवं… […]

शिवरंजनी

” शिवरंजनी ” हा मुळातच राज कपूर, शंकर -जयकिशन, लता,मुकेश मंडळींचा आवडता राग ! यातल्या रचना भेदक असतात. “संगम ” (१९६४) मधील “ओ मेरे सनम” हे गाणे याच घराण्यातील ! […]

स्त्री

प्राचीन ऐतिहासिक काळात देखील स्त्रिया सुशिक्षित असून सर्व शास्त्रात पारंगत होत्या. सर्वांची नावे किंवा दाखले देणे इथे अशक्य आहे. थोडक्यात आजच्या काळात स्त्रीची प्रगती अधिक सबल आणि समोर येणाऱ्या प्रत्येक क्षणाला धैर्याने, विवेकबुद्धीने सामोरी जाण्याची जिद्द बाळगून आहे. हेच महत्वाचे आहे. […]

सोल्यूशन डॉट कॉम (कथा)

मुंबईच्या दौऱ्यात एक दिवस रिकामा होता. खूप दिवस झालेत, दिवस काय वर्षं झालीत विठूला भेटलो नव्हतो. ठरवलं, जमलं तर भेटायचं. खूप ऐकलं होतं त्याच्या गरुड भरारीबद्दल. त्यामुळे खूप बोलायचं होतं. बरंच काही जाणून घ्यायचं होतं. […]

भिकारी (कथा)

लाकूडवखारवाल्या साखरपेकरानी घरात प्रवेश करत असताना मागं वळून बघितलं. अंगावरच्या कपड्यांची लक्तरं झालेला, दारुच्या नशेत असल्यासारख्या डोळ्यांचा आणि दाढीच्या वाढलेल्या खुंटांमधून करपलेले गाल दिसत असलेला माणूस फाटकाबाहेर उभा राहून हात पुढं करून बोलत होता. साखरपेकराना त्या भिकाऱ्याला कुठंतरी बघितल्यासारखं वाटलं. […]

भंगारातली बांगडी – Part 2

शामराव तपास आटोपून परत आले. त्यांच्या मनात मात्र हा भोळसट दिसणारा दिनकरच या प्रकरणाच्या मागे असावा असे राहून राहून वाटत होते. बांगड्यांचे तुकडे सापडल्यापासून त्यांच्या मनात एक कल्पना घोळू लागली होती. या पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी मिसिंग केस संदर्भात या भागातील आणि त्याच्या आसपासच्या भागातील सर्व मिसिंग, मर्डर, अॅक्सिडेंट केसचा धांडोळा घेतला होता पण दिनकर आणि ऐश्वर्या कोकणातल्या […]

ओढ्याच्या पल्याड (संक्षिप्त रूपांतरीत कथा ५)

ओढा जिथे चंद्रकोरीसारखा वळला होता, तिथूनच थोड्या अंतरावर खुळीचं खोपट होतं. खुळीचं खोपट आणि ओढा ह्यामध्ये मोठं मोकळं कुरण होतं. जेव्हां ओढा पाणी पुरवत असे तेव्हां कुरणात गुरं चरत. मागची झाडी आणि समोरचा ओढा ह्याभोवती खुळीने मनाने एक वर्तुळ आंखून घेतलं होतं. त्याबाहेर ती जात नसे.
हाच तिचा खुळेपणा होता. […]

‘बोनस’ लाईफ

वयाच्या साठीनंतर उपभोगलं जाणारं प्रत्येकाचं जीवन, हे ‘बोनस’ लाईफच असतं. बालपण वय वर्षे चौदापर्यंत, भुर्र उडून जातं. गद्धेपंचविशीपर्यंत, शिक्षण पूर्ण झालेलं असतं. नोकरी आणि छोकरी तिशीपर्यंत, जीवनात समाविष्ट होते. पुढील तीस वर्षे पाठीचा कणा तुटेपर्यंत, संसाराचा गाडा हाकावा लागतो. साठीपर्यंत घरातील जबाबदाऱ्या पार पाडून, तृप्त भावनेने, कर्ता करविताचे अस्तित्व अनेक युद्ध गाजवून छातीवर दहावीस मेडल्स मिरविणाऱ्या, […]

1 161 162 163 164 165 489
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..