नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

नोबेल पुरस्काराइतकाच श्रेष्ठ भारतीय साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार

ज्ञानपीठ पुरस्कार सुरू करण्यामागे रमा जैन यांची प्रेरणा होती. रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतिप्रसाद जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या गौरवार्थ हा पुरस्कार देण्याचे ठरवले. २२ मे १९६१ या दिवशी साहू जैन यांच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी स्वतःच्या कौटुंबिक ट्रस्टमधून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा केली. त्यानुसार भारतीय ज्ञानपीठाच्या संस्थापक अध्यक्षा रमा जैन यांनी १६ सप्टेंबर […]

उल्लू टिल्लू बेडूक (संक्षिप्त रूपांतरीत कथा २२)

ह्या राजा जेवढा विनोदप्रिय होता, तेवढी विनोदप्रियता असलेल्या दुस-या कुणा व्यक्तीबद्दल मी कधी ऐकलं नव्हतं. त्याचे जगणंच विनोदासाठी होतं असावं. त्याची मर्जी कमवायची असेल तर विनोदी गोष्ट त्याला ऐकवायची. त्यामुळे त्याचे जे सात मंत्री होते ते सगळे उत्तम विदूषक होते. ते राजाची यथास्थित काळजी घेत व स्वत:चीही. त्यामुळे ते चरबीने युक्त गोल गरगरीत झाले होते. विनोद […]

धुणी भांडी

हल्ली फक्त भांडी आणि घरातील लादी पुसण्यासाठीच बाई कामाला लावतात. पण पूर्वी घरात लेकीसुना ही कामे करत असत. आणि काही प्रमाणात भांडी घासायला बाई यायची. भांडी घासणे ही सुद्धा एक कलाच आहे. याचे वर्गीकरण असे व्हायचे.मला वाटते की ही भांडी घासताना मनाचे चित्रण त्यात दिसून येते कदाचित यात काही तरी संबंध असावेत. …. […]

मी नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल…

हे पुस्तक वाचताना भान हरपल्यासारखे होते.. आणि पुस्तक संपताना खूप ओकबोकं वाटू लागत..अचानक एवढ्या मैत्रिणींच्या गराड्यातून व त्या निसर्गरम्य गावातून बाहेर फेकलं गेल्यासारखं वाटतं.. लेखिकेचा हात सुटल्यासारखा वाटतो, इतकं ते अनुभव वाचतांना आपण एकरूप झालेलो असतो. वाचन संपतं परंतु त्या एकटेपणातही त्या मनोरम आठवणी ते प्रसंग मेंदूत घोळत राहतात.. मनात रेंगाळत राहतात. […]

अभिनेते कुमार दिघे

कुमार दिघे यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९३३ रोजी कराची येथे सीकेपी कुटुंबात झाला .त्यांच्या आधीच्या चार पिढ्या कराची येथे रहात होत्या .फाळणीमुळे कुमार दिघे पुणे येथे आले व मामाच्या आश्रयाने राहू लागले .त्यांनी एस .पी .महाविद्यालयातूनएम .ए .पर्यंत शिक्षण पूर्ण केले .शिक्षण घेत असतानाच कुमार दिघे अभिनयाच्या क्षेत्राकडे आकर्षित झाले […]

सूर्यास्त

आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आल्यावर माणसाला निवांतपणा मिळतो. मग जरा मागे वळून बघावसं वाटतं आणि तेव्हा हळूहळू सुरवातीचा काळ आठवतो. आयुष्याची परंपरागत विभागणी चार भागात आश्रमात केली आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास. तशीच ही सुद्धा एक व्यवस्था आहे. बालपण, किशोरवय, प्रौढपण आणि मग हळूहळू म्हातारपण. […]

एका डोळ्यात आसू तर….

ही गोष्ट आज सांगतांना मात्र अतिशय आनंद होतो अभिमान वाटतो की एवढया दुर्गम भागात आपण सुरूवातीचे दिवस काढले पुढे मग शाळेवर गेल्यावर याचे काहीच वाटले नाही. अतिशय आनंदाने शाळेत जात असे मी उलट घरी आल्यावरच करमत नसे अशी माझी पहिली नोकरीतील शाळा. आज ही माझ्या तेवढीच चांगल्या रितीने स्मरणात राहिली आहे. […]

आम्ही सारे कायस्थ

परवा मी गांवदेवी मार्केटमधे भाजी घेण्यात व्यस्त होते. तोच कानावर शब्द पडले….. अग मोहिनी उद्या सोमवार! पण  बिरड्याचे वाल टाकायचे राहिले नं काल, ते सोललेले वाल घ्यायला मला नाय बाई आवडत. आता करीन झालं ‘वडीचं सांबार’.…. ते टिपीकल “कायस्थी” शब्द ऐकून मी बाजूला आदराने बघितलं. मग ओळख निघाली … मग कुठूनतरी नातं देखील निघालं…हे अस्सं असतं आम्हां कायस्थांचं. […]

वारी !

दोन दिवस तीन गावांमध्ये काळाला स्थगिती देत आणि टाइम मशीनला १९७५ मध्ये सेट करीत आम्ही हिंडून आलो “तिच्या “वारीसाठी ! […]

‘फेका’डे भाऊजी

‘मल्टी लेव्हल मार्केटिंग’ म्हणजेच ‘मला लोंबकळलेली माणसं’.. अशा स्किममध्ये आपल्याला अडकवणारे, नंबर एकचे ‘फेकाडे’ असतात.. माझा इयत्ता पहिलीतला मित्र, माझ्या पन्नाशीत मला भेटला. त्यानं जनरल चौकशीनंतर, विषयाला हात घातला. तो म्हणाला, ‘आतापर्यंत खरं तर तू, तुझ्या कारमधून फिरायला हवा होतास.. अजूनही वेळ गेलेली नाही.. तू माझ्या स्किममध्ये सहभागी हो.. काही महिन्यांतच कारमधून फिरशील..’ मला ओशाळल्यासारखे झाले.. एवढं कळकळीनं सांगतोय, तर प्रयत्न करुन बघू.. म्हणून मी सहभागी झालो.. आठवड्यातून तीन वेळा सेमिनारला जाऊ लागलो. कळसूत्री बाहुलीप्रमाणे, लेक्चर देणाऱ्याच्या इशाऱ्यावर टाळ्या वाजवू लागलो.. दरवेळी एखाद्या नवीन मित्राला, ‘बकरा’ करुन घेऊन जाऊ लागलो.. महिन्याभरातच, माझ्याखाली कुणालाही जोडू न शकल्याने स्किममधील पैसे वाया गेले आणि मी नैराश्यात गेलो.. […]

1 142 143 144 145 146 490
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..