नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

ज्येष्ठत्व नको पण कायदा आवर!

“काका आपल्या अंधश्रद्धा विशेषकांसाठी तुम्ही कायदामंत्री श्री. खुशालरावजी चिंधडे यांची घेतलेली मुलाखत आपल्या वाचकांना फारच आवडली. वाचकांची नुसती पत्रावर पत्र येताहेत.” रोजची पहाटचे संपादक, विशेषांक सम्राट, सूर्याजीराव रविसांडे आपले वार्ताहर काका सरधोपट यांच्यावर फारच खूश झाले होते. “होय साहेब, कायदेमंत्र्यांनी अंधश्रद्धा निमूर्लन कायद्यामध्ये अंधश्रद्धावाले आणि अंधश्रद्धा निर्मूलनवाले या दोघांचेही कसे समाधान केले आहे ते अगदी छान […]

‘कवितेचे झाड’

शब्दांचे पक्षी येऊन बसतात भावनांनी लदबदलेल्या वाक्यांच्या फांदीवर तेंव्हा सुरु झालेला असतो. कवितेचा किलबिलाट पानांपानांच्या आडून…मुळासहित सगळ्या झाडाचे कान अधिर होऊन जातील काही क्षणातंच..स्तब्ध होऊन आकाश ही विसावेल क्षणभर ढगांसहित…हळूहळू..उतरत जाईल कविता कागदावर..मेघातून झिमझिम बरसणाऱ्या पावसाच्या थेंबाप्रमाणे.. कोंब फुटतील शब्दांना मनाच्या मऊ-मऊ मातीत खोल..वर येण्यासाठी संघर्ष होईल मातीशी.अंगातले सारे बळ एकवठून वाट काढत शिरावे लागेल मातीच्या […]

भय अजून संपत नाही

आता हे सगळे प्रश्न भिती पोटीच निर्माण झाले असतील. ऑनलाईन शिक्षण चालू होते तेव्हा या गोष्टींना मुकलेले विद्यार्थी असेच विचार करत असतील असे मला वाटते. घरातील एका ठिकाणी बसून मोबाईल वर बसून शिकणे. थोडा वेळ झाला की काही तरी खाणे. थोडे उशिरा उठणे. घरातील लोकांबरोबर जेवणे. अभ्यास करणे. लिहिणे. आणि बऱ्याच गोष्टी करतांना काही तरी सांगायच होत त्याला पण तो बोलत नव्हता. […]

आठवणींचे शिंपले वेचताना

‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ असे म्हणतात ते उगाचच नाही. लहानपणी मला गोष्टींचे पुस्तक वाचण्याचे वेड होते. इसापनितीच्या कथा वाचून वाचून पाठ झाल्या होत्या. दहा वर्षांची असताना स्वयंपाकघरातील तांबड्या कोब्यावर मी ‘कविता’ लिहिली होती. तो कोबा म्हणजे माझी ‘पाटी’ असायची. मोठ्ठाली गणिते त्यावर मी सोडवित असे. […]

विवाह (अलक)

नोंदणी पद्धतीने विवाह करून दोघे घरी आले. त्याचा ओसंडून वाहणारा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. काय करू आणि काय नको, तिच्याशी काय बोलू आणि काय नको असं त्याला झालं होतं. आईने हातात आणून दिलेल्या कॉफीचा घोट घेत तो तिला म्हणाला- “आज मी फार फार खूश आहे…आनंदात आहे.” “का रे?” “मला तुझ्यासारखी बायको मिळाली.” “म्हणजे कशी?” “शोधून […]

संतप्त शहर

अशीच होरपळ झाली तर शहराची शिस्त किती दिवस टिकेल? साठणारा संताप मग रेल्वेच्या मालमत्तेपुरता सिमित राहणार नाही. त्या संतापाचा वणवा इतका वाढेल, की त्यात काहीच शिल्लक राहणार नाही. रेल्वेची मालमत्ता नष्ट करण्यामुळे प्रवाशांचेच अधिक हाल होतात, हे शहाणपण पुढारी मंडळी शिकवू शकतात […]

जुनागढचा लघुचित्रकार

नसीर नेहेमीच शब्दांच्या पलीकडे असतो. “फिराक”, ” द वेन्सडे “, ” चायना गेट” आणि अगदी अलीकडचा – अवेळी पावसासारख्या मागील वर्षी निघून गेलेल्या “फिर जिंदगी” वाल्या सुमित्रा भावेंच्या लघुपटात! […]

‘एक हजार’च्या दिशेने

मुक्काम पोस्ट एक हजारमुळे माझ्याकडे असलेल्या मर्यादित वेळेची मला प्रो. अरुण गाडगीळ याने भिवंडी कॉलेजसाठी माझा कार्यक्रम आयोजित केला. महाराष्ट्र राज्य अल्पबचत योजनेतर्फे केंद्रिय अपंग कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी मान्यवर गायिका पुष्पा पागधरे, चंद्रशेखर गाडगीळ आणि श्याम हर्डीकर यांच्याबरोबर खोपोली, रोहा आणि ठाणे येथे तीन कार्यक्रम केले. या मदतीसाठी अजून दोन कार्यक्रम पालघर आणि डहाणू येथे सादर केले. […]

देवभूमीतील पंचबद्री – परिचय

हिमालय ही देवभूमी आहे. देवदेवतांचे निवासस्थान आहे. तर पवित्र नद्यांचे हे उगमस्थान आहे. ही ऋषिमुनींची तपोभूमी आहे. या देवभूमीत वेदपुराणाची रचना झाली. या पवित्र भूमीत हिंदू संस्कृती उमलली व भारतवर्षात दरवळली. हिमालयातील सगळीच स्थाने तप:पूत आहे. म्हणूनच हिमालयाला ‘देवतात्मा’ म्हणतात. गढवाल हिमालयात केदारनाथ, मद्महेश्वर, तुंगनाथ, रूद्रनाथ व कल्पेश्वर अशी पाच शिवस्थाने आहेत. ही स्थाने ‘पंचकेदार’ म्हणून […]

ओ हेन्री – संक्षिप्त चरित्र-कथा

इंग्रजीतील सुप्रसिध्द कथालेखक ओ हेन्री याच खरं नाव विल्यम सिडनी पोर्टर.
विश्वास बसणार नाही पण त्याला पैशांच्या अफरातफरीच्या आरोपावरून तुरूंगात रहावं लागलं होतं.
त्या काळांत त्याने कथा लिहितांना ओ हेन्री हे टोपण नांव धारण करून आपलं लेखन प्रसिध्दीस पाठवलं आणि पुढे तो याच नावाने लिहित राहिला व प्रसिध्द झाला. […]

1 121 122 123 124 125 490
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..