नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

एक नवी जबाबदारी

‘भावनिक जगातील या उलथापालथीनंतर व्यावहारिक जग माझी वाट पहात होते, भाऊ गेल्यानंतर केवळ दुसऱ्याच दिवशी या व्यावहारिक जगाच्या मैदानात मला उतरावे लागले. कारण आमच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवहार सुरूच होते. माझे काका गजानन जोशी, वसंत जोशी, श्रीकृष्ण जोशी, माझे मामा सुरेश धनवटकर आणि आमच्या कंपनीचे चार्टर्ड अकाऊंटंट आणि भाऊंचे जवळचे मित्र सहदेव चौगुले यांच्या सल्ल्यानुसार माझे […]

भुताला बढती

मग त्या भुतानं त्याला मक्यापासून दारू कशी बनवायची ते दाखवून दिलं. शेतकऱ्यानं कडक दारू बनवायला सुरुवात केली. स्वत: प्यायला आणि मित्रांनाही पाजायला लागला. […]

वेगळा (कथा) भाग ३

दुसर्या दिवशी शाळा सुटल्यावर ठरल्याप्रमाणे बाबू अशोकला भेटला ,घरी जाताना अशोक ने बाबुला विचारल , “आज संध्याकाळी तू भेटशील मला ?” […]

‘लता’

खचाखच भरलेल्या लोकल मधे.. घुसमटलेल्या श्वासात व घामेजल्या अंगानी उभे, प्रवास नामक नरकवास सहन करत असतो आम्ही तेंव्हा अनाहुतपणे वाजतो कोणा अगांतुकाचा फोन अन त्या गर्दीला चिरत आमच्यापर्यंत येतो तुझा स्वर “ओ पालनहारे, निर्गुण और न्यारे.. तुमरे बिन हमरा कौनो नाही..” चेह-यावर त्या स्थितीतही एक अस्फुट स्मित येते..
शेजारचा दाढीवालाही ओळख नसताना हसतो..
पुढचा प्रवास सुखकर होतो.. […]

देवभूमीतील पंचबद्री  – आदीबद्री

आदीबद्रीचे मंदिर कर्णप्रयाग-रानीखेत रस्त्यावर कर्णप्रयागापासून १८ कि.मी. आहे. बसेस, जीप इ. वाहनांची या मार्गावर वर्दळ असते. आदीबद्रीचे मंदिर हे चौदा मंदिरांचे संकुल असून साधारण ५० x २० मी. क्षेत्रावर पसरले आहे. ही सर्व मंदिरे चौथऱ्यावर स्थापीत असून त्यातले सर्वात महत्त्वाचे मंदीर म्हणजे आदीबद्रीचे! मंदीर फारसे मोठे नाही पण मंदिरावरील शिल्पकाम सुरेख आहे. मंदिराच्या गर्भगृहात साडेचार ते […]

ॲंटोन चेकॉव्ह याची चरीत्र-कथा

चेकॉव्हच्या कथांत दिसून येणाऱ्या बंडखोरीचा उगम आईला व मुलांना त्यांच्याकडून मिळणारी हिंसक वागणूक यामधे असावा, असा एक तर्क कांही समीक्षक लावतात. चेकॉव्ह डॉक्टर होता व तो मजेत म्हणत असे, “वैद्यकी ही माझी कायदेशीर पत्नी आहे तर साहित्य हे माझे बाहेरचे “प्रकरण” आहे.” […]

चिमूटभर आनंद

एकदा रूक्मिणी आणि सत्यभामा दोघीजणी कृष्णाला जेवायला वाढत होत्या. म्हणजे बरीच मोठी पंगत बसली होती पण त्या दोघींचं लक्ष कृष्णाला काय हवं-नको याकडेच लागलं होतं. सत्यभामा अगदी आग्रहाने कृष्णाला श्रीखंड वाढत होती आणि कृष्णही तितक्याच प्रेमाने तिनं वाढलेलं श्रीखंड खात होते. आपण केलेला आग्रह कृष्णाला आवडतोय. आपल्या हातून कृष्ण पुन: पुन: श्रीखंड घेतायत.. हे बघून सत्यभामेला […]

” मधल्या सुट्टीतील डबा “

मागे वळून बघण्याच्या वयात आल्यानंतर सगळ्यांनाच स्नेहमेळाव्याची/बालपण भेटण्याची ओढ लागते. आम्ही त्याला अपवाद नाही. माझ्याकडे भेटीचे असे तीन पर्याय आहेत- भुसावळचे शाळूसोबती, सोलापूर हदे चे मित्र आणि सांगलीच्या वालचंदचे स्नेहगडी ! संधी मिळेल तशी मी प्रत्येक पाणवठ्यावर हजेरी लावत असतो. […]

एक आघात

या नंतर मात्र पुढील महिन्यात मी एकही कार्यक्रम घेतला नव्हता. माझा सख्खा चुलत भाऊ प्रकाश याचे लग्न १ डिसेंबर १९९१ ला ठरले होते. त्यामुळे जोशी परिवारात प्रचंड धावपळ सुरू होती. लग्न भिवंडीला होते आणि दोनच दिवसांनी मोठ्या स्वागत समारंभाचे आयोजन पुण्याला करण्यात आले होते. दिवस गडबडीत जात होते. लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे ३० नोव्हेंबरलाच आम्ही सर्वजण […]

ज्येष्ठत्व नको पण कायदा आवर!

“काका आपल्या अंधश्रद्धा विशेषकांसाठी तुम्ही कायदामंत्री श्री. खुशालरावजी चिंधडे यांची घेतलेली मुलाखत आपल्या वाचकांना फारच आवडली. वाचकांची नुसती पत्रावर पत्र येताहेत.” रोजची पहाटचे संपादक, विशेषांक सम्राट, सूर्याजीराव रविसांडे आपले वार्ताहर काका सरधोपट यांच्यावर फारच खूश झाले होते. “होय साहेब, कायदेमंत्र्यांनी अंधश्रद्धा निमूर्लन कायद्यामध्ये अंधश्रद्धावाले आणि अंधश्रद्धा निर्मूलनवाले या दोघांचेही कसे समाधान केले आहे ते अगदी छान […]

1 120 121 122 123 124 490
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..