नवीन लेखन...

देवभूमीतील पंचबद्री – परिचय

हिमालय ही देवभूमी आहे. देवदेवतांचे निवासस्थान आहे. तर पवित्र नद्यांचे हे उगमस्थान आहे. ही ऋषिमुनींची तपोभूमी आहे. या देवभूमीत वेदपुराणाची रचना झाली. या पवित्र भूमीत हिंदू संस्कृती उमलली व भारतवर्षात दरवळली. हिमालयातील सगळीच स्थाने तप:पूत आहे. म्हणूनच हिमालयाला ‘देवतात्मा’ म्हणतात.

गढवाल हिमालयात केदारनाथ, मद्महेश्वर, तुंगनाथ, रूद्रनाथ व कल्पेश्वर अशी पाच शिवस्थाने आहेत. ही स्थाने ‘पंचकेदार’ म्हणून ओळखली जातात. ज्योर्तिलिंगाप्रमाणे त्याचे माहात्म्य सांगितले जाते. गिरी कुहरात दडलेल्या या पवित्र स्थानांकडे जाण्याचे मार्ग खडतर आहेत. प्रवासी सोयी-सुविधापण उपलब्ध नाहीत. त्यामुळे फारच थोडे भाविक या स्थानांकडे जातात. अशाच प्रकारे आदीबद्री, वृद्धबद्री, योगबद्री, विशालबद्री व भविष्यबद्री ही पाच विष्णुस्थाने ‘पंचबद्री’ म्हणून ओळखली जातात. ही सर्व स्थाने मुख्य रस्त्यावर व सहज जाता येतील अशी आहेत. पण विशालबद्री सोडल्यास इतर ठिकाणी कोणी फारसे जात नाही. त्यामुळे ही सुंदर प्राचीन पवित्र स्थळे आज ओस पडली आहेत. कदाचित माहितीचा अभाव है एक कारण असू शकेल. ही पंचबद्रीची यात्रा अत्यंत पुण्यदायी व फलदायी असते, असे पंडितांचे मत आहे.

निरनिराळ्या युगात बद्रीनाथाची पूजा निरनिराळ्या नावाने निरनिराळ्या ठिकाणी झाली. कृतयुगात आदीबद्रीची, त्रेतायुगात वृद्धबद्रीची तर द्वापारयुगात योगबद्रीची पूजा होत असे. कलियुगात विशालबद्रीची पूजा होत आहे, तर येणाऱ्या सत्ययुगात भविष्यबद्रीची पूजा होईल. विशेष म्हणजे या सर्व स्थानांची उंची चढत्या क्रमाने आहे. आदीबद्री (१६३० मी.), वृद्धबद्री (१७४० मी.) योगबद्री (१८५० मी.), २२/ हिमशिखरांच्या सहवासात विशालबद्री (३११३ मी.) व भविष्यबद्री (३२४४ मी.). या सर्व स्थानांचा जीर्णोद्धार शंकराचार्यांनी केला, असे सांगितले जाते.

ऋषीकेश-बद्रीनाथ मार्गावर ऋषीकेशपासून साधारण १७० कि.मी. अंतरावर ‘कर्णप्रयाग’ हे महत्त्वाचे गाव आहे. या ठिकाणी अलकनंदा व पिंडारी या नद्यांचा संगम होतो. ही कर्णाची तपोभूमी! या ठिकाणी कर्णाने तपश्चर्या करून सूर्याला प्रसन्न करून घेतले अशी आख्यायिका. कर्णप्रयाग हे पंचप्रयागातील तिसरे प्रयाग आहे. ‘प्रयाग’ म्हणजे संगमस्थान! सर्व प्रवासी सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत.

-प्रकाश लेले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..