नवीन लेखन...

ठाण्यात भरलेली साहित्यसंमेलने

संयुक्त महाराष्ट्रातील पहिले मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा मान ठाणे शहराला मिळाला. दिनांक १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले आणि ७ व ८ मे १९६० या दिवशी ४२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे शहरात भरले. यापूर्वी ५ व ६ नोव्हेंबर १९३२ साली, भारतरत्न पां. वा. काणे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण प्रांतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्यात भरले होते. […]

बाप -लेक

यू ट्यूब वर राज्य सभा चॅनेलवरील “विरासत “हा एस डी वर (बर्मनदा ) बनविलेला कार्यक्रम बघत होतो. एकदम एस डी -आर डी ही पिता -पुत्रांची जोडी आठवली. कार्यक्षेत्र एक पण स्पर्धा नाही, कारण दोघांची संगीतावर स्वतंत्र नाममुद्रा ! प्रत्येकाचे गाणे ओळखू येते. नातं रक्ताचं असलं तरी रचना परक्या ! […]

आत्मस्वरांच्या हाका !

आत्मस्वर स्पष्ट असो वा कुजबुजीच्या स्वरात तो केव्हाही पथदर्शकच ठरू शकतो विशेषतः त्याची गरज भासत असते तेव्हा! आत्मस्वर हा भावनांच्या, क्षणिक आवेगाच्या पार असतो आणि आपल्याला एखाद्या परिस्थितीचे वस्तुनिष्ठ दर्शन घडवू शकतो. हा आत्मस्वर कालातीत असतो- भूतकाळाचे अनुभव जोखून मार्ग अधिक निष्कंटक करीत असतो, वर्तमानाची काळजी तर घेत असतोच पण भविष्याचा रस्ता प्रकाशित करीत असतो. […]

जगलिंग, जगलर्स,आणि शॅडो प्ले (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ९)

भारतामध्ये शॅडो प्ले थिएटर ला वाव आहे. पण हाताच्या बोटावर मोजण्या इतके मंडळी असे सावल्यांचे खेळ करतात. ठाण्यामध्ये श्री धामणकर गेली अनेक वर्ष असे सावल्यांचे खेळ मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी करताना मी बघितले आहे. त्यांच्या खेळाचे नावच आहे “हा खेळ सावल्यांचा”. परदेशामध्ये शॅडो प्ले थिएटर साठी बऱ्याच वेगवेगळ्या कथा,परिकथा सावल्यांचा माध्यमातून सादर करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न तेथील संस्था करत असतात. या खेळात कल्पना शक्तीला प्रचंड वाव आहे तसेच कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. […]

सिनेमाची बखर

इसाक यांनी ‘जी’ व ‘माधुरी’ या पाक्षिकांसाठी लेखन सुरु ठेवले. पन्नास वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दी दरम्यान, त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. भगवान यांच्यावरचं ‘अलबेला’, ‘आई, माॅं, मदर’, दादा कोंडके यांच्यावरचं ‘एका सोंगाड्याची बतावणी’, ‘गुरुदत्त-एक अशांत कलावंत’, ‘चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ’, ‘चित्रपट सृष्टीतील काही एकतर्फी प्रेमकहाण्या’, सुलोचना दीदींवरील ‘चित्रमाऊली’, ‘तीन पिढ्यांचा आवाज-लता’, ‘पेज थ्री’, नूरजहाँ ते लता’, ‘दादासाहेब फाळके’, ‘मराठी चित्रपटांचा इतिहास’, ‘मराठी चित्रपटांचा १०० वर्षांचा आढावा’, ‘मीनाकुमारी’ इत्यादी अनेक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.. […]

ललिऽताऽऽ

तीस वर्षांत तिने सात भाषेतील एकूण ३०० चित्रपट केले. यामध्ये तिचे सर्वाधिक चित्रपट हे जितेंद्र सोबत आहेत. त्यानंतर अमिताभ बच्चन व श्रीदेवीचे. राजेश खन्ना सोबतही तिने काही चित्रपटांतून दर्शन दिले. […]

संस्कार

अनेक जन्मानंतर मानवी जन्म मिळतो असे म्हणतात. सृष्टितील सर्व जीवसृष्टित मानवी जन्म हा सर्वश्रेष्ठ बुद्धिजीवी जन्म मानला जातो परमेश्वराने माणसाला विवेकबुद्धी, वाचा, स्मरणशक्ती, श्रद्धा, भक्तिप्रीती, वात्सल्य, जिव्हाळा, निःस्पृहता, निर्मलता, विश्वास, त्याग, कृतज्ञता, नम्रता, परोपकार, साहस अशा अनेक सुसंस्कारी संस्कारशक्ती जन्मताच प्रदान केल्या आहेत. त्याच संस्करण होण म्हणजे संस्कार!! संस्कार हे करून होत नाहीत ते घडावे लागतात […]

मोबाईलचा पहिला काॅल

दूरसंचार क्षेत्राच्या इतिहासातील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा! त्या पहिल्या मोबाईलचे नाव होतं ‘डायनाटेक’. एक किलोहून त्याचं वजन जरा जास्तच होतं. त्याची लांबी १३ सें.मी. व रुंदी ५ सें.मी. होती. तो चार्ज होण्यासाठी तब्बल दहा तास लागायचे. पूर्ण चार्ज झाल्यावर तो फक्त अर्धा तास वापरता यायचा. […]

जादूचे प्रयोग! (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ८)

विश्वसनीय असे बघणे प्रेक्षकाला आवडते. जादुई कला मनोरंजक होण्यामागे हे एक कारण आहे. जादूगार,मुलांना प्रचंड आवडतो. कारण,तो मुलांना फसवतो.त्यांची फजिती करताना त्यांना हसावतो.आणि हसवता हसवता त्यांना जादुई खेळात सहज सामील करून घेतो. Birthday पार्टीत म्हणूनच जादूगारांना प्रचंड मागणी असते. मुले जादूगार भोवती लोह चुंबकाप्रमाणे गोळा होतात. त्याच्या जादूच्या प्रयोगात,जादुई खेळात, आनंदाने सामील होतात. […]

आम्ही जातो ‘अमुच्या’ गावा

श्रीकांत मोघे यांचा १९६१ साली प्रदर्शित झालेला ‘प्रपंच’ हा चित्रपट मी गणपतीच्या दिवसांत खजिना विहीर चौकात पाहिलेला आहे. मधुकर पाठक यांचं दिग्दर्शन, गदिमांनी लिहिलेली गीतं, सुधीर फडके यांचं अप्रतिम संगीत असलेला चित्रपट मी कधीही विसरू शकत नाही. […]

1 89 90 91 92 93 282
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..