नवीन लेखन...

आनंद तरंग

प्रत्येक माणसाला आनंद हवा असतो, परंतु तो प्रत्येकालाच मिळताना दिसत नाही,कारण तो कशात असतो, कुठे आणि कसा मिळवावा लागतो हे प्रत्येक माणसाला ठाऊक नसते. कधी तो जिथे नाही तिथे तर कधी ज्यामध्ये नाही त्यामध्ये शोधला जातो. […]

‘घरगुती’ अतिरेकी

तात्यासाहेब माझ्यासमोर बसले होते. त्यांची मुद्रा सतत ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान याच आविर्भावात असते, तशीच ती आताही होती. माझ्या मुद्रेवर कायम लोकांचे ऐके ब्रह्मज्ञान’ असे भाव असल्याने मी ज्ञानकण वेचण्याच्या तयारीत होत. तात्यांनी अर्थपूर्ण पॉज घेतला आणि म्हणाले, “आता हेच बघ ना, हळद ही काही हळद नव्हे.” मी चकितच झालो. आपला वाणी गेली अनेक वर्षे आपल्याला हळद नामे जी पिवळ्या रंगाची पूड देतो ती हळदच नव्हे? […]

पुनर्बालपण

मध्यंतरी आठ दहा दिवस माझ्याकडे रहायला आली होती. मी बाजारात निघालो तर म्हणाली , ” मी येते ” . म्हटलं, चल. कोथिंबिरीच्या एका चांगल्या जुडीसाठी तिन ठिकाणी मला फिरवत आणि तागडीतील प्रत्येक लहान वांगसुद्धा दाबून , गोल फिरवत पाहून तपासून घेणाऱ्या तिने बाजाराला दीडपट वेळ लावला . वर , घरी आल्यावर बायकोला ” अजितला अजूनही बाजारहाट काडीचा जमत नाही “, हेही सांगून टाकलं. मात्र ही आली की माझी खाण्याची चंगळ असते . […]

अमेरिकेत भेटली आपली झाशीची राणी!

अमेरिकेतील माझ्या वास्तव्यात विविध प्रकारचे वाङ्मय वाचण्याचा माझा प्रयत्न होता. चरित्रात्मक आणि व्यक्तिचित्रणात्मक वाङ्मयप्रकारात मला विशेष रस वाटतो. वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके, ग्रंथ आणि पुस्तिका मी चाळत असताना एका पुस्तिकेत मला ‘लक्ष्मीबाई- दि रानी ऑफ झांसी’ हा लेख आढळला. […]

अॅनी ओकली अद्भूत नेमबाज

तसे म्हटले तर जगातील बहुतेक सर्वच स्त्रियांना उपजतच नेमबाजीची कला परमेश्वराने देणगी स्वरुपातच दिलेली आहे. स्त्री सुंदर असो वा नसो, कुणातरी पुरुषाला वा पुरुषांना घायाळ करण्याची शक्ती निसर्गतःच तिच्याजवळ असते. दुष्यंत असो वा विश्वामित्रासारखा ऋषी असो किंवा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असो, स्त्रियांजवळील शस्त्राने वय, हुद्दा, प्रतिष्ठा किंवा ध्येय विसरून तो घायाळ होतो. […]

अमानवी गुणवत्तेची अष्टपैलू खेळाडू बेब डिड्रिक्सन

बेब डिड्रिक्सन हिने अल्पायुष्यात अनेक खेळांत प्रावीण्य दाखवून ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक मिळवून जागतिक उच्चांकही निर्माण केले होते. […]

मेक्सिकोतील वीरांगना डुलोर्स, ज्युआना आणि बीट्रीझ

मेक्सिको या देशात जेव्हा क्रांती झाली आणि प्रस्थापित राज्यकर्त्यांविरुद्ध जेव्हा तेथील जनतेने स्वातंत्र्यासाठी बंड पुकारले तेव्हा त्या देशातील कानाकोपऱ्यातून तेथील महिलाही त्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्या होत्या. […]

एमी पॅक, माता हरी,- काही महिला हेर

हेररगिरी करणाऱ्या व्यक्तीचे स्वभावविशेषच वेगळे असावे लागतात. मूळ पिंडच सर्वसामान्य माणसांपेक्षा दुर्मीळ स्वरूपाचा असावा लागतो. पोलादी रक्तवाहिन्या, धाडसी वृत्ती, मृत्यूविषयी बेपर्वा वृत्ती आणि वेगळे काही करून दाखविण्याची तीव्र ओढ, हेरगिरी करणाऱ्या व्यक्तीत असावी लागते. त्याखेरीज इतर अनेक स्वभाववैशिष्ट्यांचीही अपेक्षा असते. […]

अजेंटिनातील राजकारणपटू एव्हिटा पेरॉन

अर्जेंटिनाची एव्हिटा पेरॉन ही एक अफाट लोकप्रिय ठरलेली आणि गरिबांची वाली असलेली सौंदर्यवती राजकारणी तरुणी जगातील आगळ्या स्त्रियांपैकी एक म्हणून गणली जाते. असंख्य कर्तबगार व्यक्ती ज्याप्रमाणे अल्पायुषी ठरल्या त्याप्रमाणेच एव्हिटाही कॅन्सरमुळे वयाच्या ३२व्या वर्षी ऐन तारुण्यात आणि कीर्तीच्या शिखरावर असताना मृत्यू पावली. […]

अशी असेल २०२५ ची “ई-दिवाळी”

आजच आपण पोस्टात फिरकत नाही. पण २०२५ मध्ये पोस्ट ऑफिस अस्तित्वात नसल्याचीही आपल्याला सवय झाली असेल. बँकांचे बरेच व्यवहार ऑनलाईन होत आहेत. आगामी काळात तर धनादेशही इतिहासजमा होतील. ब्रिटनमध्ये २०१८ पर्यंत धनादेशांचा वापर बंद करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. […]

1 2 3 4 5 6 283
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..