ते दोघं
शाळकरी वयात दिवसा शाळा व संध्याकाळी गायनशाळा हा नित्यक्रम अनेक वर्षे अगदी कसोशीने पाळल्या गेला. पं. विष्णू दिगंबर पलुस्करांच्या पुण्यतिथीचे वेध लागले की कार्यक्रमाच्या तयारीसाठी आम्हा विद्यार्थ्यांची लगबग सुरु होत असे. वय काहीही असो, पण प्रत्येक विद्यार्थ्याने पंडितजींना आदरांजली अर्पण करण्यासाठी काही ना काही सादर केलेच पाहिजे अशी आमच्या गुरुजींची आज्ञा होती व ती मोडण्याची कोणाचीही […]
