नवीन लेखन...

गुणकर विठलन राणी 

” काल इतकी धावत – पळत कुठुन येत होतीस ? ”

” अरे , आमच्या तालमी सुरु आहेत ना नाटकाच्या ! तिथे थोडा उशीर झाला . आणि नंतर ट्रॅफिक . ”

” अग , मी सहजच विचारले . आणि अगदी माझ्या एखाद्या भाषणाला तू आली नाहीस , येऊ शकली नाहीस तर मी काही फाशी देणार नाही तुला ! ”

” तसं नाही रे . पण मला यायचच असतं ना ”

” हो . आणि काल तुझा बाकिचाही सगळा ग्रूप होता . ”

” तुझं लक्ष तुझ्या भाषणात होतं की कोण आल आहे , केंव्हा आल याकडे होते ? ”

” भाषणात होतं की नव्हते हे तुझ्यासारख्या जाणत्या श्रोत्यांनी सांगायच . ”

” आज काय मला हरभर्याच्या झाडावर चढवायचा प्लॅन आहे का ? ”

” नाही ग . गंमत ज़रा . पण मला पहिल्यापासून ओळखणरे श्रोते समोर असले की मला बरे वाटते . हुरुप येतो . ”

” खरं आहे ”

” त्यात तुझ्यासारखी माणसे असली की जास्तच . ”

” आज काय झालय ? इतकी स्तुति चालवली आहे माझी . अनेकजण ज्याची अक्षरशः फॅन आहेत तो माझी स्तुति करतो आहे हे ego सुखावनारे आहे हे मात्र नक्की . ”

” तू आल्याचा आनंद असतो हे मी नाकारणार नाहीच . आणि तो का होतो हे तूलाही माहीत आहे . भाषण ऐकताना श्रोता म्हणून तू जो प्रतिसाद देत असतेस , कळतही आणि नकळतही , तो एक वक्ता म्हणून मला खूप महत्वाचा वाटतो . शिवाय तू स्वतः बोलताना असणारी आवाजाची पट्टी , poise , pause शब्दांचे उच्चार , त्यांचा थ्रो याबाबत मला खूप आदर आहे . हे माझे प्रामाणिक मत आहे . तोंडदेखले केलेले विधान नाही . ”

” वेड्या , लोक हे तुझ्या विषयी म्हणतात . असो . याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही रे .कारण हे तू माझ्यामागेही म्हणतोस हे मला अनेकांनी अनेकदा सांगितले आहे . पण काल खरंच इतकेच कारण होते ? मी तूला आज ओळखत नाही ना रे ”

” खर आहे . ”

” वाटलंच मला . मी घाईघाईने हॉल मधे शिरले , तेंव्हाच तू मला पाहिले होतेस . तेंव्हाच प्रास्ताविक सुरु होते . नंतर तुझी ओळख करून दिली गेली . तो संपूर्ण वेळ तू भाषणाचा विषय सोडून दुसरा कोणता तरी विचार करतो आहेस असं मला सारखे वाटत होते . मी विचारणारच होते तुला त्याबाबत . ”

” तुला तसं गडबडीत हॉल मधे शिरतानां पाहून मला आपल्या ” येई वो विठ्ठले ” या नाटकाच्या तालमी आठवल्या . तेंव्हा तू यायचीस अशीच धावत – पळत , धापा टाकत . ”

” तेंव्हा तू मला हळूच एखाद चॉकलेट द्यायचास . आठवणीने . इतर कोणाला कळणार ही नाही अशा बेताने . स्वतः कधीही चॉकलेट खाणारा नसतानाही . मला तहान लागलेली असायची ना ! आणि तेंव्हा आजच्या सारख्या बिसलेरी नाही मिळायच्या ना ” .

” विशेषतः सोमवार ते शुक्रवार . कारण तेंव्हा तू कॉलेज करत असतानाच संगीत आणि न्रुत्य या दोन्हित विशारद करत होतीस . ”

” किती लक्षात असतं रे तुझ्या . त्यावेळी तुला शनिवार – रविवार उशीर व्हायचा तालमीना यायला . कारण तुझ्या वक्त्रुत्व – वादविवाद स्पर्धा तरी असायच्या नाहीतर बॅडमिंटन च्या . ”

” आता मी तुझं मगाच वाक्य म्हणू का ? ” किती लक्षात . . . ”

” No चान्स . कारण असं copycat असू नाही . तुला तर ते बिलकूल शोभत नाही . ”

” ओके . आणि म्हणून आपल्या दोघांच्या प्रवेशान्ची आपण इतर कोणाला कळू न देता वेगळी rehersal करायचो ते मला आठवत होत . ”

” हो . माझ्या आईच्या घरी ”

” तेंव्हा तुझं लग्न झालं नव्हते म्हणजे तुझ्या आईच्या घरीच असणार ना ! ”

” तू म्हणजे ना . . . ”

” आपण अशा rehersals तुझ्या घरी करत असायचो , तेंव्हा तुझी आई मधल्या दारात उभी असायची ”

” उत्स्फुर्तपण दाद देत ”

” अगदी तशीच तू आता देतेस . ”

” प्लीज़ . . . ”

” मस्करी नाही करत . अगदी कालच माझ्या भाषणात तू एकदा अशी खळखळून हसलीस ना , तेंव्हा मला इतकी तुझ्या आईची आठवण आली ना . . . ”

” का ? ”

” तू एकदम तुझ्या आई सारखीच हसतेस असं पुन्हा एकदा जाणवलं काल . ”

” इतकेच ? ”

” खरं म्हणजे नाही . ” .

” ” माझी आई आपल्या त्या rehersals बघताना नकळत कमरेवर हात ठेवून उभी असायची . ते पाहून मला पटकन एक action सुचवली होतीस . ”

” काल मला आपल्या ” येई वो विठ्ठले ” या नाटकाची आठवण यायच कारण म्हणजे तुझी कालची साडी . ”

” त्याचा माझ्या कालच्या तालमिशी काहीही संबंध नाही .”

” मला तसं नव्हते म्हणायचे . पण गडद रंग . मोठ्या चौकटी . त्या चौकटीत छोटे बूँदें . छान लांब – रूंद काठ – पदर . कधी नव्हे तो दोन्ही खान्द्यान्वरून घेतलेला पदर ”

” किती तसाच आहेस अजूनही .”

” हं ”

” मी आणि आमचा नाटकाचा सगळा ग्रूप काल तुझ्या भाषणाला येणारच होतो . कारण परवा तू ज्या पट्टीत , ज्या पध्दतीने बोललास ते सगळ्यांनी ऐकावे अशी माझी खूप ईच्छा होती . कारण ते आमच्या नाटकात काही प्रसंगांना एकदम relevant आहे . ”

“तू म्हणजे ना ”

” आणि तुझ्या नकळत , बोलण्याच्या ओघात तू एक , कधीकधी दोन्ही हात कमरेवर ठेवून बोलतोस ना . . . ”

” ती सवय ही कदाचित आपल्या येई वो विठ्ठले पासून लागली असावी . बाकी काही नाही तरी ही लकब मात्र नाटकांतून मिळाली . नाहीतरी बेताची उंची , काळा वर्ण यामुळे तुझी आई मला विठ्ठल म्हणायचीच . ”

” हो . आणि विठोबा म्हणत नाही ; कारण तू ” गारंबीचा बापू ” मधल्या सारखा दीनवाणा नाहीस तर पंढरी नाथा सारखा प्रसन्न आहेस , असच म्हणायची ती नेहमीच . ”

” ते आई म्हणायची ग . . . ”

” प्लीज़ . . . ”

” सॉरी . हे तोंडून नकळत गेले . BELEIVE ME . ”

” आणि मी ही काही सॉलिड सुंदर वगैरे नव्हते आणि नाही . ”

” . . सुरेख लांबसड़क केसांचा उल्लेख . . . ”

” मी जरासुध्धा आत्ता त्यामुळे रागावलेली नाही . ”

” प्लीज़ . . . . ”

” मी लग्न जमवले आहे म्हणून त्यावेळी तुम्हांला सगळ्यांना घरी पार्टी दिली होती . तेंव्हा आपण सगळे आपल्या येई वो विठ्ठले नाटका बद्दल बोलत होतो . त्यावेळी तुझ्या शेजारच्या खुर्चीत बसत असताना फक्त तुला ऐकू जाईल अशा पध्दतीने माझी आई तूला काय म्हणाली होती हे मीही विसरलेले नाही . आणि तूही बिलकूल विसरलेला नाहीस , अगदी तू कधीच , कोणाकडेही त्याची वाच्यता केलेली नसलीस तरी , हेही मला चांगले माहीत आहे . ”

” मी तर ते तुलाही कधीच सांगितले नाही . आपण त्यानंतर इतके वेळा , इतक्या विषयांवर बोलत असतो तरीसुद्धा . त्यामुळे तुला हे कसे माहीत ? ”

” मी आईच्या मागेच होते . आणि मी तशी उभी आहे हे पाहूनच आई तेंव्हा तसं म्हणाली . काळाच्या ओघात माझी निवड आई ने मनापासून स्वीकारली तरी तिची माझ्या साठीची निवड नेहमीच . . . . . ”

” आता त्या हयात नसताना आणि आपल्या आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांच्या विषयी असं म्हणणं हे योग्य नाही ”

” पण त्या पार्टीत ती ते म्हणाली हे आहेच ना !विठ्ठलासंबंधीत एका गाण्याच्या कार्यक्रमाचे पहिल्या काही प्रयोगात तुझं निवेदन तूफान लोकप्रिय होऊनही तू पुढच्या प्रयोगातली निवेदनाची संधी या प्रसंगाची आठवण होईल म्हणून टाळलीस असा माझा ठाम विश्वास आहे . ”

” आता हे माझ्यावर अन्याय करणारे आहे . ”

” या दोन दिवसांचा तुझा भाषणाचा विषय आमच्या नाटकाच्या आणि या पार्टी प्रसंगाशी जवळ जाणारा होता त्यामुळे तू माझ्या आई चे वाक्य या ना त्या स्वरूपात घेशील असं मला वाटत होते . म्हणून कितीही धावपळ झाली तरी मला यायचच होते . कारण तू हे कसं घेतोस याविषयी मला कुतुहल होते . ”

” आता हे काय ? ”

” तू ज्या पंढरपूर कडे इतक्या सश्रद्ध , सजग रसिकतेने पाहतोस त्या पंढरीतही विठोबा आणि रखुमाई ची देवळे वेगळीच आहेत रे बाबा . . . . . . . हे माझ्या आईचे वाक्य . ”

” मी यांत कोणालाच दोषी मानत नाही . ती तशी वेगळी गेली अनेक शतके आहेत हेही मला माहीत आहे . ”

” आणि तरीही अतिशय आवडते गाणं ” सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा . ” आणि त्यातही सगळ्यात आवडती ओळ ” गुणकर विठलन राणी ”

” तरीही की म्हणून हे नाही माहीत मला ”

” हं ”

” आणि आता ही रचना पंडित भीमसेन जोशी यांची आवडते की जयतिर्थ मेवुनडी आणि आनंद भाटे यांची आवडते असं विचारू नकोस . सगळ्यांचीच आवडते . कारण ” सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा ” ही रचना च मुळातच आवडते . ”

” समझनेवाले समझ गये हैं . . . कभी से ये मत पूछो ” .

” और आप भी . . . दिवानोसे ये मत पूछो दिवानोपे क्या गुजरी हैं ”

” स्वतःच्या स्पष्ट मतान्शी ठाम असतानाच दुसर्याच्या मताचा , मनाचा , आणि मानाचा पूर्ण आदर राखण्याच भान सदैव ठेवणार्या ” गुणी ” ” विठ्ठलाची जी ” गुणकर विठलन राणी ” आहे तिलाही . . . अगदी आजही आणि इथेही देवळे वेगळी असली तरी . . . . ” .

” . . . . ती गुणकर विठलन राणी . . . . ”

चंद्रशेखर टिळक

१६ ऑक्टोबर २०१६ .

चंद्रशेखर टिळक
About चंद्रशेखर टिळक 25 Articles
श्री. चंद्रशेखर टिळक हे अर्थतज्ज्ञ असून NSDL चे उपाध्यक्ष आहेत. गेली अनेक वर्षे ते केंद्रीय अर्थसंकल्पावर विश्लेशणात्मक व्याख्याने देत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..