नवीन लेखन...

मराठी भाषेची सद्यस्थिती

मराठी भाषेला देववाणी बरोबर प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमत् भगवद् गीतेवर टीका ग्रंथ लिहिताना काढलेले हे गौरवपूर्ण उद्गार आहेत. मराठी भाषा मी इतकी संपन्न करीन अशा प्रतिज्ञेने सामान्य जन-भाषेत त्यांनी हा ग्रंथ लिहिला आणि सामान्य जनतेला समजणाऱ्या भाषेत संस्कृतात दडलेला ज्ञाननिधि मुक्त केला. […]

सट्खूळ

माझ्या लहानपणी सट्खूळ हा शब्द मी आईकडून, आज्जिकडून अनेक वेळा ऐकलाय. सट्खूळ म्हणजे शब्दशः सांगायचं तर, मुल सहा सात वर्षांचं झाल्यावर त्याला लागणारं खुळ. आता खुळ म्हणजे वेड लागणं किंवा खरोखर वेडं होणं असा अर्थ करून घेऊ नका अगदी. तर असं हे सट्खूळ, ठराविक वयात लागतं आणि निघूनही जातं. मुलं मोठी झाल्यावर त्यांना हे सांगितलं की, आपले प्रताप ऐकून ती खूप हसतात…..पण खुळावल्यासारखी नाही बरं….. […]

फ्री ची चंमंत ग.

सध्या मुक्काम पोस्ट अमेरिका.इथे हव्या त्या गोष्टी करायला वेळ नेहमी पेक्षा अधिक मिळतो. दहा बारा दिवसांपासून f b वर एक add येत होती. online कोर्स उपवास पदार्थ, मुखवास, इन्स्टंट मसाले.इ.हे सगळे free कोर्स होते. मात्र त्यांची भारतीय वेळ होती दुपारी 3. मला ते कोर्स करणे शक्य नव्हते.याचे कारण इथे या वेळेस मध्य रात्रीचे अडीच वाजलेले असतात.म्हणून तो नाद सोडून दिला.तीन चार दिवसांपूर्वी हाॅटेलच्या चवी प्रमाणे भाज्या घरच्याघरी बनवा अशी add आली. […]

कारण ती घरीच असते

व्यापता न येणारं अस्तित्व आणि मोजता न येणारं प्रेम म्हणजे आई. तिच्या निर्व्याज प्रेमाची परतफेड करणे अशक्यच आहे. आपल्या आधी तिचा दिवस चालू होतो. सर्वांच्या आवडी निवडी, कामाच्या वेळा, लहान-मोठ्यांची काळजी आणि घर सांभाळताना स्वत:ला ती पूर्णपणे विसरते. […]

स्वातंत्र्योत्तर वृत्तपत्रांची वाटचाल

ऐतिहासिक स्वातंत्र्य संग्रामामध्ये वृत्तपत्रे, नियतकालिकांचा फार मोठा वाटा होता. देशी वृत्तपत्रांचे मालक आणि संपादक यांचा थेट किंवा अप्रत्यक्षरित्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग होता. त्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून ते आजच्या सोशल मीडिया, वेब पोर्टल आणि ऑनलाईन पत्रकारितेच्या जमान्यापर्यतच्या जवळपास सव्वा दोन शतकाच्या दीर्घ प्रवासात वृत्तपत्रसृष्टीला अनेक स्थित्यंतराला सामोरे जावे लागले आहे. […]

सहकारी तत्त्वावर ग्रंथ प्रकाशनाचा प्रयोग

ग्रंथ प्रकाशन आणि वितरण क्षेत्रात सहकारी तत्वावर कार्य करणान्या ‘साहित्य प्रवर्तक सहकारी संस्था, कोट्टायम’ या केरळ राज्यातील संस्थेच्या कार्याचा तपशील पुढे दिला आहे. महाराष्ट्रातील सद्यस्थित ग्रंथव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर या प्रयोगाचे कार्य लक्षात घेणे अगत्याचे आहे असे वाटते. […]

हजार तोंडांचा रावण – मनोगत

जागतिक, राष्ट्रीय, प्रांतीय अशा सर्वच जागी अशांतता असेल तर समाज, कुटुंब आणि वैयक्तिकरीत्या माणूस हा देखील स्वस्थ राहू शकत नाही. जगण्यासाठीचा माणसाचा संघर्ष आज कैक पटींनी वाढलेला आहे. म्हणून प्रत्येक जण आज अस्वस्थ आहे. असमाधानी आहे. […]

आठवणींची मालिका

वय वाढत जातं तसं एकेक जवळच माणूस दुरावतो. वर्षानुवर्षे असलेली साथसंगत हरवते. एकटेपण कधी मनाला बोचते. तर कधी काहीशा गमतीदार प्रसंगानाही सामोरे जावे लागते. अशाच काही भावनाशील, प्रेमळ अनुभवांचा कोलाज! […]

बीज भाषण : मराठी कथात्म!

मी कथा विषयी बोलणार आहे, पण हे मी माझ्या कथांचे संदर्भ घेऊन बोलणार आहे.कथा म्हणजे काय? काल्पनिकते मध्ये वास्तविकता किंवा वास्तविकते मध्ये काल्पनिकतेचे मिसळ करून व्यक्त होणे.सर्वस्वी वास्तविक किंवा सर्वस्वी काल्पनिक असे काहीच नसते. पण विचार आणि चिंतन ही लेखकाची शिदोरी आहे. यातून जी जन्म घेते ती कविता किंवा कथा. […]

1 25 26 27 28 29 286
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..