बस्तर परिसर (उगवता छत्तीसगड – Part 3)
जंगलाचे वरदान असलेला ह्या बस्तर प्रदेशात अनेक औषधी वृक्षांच्या जाती, विविध प्राणी व पक्षी आढळतात. ह्या सर्वांचा आदिवासीच्या जीवनाशी निगडीत संबंध आहे. बस्तर प्रदेशातील अदिवासींचे जीवन जंगलावर अवलंबून आहे. बस्तर भागातील आदिवासींच्या मुख्य जमातीची नावे आहेत अबूज मारिया, बायसन हॉर्न मारिया, भात्र, हलबा, गद्वा, आणि गोंडा. त्यांच्यात अनेक पोटजाती सुद्धा आहेत. विलक्षण किरटया आवाजात गायले जाणारे लोकसंगीत, बायसनचे (गवा) शिंग डोक्यावर बांधून केलेले “काकसर नृत्य” हा आदिवासी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. […]
