मनस्वी शिक्षक
न. प. शा. क्रमांक अकरा समतानगर उस्मानाबाद येथील शाळेत मी मुख्याध्यापिका म्हणून रुजु झाल्या पासून त्यांना अगदी जवळून पाहिले. नवीन शाळा सुरू करण्यात आली होती म्हणून मैदानात काही रोपे लावली होती आणि कुंभार सर शाळेत लवकर येऊन झाडांना पाणी घालणे. आळे करणे कामे करीत असत. अगदी याच अपेक्षेने मुलांना घडवत असत. गणित विषय शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. पण दुसरे कोणतेही विषय दिले तरी नाही म्हणणार नाहीत. तिथेही मुलांना कमी पडू दिले नाही. कधीही घरगुती कारण सांगून काम टाळले नाही. साधा राहणी आणि उच्च विचारसरणी. […]
