नाटककार स. पां. जोशी
1950 साली सानेगुरुजींच्या निधनानंतर, सानेगुरुजी स्मारकाच्या हालचाली सुरू झाल्या. त्यावेळी सपांमधील नाटककार जागा झाला. गुरुजींच्या ‘आंतरभारती’ संकल्पनेवर आधारित ‘जीवनकला’ या सपांनी लिहिलेल्या नाटकाचा प्रथम प्रयोग डोंबिवलीच्या स. पां. जोशी विद्यालयाच्या प्रांगणात 9 जानेवारी 1951 रोजी झाला. याच नाटकाचा दुसरा प्रयोग 11 फेब्रुवारी 1951 रोजी झाला. त्यावेळी ‘नवशक्तिकार’ प्रभाकर पाध्ये यांच्या हस्ते नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या नाटकास आचार्य अत्र्यांची प्रस्तावना लाभली होती. शं. दि. डोंगरे कृत हिंदी अनुवादाचे प्रकाशन ऑक्टोबर 1951 मध्ये झाले. […]
