नवीन लेखन...

‘धर्मवीर’ – ठाण्यातील दिवस : १९९८ ते २००२

‘धर्मवीर’ – ठाण्यातील दिवस ( नोव्हेंबर १९९८- ऑक्टोबर २००२)

“धर्मवीर” पाहिला. आयत्यावेळेचं नियोजन करून, ” मस्ट ” यादीतील नसला तरीही !

मी सिएट कंपनीत नोव्हेंबर १९९८ ला जॉईन झालो आणि सुरुवातीचं वास्तव्य होतं नौपाडा पोलीस स्टेशन जवळच्या इमारतीत ! ( चित्रपटात ज्या “मोनालिसा “इमारतीचा उल्लेख आहे,तिच्या जवळ). पुण्याहून वेळी-अवेळी येण्या जाण्यासाठी जवळचा “वंदना “स्टॉप सोयीचा म्हणून आणि “तीन हात नाका “पासून कंपनीत जाण्या-येण्यासाठी सिटी बस जवळची म्हणून ! नंतर पुण्याहून कार नेल्यावर कचराळी तलावाजवळील फ्लॅट मध्ये वास्तव्य ! तेथून गडकरी रंगायतन जवळ आणि ठाणे नगर वाचनालय जवळ म्हणून.

नगर वाचनालयात इमाने इतबारे जाता-येता नेहेमीच टेम्बी नाका आणि धर्मवीर आनंद दिघेंचे निवासस्थान नजरेस पडे. क्वचित ते दिसत- कार्यकर्त्यांच्या, सामान्य माणसाच्या गराड्यात ! कुतूहल असे माझ्या मनात, पण त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती किंवा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा व्याप, त्यांचे ठाणेकरांच्या मनातील स्थान काहीच त्यावेळी माहीत नव्हतं. उत्सुकता अवश्य होती पण ——

त्यांना अपघात झाला वंदना परिसरात, आमच्या घराजवळ आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती बातमी कळाली. सिंघानिया हॉस्पिटलच्या आसपास राहणाऱ्या सिएट मित्रांनी तेथील वातावरण,गर्दी यांचं संदिग्द्ध वर्णन केलं. त्यांच्या जाण्याचे वृत्त कानी आले आणि आख्खे ठाणे स्तब्ध, निःशब्द !आतले कोलाहल कोणीच ओठाबाहेर काढत नव्हते. संपूर्ण शहरावर एका अनभिषिक्त व्यक्तीचं आजवर न दिसलेलं साम्राज्य आम्ही त्या काळात अनुभवले.

ठाण्यात राहणारे आमचे स्थानिक नातेवाईक काही कामानिमित्त आमच्या घरी आले होते आणि बोलता-बोलता त्यांनी धर्मवीरांबद्दल खूप काही सांगितलं- कालच्या चित्रपटात गष्मीर महाजनींच्या नजरेतून ते दिसले तसे.

ठाण्याच्या स्थानिक केबल वर सायंकाळी त्यांचा अंत्यविधी बघितला तेव्हा साऱ्या शहराबरोबर आम्हीही थिजलो होतो.

या घटनेच्या काही कालावधीनंतर ठाणे महानगरपालिकेच्या मैदानावर स्व. बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली. मी गेलो होतो. धर्मवीर आनंद दिघे यांच्या बाबत बाळासाहेब खूप आतून बोलले होते. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आणि एकदाच मी स्व. बाळासाहेबांचे भाषण प्रत्यक्ष ऐकले. हे वक्तृत्व भावनोत्कट होते. त्या सभेची गर्दी आणि स्व. बाळासाहेबांचे ठाणे व धर्मवीर आनंद दिघे यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधांचा त्या रात्री उलगडा झाला.

२००१ च्या त्या घटनांच्या साक्षीनंतर काल रात्री मी पुन्हा ते माझ्या archive मधील ठाण्यातील दिवस जगलो.

प्रसाद ओक आणि तरडे यांच्यामुळे ” आपलं पुरातन आयुष्य ” बघताना मी २०२२ चा उरलो नव्हतो.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..