नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

घोट्याचा सांधा

घोट्याचा सांधा हा आपल्या पायाजवळ जमिनीपासून २-३ इंच उंचीवर शरीराचे संपूर्ण वजन घेऊन हालचाल करणारा अतिशय महत्त्वाचा सांधा आहे. हा सांधा एकूण तीन हाडांमध्ये तयार होतो. पोठरीतील दोन हाडे १) टिबीया २) फिब्युला आणि पायातील ३) टॅलस या हाडांनी मिळून हा सांधा तयार केला जातो. यात पोठरीतील जाडे व महत्त्वाचे हाड खालच्या बाजूस अधिक रुंद व […]

पाय मुरगळणे

पाय मुरगळणे (Ankle sprain) या गोष्टीचा अनुभव प्रत्येकालाच असतो. ‘पाय मुरगळून मी पडलो’ ही अगदी नेहमी आढळणारी रुग्णाची तक्रार असते. मोठ्या प्रमाणात पाय मुरगळला तर घोट्याच्या आजुबाजूची हाडेच तुटू शकतात व रुग्णाला उचलूनच हॉस्पिटलमध्ये आणावे लागते. पण थोड्या प्रमाणात पाय मुरगळला म्हणजे घोटा हा सांधा फिरला तर हाडाच्या ऐवजी घोट्याभोवती असलेल्या लिगामेंटना मार लागू शकतो. अशावेळी […]

वारंवार निखळणारा खांदा

खांदा हा असा सांधा आहे, की त्यात जास्तीत जास्त प्रकारच्या आणि सर्वात जास्त लांबपर्यंत फिरणाऱ्या हालचाली होतात. जो सांधा अशा रीतीने गोलाकार, पुढे-मागे फिरतो, आत वळतो, मागे वळतो असा दुसरा कोणताच सांधा आपल्या |शरीरात नाही. या सर्वविध हालचाल करणारा हा सांधा निसर्गतःच थोडा अस्थिर बनलेला आहे. त्यामुळे खांदा सटकणे हे इतर सांध्यापेक्षा अधिक प्रमाणात आढळते. हा […]

लहान मुलांच्या दातांची निगा कशी राखावी?

लहान मुलांच्या दातांची निगा राखणं खूप महत्त्वाचं आणि आवश्यक आहे. लहान मुलांच्या दातांना दुधाचे दात किंवा प्राथमिक दात असे म्हणतात. अती गोड व स्निग्ध पदार्थ उदा. चॉकलेट, बिस्किटं फास्ट फूड, आईस्क्रीम हे खाण्याचं प्रमाण मुलांमध्ये जास्ती असेल तर किडण्याचे प्रमाण अधिक आढळते. अशा पदार्थांमध्ये कार्बोहायर्डेट जास्ती असते. ते दाताला चिकटले आणि किडण्याचे प्रमाण वाढते. साधारणपणे सातव्या […]

मनगटाचा सांधा

हा सांधा खूपच गुंतागुंतीचा आहे. कारण माणसाला आपल्या हाताची निरनिराळी निपुण हालचाल करण्यासाठी या सांध्याचा उपयोग होतो. मनगटाजवळ ३६०० वर्तुळाकार हालचाली झाल्याने हात उलथा आणि पालथा होऊ शकतो. तसेच हातात काहीही पकडण्यासाठी ४५० वरच्या बाजूला व एखादी गोष्ट टेबलवरून उचलण्यासाठी २५-३०० हात खाकी- या सांध्यातून आपल्याला हलविता येतो अशा रितीने हाताच्या सर्व निपुण हालचाली होण्यासाठी मनगटाचा […]

मानवी शरीरात कोणती संमिश्रे वापरतात?

धातूंचे आणि त्यांच्या संमिश्रांचे जे अगणित उपयोग आहेत त्यातील काही माणसाच्या शरीरातदेखील केले जातात. दातांमध्ये भरण्यासाठी वापरली जाणारी चांदी किंवा मोडलेल्या हाडांना जोडण्यासाठी आणि आधार | देण्यासाठी धातूंच्या पट्ट्यांचा उपयोग केला जातो. किडलेले दात स्वच्छ करताना, कीड लागलेला दाताचा भाग काढून टाकला . की दातांत एक पोकळी उरते. ही पोकळी भरून काढली नाही तर त्यात अन्नकण […]

अस्थिसच्छिद्रता (ऑस्टिओपोरोसिस)

हा एक चयापचयाचा रोग आहे. यात हाडाची घनता कमी होते व बाह्यकाची जाडी कमी होते. हाडाची झीज आणि भर ही सतत चालणारी प्रक्रिया असते. तिशीपर्यंत हाडाचा बाह्यक (कॉर्टेक्स) कठीण होत जातो. नंतर हाडाची झीज व भर समतोल झाल्यास हाडाचा कठीणपणा तसाच राहतो; पण त्यात, तफावत पडून झीज जास्त झाली तर हाडात सच्छिद्रता येऊन कठीणपणा कमी होतो. […]

या मसाल्यात दडलंय काय? – भाग तीन

७) जिरे- बहुतेक मसाल्यात व सुवासिक द्रव्यात याचा वापर. भारत व चीन मसाले मुख्य उत्पादक. एकेकाळी जिरे युरोपात चलनासारखे वापरात होते. राजांच्या कलेवरांना याचा लेप लावायचे. पडसे, खोकला, पोटातील वायू कमी करण्यासाठी, पाचक, स्वादुपिंड, विकर उत्तेजक म्हणून वापर. कर्करोगप्रतिबंधक, (यकृत व जठराचा) यकृतातील निर्विषीकरण विकर उत्तेजक, अॅण्टिऑक्सिडंट, शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतात. प्रथिने १७.७%, मेद २३.८, तंतू ९, […]

या मसाल्यात दडलंय काय? – भाग दोन

३) हळद- वनस्पती शास्त्रातील नाव कर्क्यूमा लाँगा, याचे जमिनीतले खोड म्हणजे हळदकुंड. पुराणकाळापासून मंगलकार्यातील व पाककृतीत मानाचे स्थान. पदार्थांना रंग व चव देणारी हळद आहेच तशी गुणकारी. सांगली सर्वात जास्त हळद पिकविणारी व निर्यात करणारी. पिढ्यान्पिढया हळद कृष्णाकाळच्या भूमिगत गोदामात साठवली जाते. जखम झाल्यास रक्तस्त्राव थांबवण्यासाठी व जंतुप्रतिबंधक म्हणून हळद लावण्याचा प्रघात आहे. हळदीमध्ये लोहाचे प्रमाण […]

या मसाल्यात दडलंय काय? – भाग एक

मसालेदार पदार्थ हे भारतीय किंबहुना आशियाई लोकांचे वैशिष्ट्य. शतकानुशतके प्रयोग करून आपली खाद्यसंस्कृती तयार झाली. मसाल्यांचे स्थान अढळ राहिले. मसाल्यांशिवाय पदार्थाला चव नाही असे समीकरण झाले आहे. नुसत्या चवीसाठी हा खटाटोप झाला असेल? ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ हे वाक्य आपले पूर्वज अन्नाविषयी सतत सांगत आलेत. त्याचा अर्थ? आपले शरीर हे एक यज्ञकुंड. त्यात अन्नाची आहुती दिल्याशिवाय […]

1 … 22 23 24 25 26 … 163
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..