नवीन लेखन...

या मसाल्यात दडलंय काय? – भाग चार

१२) मेथी- बिया फोडणीत, दळ कोशिंबीर, लोणच्यात वापरतात. चवीला मसाले कडू. यात ५०% तंतू असल्यामुळे त्यात अन्नातील साखर व चरबी अडकून शरीरात त्यांचे शोषण कमी होते. बियात एन-३ फॅटी अॅसिड खूप प्रमाणात असल्यामुळे रक्तातील चरबी कमी होते. बियांमुळे ग्लुकोजचा पेशीतील ज्वलनाचा वेग वाढतो व रक्तातील साखर कमी होते. ही क्रिया मेथीच्या भाजीमुळे होत नाही. बिया मधुमेहाच्या औषधांबरोबर वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्याव्यात. यात कॅल्शियम १६०, फॉस्फरस ३७०, लोह ७, फोलिक अॅसिड ८४ कोलीन ११६१ मॅग्नेशियम १२४ जस्त ३ मि. ग्रॅ. प्रतिशत.

१३) धणे- मूत्रविकारावरावर घेण्याचा प्रघात. पोटातील वायू कमी करतो. पचन सुधारते. रक्तातील मेद कमी होण्यासाठी मदत होते. कॅल्शियम ६३०, फॉस्फरस ३९३, पोलिक ॲसिड ३२ मॅग्नेशियम ४७५, जस्त ३ कोलीन १०७७ मि. ग्रॅ. प्रतिशत बीटा कॅरोटिन ९४२ मायक्रो. धण्याच्या पुडीमध्ये भेसळ म्हणून घोड्याची लीद वापरतात. म्हणून शक्यतो घरीच दळावेत.

१४) हिंग- फोडणीत जाणारा हिंग पोटातील वायू कमी करतो. औषधात त्याचा अर्क वापरतात. कॅल्शियम ६९०, फॉस्फरस ५०, लोह ४० व मॅग्नेशियम ८० मि. ग्रॅ. प्रतिशत.

१५) कडूलिंब/कडीपत्ता- बहुधा जेवताना पानात टाकला जाणारा पाला. पाचक रस निर्माण करणारा. यात कॅल्शियम ८३० फॉस्फरस ५७ फोलिक अॅसिड ९४ मॅग्नेशियम ४४ मि. ग्रॅ. व बीटा कॅरोटिन (अ) ७५६० मायक्रो. प्रतिशत. हा खाल्ल्यास किती खनिजे पोटात जातील!

१६) पुदिना- पोटदुखीसाठी, पोटातील वायू कमी करण्यासाठी उपयोगी. कॅल्शियम भाग चार २०० फॉस्फरस ६२ लोह १६, फोलीक अॅसिड ११४ मॅग्नेशिअम ६० व बीटा कॅरोटिन १६२० मायक्रो. पाचक.

१७) तीळ- कॅल्शियम १४५० फॉस्फरस ५७०, लोह १०, फोलीक ॲसिड १३४ तांबे, मँगनीज ३, जस्त १३ मि. ग्रॅ. असते. एन ३ फॅटी अॅसिडस् असतात. वाटून त्वचेला लावल्यास त्वचा मऊ राहते. कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना व तीळ यांचे नित्य सेवन केल्यास हाडे मजबूत राहतील व अॅनिमियाला प्रतिबंध होईल.

१८) मोहरी- नगण्य दिसणारी मोहरी फोडणीच्या रुपात ठाण मांडते. कॅल्शियम ४९०, फॉस्फरस ७००, कोलीन २११, मँगनीज ३ व जस्त ५ मि. ग्रॅ. प्रतिशत.

१९) जायफळ पूड करून वापरतात. बहुधा गोड पदार्थात. थोड्या प्रमाणात घेतल्यास पोटात वायू धरत नाही. मळमळ थांबते व वारंवार शौचाची तक्रार थांबते. जायफळाचा परिणाम व सुवास ‘मिरीस्टीसीन’मुळे होतो. जायफळ अतिप्रमाणात खाल्ल्यास आकडी येते व उलट्या होतात. स्वयंपाकात वापरात येणारे प्रमाण कमी लोह ८, असल्यामुळे दुष्परिणाम होत नाहीत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..